पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
भिंडी
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
6 Dec
Follow

भेंडीमधील "पानांवरील ठिपके" रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापन! (Symptoms and Management of "Leaf Spot" Disease in Okra!)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भेंडीचे उगमस्थान आफ्रिकेमध्ये असून, भारतात भेंडीच्या वेगवेगळ्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. भेंडीचे पीक उष्णकटिबंधीय तसेच उप-उष्णकटिबंधीय प्रदेश आणि उष्ण भागात घेतले जाते. भेंडी परदेशात निर्यातीसाठी उत्कृष्ट बाजारपेठ देते. महाराष्ट्रातील देखील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात भेंडीची लागवड केली जाते. भेंडीला बाजारात वर्षभर चांगली मागणी असल्यामुळे या पिकापासून किफायतशीर उत्पन्न मिळविता येते. भेंडीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रेसर आहे. महाराष्ट्रात भेंडी पिकावर विविध प्रकारच्या किडी व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फळे पोखरणारी अळी, भुरी, केवडा यांचा समावेश आहे. आजच्या आपल्या या लेखात यापैकीच एका महत्वपूर्ण अशा पानांवरील ठिपके या रोगाविषयीची लक्षणे आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पानांवरील ठिपके रोगाविषयी:

हा रोग सारकोस्पोरा तसेच अलटर्निया बुरशीच्या प्रजातीमुळे होतो. पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात. कालांतराने पानावरील ठिपक्यांचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात. आद्र हवामान या रोगाच्या प्रसारास अनुकूल ठरते.

पानांवरील ठिपके (Leaf Spot) रोगाची लक्षणे:

  • सुरवातीला, हिरव्या अस्पष्ट रंगाचे ठिपके पानांच्या खालच्या बाजुला दिसतात.
  • विशेषकरुन जुन्या पानांवर, जी जमिनीच्या जवळ असतात ती रोगाने पहिल्यांदा प्रभावित होतात.
  • फिकट तपकिरी ते राखाडी बुरशीची वाढ प्रभावित पानांच्या पृष्ठभागावर दिसते.
  • जसा रोग वाढत जातो, हे ठिपके वाळतात आणि पानांच्या वरच्या पृष्ठभागावर देखील दिसु लागतात.
  • संक्रमित पाने अखेरीस वाळून गळतात.
  • फांद्या आणि फळांवरही अशीच लक्षणे दिसतात.
  • गंभीर संक्रमणात झाडाची संपूर्ण पानगळ होते.

पानांवरील ठिपके (Leaf Spot) रोगाचे व्यवस्थापन:

  • शिफारशीत अंतरावरच लागवड करावी.
  • पाणी साठू देऊ नये. पाण्याचा योग्य निचरा करावा.
  • पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
  • भोवतालचा परिसर तणमुक्त ठेवावा.
  • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 2.5 ते 5 ग्रॅम प्रतिकिलोने किंवा
  • पेरणीपूर्वी बियाण्यास (कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5%) मिश्र घटक 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) ३०० मिलीची २00 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते किंवा
  • मायक्लोब्युटानिल 10% डब्ल्यू पी (नागार्जुन - इंडेक्स) 100 -150 ग्रॅम/एकरी फवारणी करावी किंवा
  • रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोण्याझोल 10% डब्लूपी + सल्फर 65% डब्लूजी (हरू - सुमिटोमो ) 400 ग्रॅम प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या भेंडी पिकामधील पानावरील ठिपके रोगाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. भेंडी पिकासाठी उपयुक्त हवामान कोणते?

भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे. समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान हे भेंडी पिकासाठी उपयुक्त असते.

2. भेंडी पिकामध्ये आढळणाऱ्या प्रमुख किडी व रोग कोणते?

भेंडी पिकामध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फळे पोखरणारी अळी, भुरी आणि केवडा हे प्रमुख रोग व किडी आढळून येतात.

3. भेंडी पिकातील "पानांवरील ठिपके" रोग कसा ओळखावा?

भेंडी पिकात पानांवरील ठिपके रोग झाल्यास सुरवातीला, हिरव्या अस्पष्ट रंगाचे ठिपके पानांच्या खालच्या बाजुला दिसतात. विशेषकरुन जुन्या पानांवर, जी जमिनीच्या जवळ असतात ती रोगाने पहिल्यांदा प्रभावित होतात. फिकट तपकिरी ते राखाडी बुरशीची वाढ प्रभावित पानांच्या पृष्ठभागावर दिसते. जसा रोग वाढत जातो, हे ठिपके वाळतात आणि पानांच्या वरच्या पृष्ठभागावर देखील दिसु लागतात.

35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ