पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
सूरजमुखी
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
24 Dec
Follow

सूर्यफूल पिकातील तण व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

जागतिक पातळीवर तेलबिया पिकांतील तिसरे महत्त्वाचे पीक म्हणून सूर्यफूलाचे पीक ओळखले जाते. सूर्यफूल हे पीक महाराष्ट्रात वर्षभर घेतले जात असले तरी त्याचे उत्पादन रब्बी हंगामामध्ये अधिक मिळते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, नगर तर विदर्भातील बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांत सूर्यफूल पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोणत्याही पिकामध्ये इतर घटकांमुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा तणामुळे होणारे नुकसान हे जास्त असते. म्हणूनच आजच्या या लेखात आपण सूर्यफूल पिकातील तण व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

तण व्यवस्थापन:

  • पेरणीसाठी वापरावयाचे बियाणे तणविरहित असावे.
  • पाण्याचे पाट, शेतातील बांध किंवा धुरे, कंपोस्टचे खड्डे इ. जवळ तणे उगवू देऊ नयेत व उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावेत.
  • पूर्ण कुजलेलेच शेणखत किंवा कंपोस्ट वापरावे.
  • पीक पेरणीपूर्वी उगवलेली तणे वखराने काढून टाकावीत.
  • सतत स्वच्छता मोहीम राबवावी.
  • शक्‍य असल्यास आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
  • सुर्यफूलाच्या पिकातील तण व्यवस्थापनासाठी प्रथमतः पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी एक खुरपणी करावी.
  • नंतर 20 व 35-40 दिवसांनी कोळपणी करावी.
  • पेरणी नंतर साधारणत 20 ते 25 दिवस पीक तणविरहीत ठेवावे.

वापरावयाचे तणनाशक:

  1. पेंडीमेथालिन 38.7% सीएस (स्वाल-पांडोरा) ची फवारणी घ्यावी.
  • फवारणी कोरड्यात करावी अथवा पाणी दिल्यांनतर तीन दिवसाच्या आत थोडक्यात अंकुर येण्याआधी करावी.
  • एका एकर साठी 8 ते 10 पंप/700 मिली या प्रमाणात फवारणी करावी.
  • या तणनाशकामुळे 30 दिवसांपर्यंतचे नियंत्रण मिळते.
  • पिकावर तणनाशकाची फवारणी होणार नाही याची काळजी घ्यावी.

  1. तसेच पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी ऑक्सीफ्लोरफेन 23.5% ईसी (डाऊ-गोल) 170 मि.ली. ची 400 लिटर पाण्यातून जमिनीवरील फवा-यासाठी फुटपंप अथवा नॅपसॅक पंप वापरून फवारणी करावी.

तुम्ही तुमच्या सूर्यफूल पिकातील तणांवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ