पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Feb
Follow

सरकारच्या आदेशाला व्यापारांकडून केराची टोपली

वर्धा: गेल्या काही दिवसापासून राज्यातील शेतकरी पिकाचे दर पडण्याच्या कारणाने त्रस्त झाला आहे. दरम्यान कापसाला कमी भाव मिळत असल्याने तो पुन्हा संकटात सापडला आहे. वर्ध्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट व्यापारी करत असल्याचे आता समोर आले आहे. व्यापाऱ्यांकडून शासनाने कापसाचे हमीभाव ठरवून दिले असतानाही हमीभावापेक्षाही कमी दरात कापूस खरेदी केला जात आहे. येथे व्यापाऱ्यांकडून तब्बल पाचशे ते सातशे रुपयांच्या तुटीवर कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ