पोस्ट विवरण
सुने
कृषि
मक्का
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
12 Mar
Follow

अशी करा उन्हाळी मका पिकाची लागवड! (Summer Maize Cultivation!)


नमस्कार शेतकरी बंधुंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

मका, हे भारतातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. मका हे पीक कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. मका हे एक असे पीक आहे की ज्यामधून शेतकऱ्याला अवघ्या दोन-तीन महिन्यात चांगले उत्पादन मिळते. मका पिकाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये देखील होतो त्यामुळे जनावरांच्या खाद्यपदार्थांचा खर्च कमी होतो आणि जनावरांच्या दूधवाढी मधून देखील शेतकऱ्याला चांगले उत्पादन मिळते. मका लागवडीसाठी उन्हाळी हंगाम योग्य मानला जातो. जगात तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात या पिकानंतर मक्याचा नंबर लागतो. निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होण्याची क्षमता असणारे मका हे एकमेव पीक आहे. चला तर मग आजच्या भागात याच बहुपयोगी पिकाची उन्हाळी लागवड कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

उन्हाळी मका लागवडीसाठी योग्य हवामान (Best weather for Maize Cultivation):

  • मका हे पीक उष्ण हवामानाला उत्तम प्रतिसाद देणारे पीक आहे.
  • या पिकाची लागवड उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये करता येते.
  • मका हे उबदार हंगामातील पीक आहे आणि त्याला किमान 100-120 दिवसांचा मोठा हंगाम लागतो.
  • हे 21°C ते 27°C दरम्यान तापमान आणि 600-900 mm वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागात चांगले वाढते.

उन्हाळी मका लागवडीसाठी आवश्यक जमीन (Best soil for Maize Cultivation):

  • मका पिकासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
  • भारी ते मध्यम प्रतीची जमीन उपयुक्त असली तरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये मका लागवड करता येते.
  • जमिनीचा सामू 6.5 ते 7 असावा.

मका लागवडीसाठी योग्य हंगाम (Suitable season for Maize Cultivation):

  • खरीप हंगाम - 15 जून ते 15 जुलै
  • रब्बी हंगाम - 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर
  • उन्हाळी हंगाम - 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी

उन्हाळी मका लागवडीसाठी योग्य वाण (Suitable Varieties):

  • ADV 756 (अ‍ॅडव्हांटा)
  • P3401 (PIONEER)
  • DNH8255 (टाटा)
  • NK 30 (सिजेंटा)
  • P3502 (PIONEER)

पूर्व मशागत:

  • मक्याच्या शेतीसाठी खरीप हंगामा करिता उन्हाळ्यामध्ये मान्सून पूर्व एक नांगरणी करून वखराच्या तीन ते चार पाळ्या द्याव्यात आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
  • वखराच्या शेवटच्या पाळीपूर्वी शेतात एकरी 6 ते 8 गाड्या कंपोस्ट खत टाकावे.

बियाण्याचे प्रमाण:

  • संकरित वाणांच्या लागवडीसाठी एकरी 8 ते 9 किलो बियाणे लागते.
  • क्लस्टर वाणांच्या लागवडीसाठी एकरी 7 ते 8 किलो बियाणे लागते.

बीज प्रक्रिया पद्धत:

  • पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी.
  • याशिवाय 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यावर देखील प्रक्रिया केली जाऊ शकते.

लागवड:

  • मका पिकाची लागवड करायच्या आधी, सरी पाडल्यानंतर जमिनीमध्ये प्रति एकर 10.26.26 (NPK-ईफको) जवळपास चार ते पाच पोती टाकायचे. त्याचबरोबर दोन पोती युरिया देखील टाकायचे. त्यानंतर सरीमध्ये पाणी सोडायचे. पाणी हे ड्रीपने किंवा पाटाने देखील सोडू शकतो.
  • एक दिवस पाणी जमिनीमध्ये योग्य प्रकारे मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी मका पिकाची लागवड करायची.
  • बियाण्यांची लागवड करत असताना आपल्याला चार ते पाच इंच अंतर हे दोघांमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर मग एक-एक दाणा घालून लागवड करायची.

पेरणीची पद्धत:

  • उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी - ओळीतील अंतर 60 ते 75 सें.मी. व दोन रोपात 20 ते 25 सें. मी.
  • लवकर तयार होणाऱ्या जातीसाठी - दोन ओळीस 60 सें. मी. व दोन रोपात 20 सें. मी.
  • सरी वरंब्यावर पेरणी करताना सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला पेरणी करावी.

पाणी व्यवस्थापन:

  • पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी (पिक वाढीची अवस्था)
  • 40 - 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना
  • 75 - 95 दिवसानंतर पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाण्याची पाळी देणे आवश्यक आहे

मका पिकावरील किडी:

  • खोडकिडा
  • गुलाबी अळी
  • कणसे पोखरणारी अळी
  • मावा
  • अमेरीकन लष्करी अळी

मका पिकावरील रोग:

  • फुलोऱ्यापूर्वीचा खोड कुजव्या रोग
  • करपा

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार योग्य वाणाची लागवड केल्यास उन्हाळी मका पिकापासून भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या शेतात उन्हाळी मका पिकाची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. मक्याचे पीक किती महिन्यात येते?

मक्याचे पीक साधारणतः 100 ते 120 दिवसांच्या कालावधीत येते.

2. उन्हाळी मका पिकासाठी योग्य कालावधी कोणता?

उन्हाळी मका पिकासाठी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा योग्य कालावधी आहे.

3. मक्याच्या वाढीसाठी किती तापमान आवश्यक असते?

मक्याच्या वाढीसाठी 21°C ते 27°C तापमान आवश्यक असते.

51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ