सूर्यफुलातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Sunflower : Major diseases and their management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
सूर्यफूल हे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे, हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. सूर्यफुलाची रब्बी, खरीप आणि झैद हंगामात वर्षातून तीनदा पेरणी करता येते. झैद हंगामात, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सूर्यफुलाची पेरणी करणे सर्वात योग्य आहे. झैद हंगामात, रोपांची ओळीपासून ओळीचे अंतर 4 - 5 सेमी आणि रोपापासून रोपाचे अंतर 25 - 30 सेमी ठेऊन पेरणी करा. गेल्या काही वर्षांत सूर्यफुलाची लागवड त्याची उत्पादन क्षमता आणि उच्च मूल्ये यामुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. सूर्यफूल हे महत्त्वाचे गळीतधान्य पीक असून, त्यावर प्रामुख्याने केवडा, तांबेरा, मर आणि पानांवरील ठिपके इ. रोगांचा प्रादुर्भाव होतो. या रोगामुळे उत्पादनात मोठी घट होते म्हणूनच आजच्या आपल्या या भागात आपण सूर्यफुलातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.
पानांवरील ठिपके :
सूर्यफुलाची उशिरा लागवड, अति थंड हिवाळा, तसेच पावसाळी वातावरण हे पानांवरील ठिपके या रोगाच्या वाढीस पोषक आहे.
लक्षणे (Symptoms) :
- पानांवर गर्द तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
- पानांवरील गर्द तपकिरी ठिपक्यांच्या कडांवर पिवले वलय असते असे ठिपके नंतर मोठे होऊन एकमेकांत मिसळतात.
- पानांवर मोठा करपलेला डाग दिसतो.
- झाडाची पाने करपतात, वाळतात व त्यांची गळ होते.
- असेच ठिपके झाडाचे खोड, पानांचे देठ व फुलांवरसुद्धा दिसतात.
नियंत्रणाचे उपाय (Management) :
- प्रादुर्भावग्रस्त झाडांचे अवशेष काढून नष्ट करावेत.
- शक्यतो सूर्यफुलाची लागवड हंगामाच्या सुरुवातीस करावी.
- पुढे पीक अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो.
- ज्या ठिकाणी लागवडी राहिल्या आहेत, तिथे रोगमुक्त बियाणे वापरावे.
- पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
- पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5% (विटावाक्स गोल्ड - धानुका) 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोण्याझोल 10% डब्लूपी + सल्फर 65% डब्लूजी (हरू - सुमिटोमो ) 400 ग्रॅम प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
तांबेरा:
तांबेरा हा सुर्यफुलावरील महत्त्वाचा रोग असून, या रोगामुळे उत्पादनात मोठी घट दिसून येते.
लक्षणे (Symptoms) :
- पानांच्या खालच्या बाजूवर लालसर तपकिरी रंगाची पुरळ दिसते. अशी रोगग्रस्त पाने पिवळी पडून वाळतात.
- कोवळ्या पानांपेक्षा जुन्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो.
- जुन्या पानांवर प्रथम लहान गोलाकार भुकटीसारखे, नारंगी ते काळ्या रंगाचे पुरळ विखुरलेले दिसतात.
- रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास खोड, पानांचे देठ व फुलांच्या भागांवर तांबेरा पडलेला दिसतो. त्यामुळे पाने अकाली गळतात.
- पिकाचे उत्पादन व दाण्यांची प्रत खालावते.
नियंत्रणाचे उपाय (Management) :
- रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांचे अवशेष, गवत व शेतातील काडी कचरा इ. जाळून नष्ट करावा.
- शेतात बिगर हंगामात उगवलेली सूर्यफुलाची झाडे उपटून नष्ट करावी.
- एकाच शेतात सूर्यफुलाचे पीक सतत घेऊ नये.
- लागवडीसाठी तांबेरा रोगास प्रतीकारक्षम जातींची निवड करावी.
- लागवडीसाठी रोगमुक्त व प्रमाणित बियाणे वापरावे.
- सखल जमिनीमध्ये सूर्यफुलाचे पीक घेऊ नये. जमीन निचरा होणारी असावी.
- तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) प्रति एकर 400 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे.
केवडा (डाऊनी मिल्ड्यू):
केवडा रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासूनच होतो.
दमट हवामानात रोगाची वाढ वेगाने होते.
लक्षणे (Symptoms) :
- रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास रोपे मरतात. शेतातील रोपांच्या संख्येत घट होते.
- रोगामुळे झाडाची वाढ भिन्न प्रमाणात खुंटलेली दिसते.
- पाने पिवळसर दिसतात.
- खालील जुन्या पानांपासून वरील कोवळ्या पानांपर्यंत हिरव्या व हरितद्रव्यरहित रंगाच्या छटा पानांवर दिसतात.
- कोवळी पाने मुरडतात.
- पानांच्या मुख्य शिरा हिरव्या नसतात.
- रोगामुळे झाडे खूप खुरटी दिसतात.
- रोगग्रस्त झाडाच्या बुंध्याशी गाठ दिसते.
- रोगामुळे पाने जाड व खोड ठिसूळ बनते.
बीज प्रक्रिया:
- कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5% (विटावाक्स गोल्ड - धानुका) 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- पिकाची लागवड ताटी किंवा मंडप पद्धतीने करावी.
- खेळती हवा, भरपूर सूर्यप्रकाश यामुळे रोगाचे प्रमाण कमी राहते.
- रोगांची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
नियंत्रणाचे उपाय (Management) :
- अझॉक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट) 200 मिली 200 लिटर पाणी फवारणी करावी किंवा
- क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यू पी (सिजेंटा-कवच) 400 ग्रॅम किंवा
- मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 500 ग्रॅम किंवा
- कॉपर ऑक्झिक्लोराईड (क्रिस्टल-ब्लू कॉपर) 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी - उगवण झाल्यानंतर 20 दिवसांनी फवारणी करावी.
- नियंत्रणात्मक उपाय:
- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्सिल 4.0 % + मॅन्कोझेब 64 % डब्ल्यू/डब्ल्यू (सिजेंटा-रिडोमिल गोल्ड) 400 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यातून फवारावे.
- पुढील फवारणी आवश्यकतेनुसार 10 दिवसांच्या अंतराने घ्यावी.
मर रोग:
मर रोगाचा प्रसार जमिनीतून होतो.
लक्षणे (Symptoms) :
- रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडाची मुळे सडतात. झाड मरते. मोठ्या झाडाचे खोड व तबक सडते.
- फुलोऱ्यापासून पीक तयार होईपर्यंत हवेतील या रोगाच्या बीजाणूमुळे तबकालाही रोगाची बाधा होते.
- तबकावर पांढरी बुरशी वाढून संपूर्ण तबक व्यापते.
नियंत्रणाचे उपाय (Management) :
- पिकांची फेरपालट करावी.
- पिकात उथळ कोळपणी करावी.
- जमिनीतील पाण्याचा चांगला निचरा करावा.
- लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
- हेक्झाकॉनाझोल 5% एससी (धनुका-हेक्झाधन) 400 मिली प्रती पंप 200 मिली प्रति एकर पाण्यातून फवारावे.
- कॉपर ऑक्झीक्लोराईड 50% डब्लूपी (क्रिस्टल - ब्लु कॉपर) 400 ग्रॅम 200 ली पाण्यात मिसळून हे द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळांभोवती टाकावे.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुमच्या सूर्यफुलाच्या पिकात वरील पैकी कोणते रोग दिसून आले? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. सूर्यफूल पिकात आढळून येणारे रोग कोणते?
सूर्यफूल पिकात प्रामुख्याने केवडा, तांबेरा, मर आणि पानांवरील ठिपके इ. रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
2. सूर्यफुलाची लागवड कोणत्या हंगामात करता येते?
सूर्यफुलाची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात करता येते.
3. सूर्यफूल परिपक्व होण्यासाठी किती वेळ लागतो?
सूर्यफूल कमी कालावधीत येणारे पीक असून, केवळ 3 महिन्यांत 12 फुटांपर्यंत वाढू शकते. योग्य वाढीच्या परिस्थितीत, सूर्यफूल लागवडीनंतर 70 ते 100 दिवसांत परिपक्व होतात.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ