पोस्ट विवरण
सुने
सोयाबीन
कीट
कृषि ज्ञान
नाशीजीव प्रबंधन
कृषी ज्ञान
DeHaat Channel
29 May
Follow

सोयाबीन: प्रमुख कीटक, लक्षणे, प्रतिबंध आणि नियंत्रण (Soybean: Major Pests, Symptoms and Control)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये 40 टक्के प्रथिने आणि 19 टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिक स्तरावर ते महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनामध्ये जवळजवळ 58 टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकी जळजवळ 60 टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक ऊस उत्पादक शेतकरी देखील सोयाबीनच्या शेतीकडे वळले आहेत. सध्या सोयाबीनला मिळत असलेला चांगला दर हे देखील या मागचे एक कारण आहे. याच सोयाबीन पिकामध्ये अनेक कारणांमुळे विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. सोयाबीन पिकामधील या किडींच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक स्वरूपातच जर नियंत्रण केले तर पुढील फवारणीसाठीचा खर्च कमी होऊन पिकाचे नुकसान कमी होते. त्यामुळे आपल्याला महत्वाच्या किडींच्या अवस्था माहित असल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना करणे सोपे जाते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण सोयाबीन मधील प्रमुख किडींच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

सोयाबीन मधील प्रमुख कीटक (Soybean Insects):

पाने गुंडाळणारी अळी (Leaf Roller):

पाने गुंडाळणाऱ्या अळीची ओळख:

  • पतंग लहान व करड्या रंगाचे असतात.
  • त्यांच्या पुढील पंखावर टोकाकडील मागच्या किनाऱ्यावर पांढरा ठिपका असतो.
  • मागील पंख दातेरी असतात.

पाने गुंडाळणाऱ्या अळीची लक्षणे (Symptoms):

  • अळी पाने गुंडाळते व आत राहून पाने पोखरते.
  • कीडग्रस्त पाने कपासारखी अथवा चोचेसारखी दिसतात व ती गळून पडतात.

उपाय (Remedy):

  • इंडोक्झाकार्ब 14.5% एससी (घरडा - किंगडोक्सा) 100 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.

खोडमाशी (Khodmashi।Stemfly):

खोडमाशीची ओळख:

  • या किडीच्या प्रौढ माशा चकचकीत काळ्या रंगाच्या असतात.
  • या पांढऱ्या रंगाच्या असुन त्या खोडात दडुन बसतात.
  • मादी माशी देठावर व पानावर अंडी घालते.
  • अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पाने पोखरुन देठापर्यंत पोहचतात.

खोडमाशीची लक्षणे (Symptoms):

  • खोडमाशीचा प्रादुर्भाव पिक लहान असतानाच सहजपणे ओळखता येतो.
  • या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो
  • सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे 15 ते 20 दिवसांच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमांशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते.
  • असा शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते.
  • रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढ माशी निघून छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते.

उपाय (Remedy):

  • थियामेथोक्सम 12.60%+ लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 09.50% झेडसी (सिजेंटा - अलिका) 80 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा किंवा
  • क्विनॉलफॉस 25% ईसी (धानुका - धानुलक्स) 200 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.

चक्री भुंगा (Gridle Beetle):

चक्री भुंग्याची ओळख:

  • या किडीचा प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असतो.
  • लहान अळी पांढऱ्या रंगाची आणि पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते.

चक्री भुंग्याची लक्षणे (Symptoms):

  • शेतात फिरताना झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेली दिसते.
  • पान फक्त सुकलेले असेल तर चक्री भुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते जर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असते तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असण्याची तसेच त्यातून लवकरच अळी निघून ती नुकसान सुरु करण्याची शक्यता असते.
  • चक्रीभुंग्याने केलेल्या खापेमुळे वरच्या खापेच्या वरील भाग वाळून जातो.
  • चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत. तसेच पीक काढणीच्यावेळी खापा केलेल्या जागून खोड तुटून पडते, त्यामुळे देखील नुकसान होते.

उपाय (Remedy):

  • किडीच्या प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी 15 दिवसाच्या अंतराने पुढील पैकी किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी -
  • पहिली फवारणी -
  • थियामेथोक्सम 12.60%+ लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 09.50% झेडसी (सिजेंटा - अलिका) 80 मिली सोबत निम तेल 10000 पी.पी.एम - 400 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा. यामुळे खोडकिडीसोबतच चक्री भुंगा व रस शोषक किडीच्या नियंत्रणास मदत होईल.
  • दुसरी फवारणी - 30 - 35 दिवसानी थायक्लोप्रीड 21.7 एससी (बायर - अलांटो) 300 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
  • तिसरी फवारणी - 45 - 50 दिवसांनी क्लोरएन्ट्रानिलिप्रोल 18.5 % एससी (FMC - कोराजेन) 60 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
  • चौथी फवारणी - 60 - 65 दिवसांनी इमामेक्टिन बेंजोएट 5% एसजी (देहात - Illigo) 100 ग्रॅम प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.

पांढरी माशी (White Fly):

पांढऱ्या माशीची ओळख :

  • पांढरी माशी या किडीचा आकार 0.5 मिमी पेक्षा कमी असतो.
  • रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो.
  • या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते.
  • कोश व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो.
  • पिल्ले व प्रौढांच्या शरीरावर केस असतात.

पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms):

  • पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
  • या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण (whitefly control in chilli) करणे खूप जास्त आवश्यक बनते.
  • झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते.
  • या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.

उपाय (Remedy):

  • प्रति एकर शेतात 20-25 पिवळे चिकट सापळे वापरा.
  • कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
  • याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्राम प्रति एकर २०० ली पाण्यात मिसळून फवारणी करा  किंवा थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 मिली प्रति एकर 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करा.
  • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50% ईसी (पीआय इंडस्ट्रीज - करीना) 400 मिली प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

घाटे अळी:

घाटे अळीची ओळख :

  • घाटे अळी अमेरिकन बोंड अळी म्हणून देखील ओळखली जाते.
  • पूर्ण वाढलेली अळी 4 ते 5 सेमी लांब व गडद हिरव्या किंवा तपकिरी करड्या रंगाची असते.
  • शरीराच्या दोन्ही बाजूस करड्या अथवा पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात.
  • एक अळी पूर्ण वाढ अवस्थेत 30 ते 40 घाटे अथवा 6 ते 8 ग्रॅम दाणे खाते.

घाटे अळीची लक्षणे (Symptoms):

  • अळी बाल्यावस्थेत, पिवळ्या, गुलाबी, काळे किंवा राखडी रंगाची असुन कोवळी पाने व फांद्या यावर उपजीविका करते.
  • दुसऱ्या अवस्थेत पाने, कळ्या, फुले खाते.
  • तिसऱ्या अवस्थेत घाट्यांना छिद्र करून दाणे खाते.

उपाय (Remedy):

  • घाटे अळीच्या नर पतंगास आकर्षित करण्यासाठी प्रति एकरी 5 कामगंध सापळे उभारावे. जेणेकरून किडींची संख्या नियंत्रित करता येईल.
  • अळीची सुरुवातीची अवस्था दिसल्यास निम तेल 10000 पी.पी.एम. किटकनाशक 25 मिली आणि स्टिकर 2 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • स्पिनोसॅड 45% एससी (बायर - स्पिनटोर) 100 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा
  • क्लोरोपायरीफॉस 20% ईसी (टाटा रॅलीस - तफाबान) 1 लिटर/प्रति एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • फुलं दिसू लागताच क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू एससी (FMC - कोराजन) 6 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केल्यास पुढील 30 दिवसांसाठी पिकाचे अळी सोबत इतर किडींपासून नियंत्रण होते.
  • या किडीचा प्रादुर्भाव सहसा पीक एक महिन्याचे झाल्यानंतर सुरु होताना दिसतो. पिकास फुले व शेंगा लागल्यानंतर तो वाढलेला आढळतो.

तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामधील प्रमुख किडींचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

  1. सोयाबीन पिकासाठी योग्य हंगाम कोणता?

सोयाबीन पिकासाठी रब्बी आणि खरीप हंगाम योग्य मानला जातो.

  1. सोयाबीन पिकात कोणते कीटक आढळून येतात?

सोयाबीन पिकात पाने गुंडाळणारी अळी, खोडमाशी, चक्री भुंगा, पांढरी माशी व घाटे अळी असे मुख्य कीटक आढळून येतात.

  1. चक्री भुंगा कसा ओळखावा?

चक्री भुंगा किडीचा प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असून, लहान अळी पांढऱ्या रंगाची आणि पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते.

32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ