ऊस पिकामधील पोक्का बोइंग रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापन! (Symptoms and Management of Pokka Boeing Disease in Sugarcane crop!)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्र हा भारतातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांपैकी एक आहे. ऊस हे उष्णकटिबंधीय व बहूवर्षीय पीक आहे. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे हे प्रमुख ऊस उत्पादक जिल्हे आहेत. ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाच्या नगदी पिकांपैकी एक पीक आहे. महाराष्ट्रात ऊस पिकावर विविध प्रकारच्या किडी व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामधील एक महत्वाचा रोग म्हणजे पोक्का बोइंग. ऊस पिकामधील हा रोग पाऊस व पावसामुळे हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात शक्यतो जुलै ते सप्टेंबर या कालावधीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. चला तर मग जाणून घेऊया या रोगाविषयीची माहिती.
पोक्का बोईंग (Pokka Boeing) रोगाविषयी:
- पोक्का बोईंग रोगाचा प्रसार फ्युजॅरीयम मोनिलीफॉरमी आणि फ्युजॅरीयम सॅकॅरी या बुरशीमुळे होतो.
- पोक्का बोईंग हा रोग हवेद्वारे पसरतो.
- मान्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस व पावसामुळे हवेत वाढलेली आर्द्रता यामुळे पानावर हा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
- पावसाळ्यात शक्यतो जुलै ते सप्टेंबर या कालावधीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.
- रोगाची वाढ पावसाळ्याच्या सुरुवातीला उष्ण दमट हवामानात चांगली होते. या काळात ऊसाची वाढ सुद्धा झपाट्याने होत असते.
- तीन ते सात महिन्याचे पीक रोगास बळी पडते. काही काळ हवामान उष्ण, कोरडे व त्यानंतर आर्द्रतायुक्त असल्यास पाने लवकर करपतात.
- हवेतील आर्द्रता 70 ते 80 टक्के, ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस रोग वाढीस अनुकूल असतो.
- रोग कारक बुरशीचे बीजाणू ऊसाच्या पानावर पडून पाण्याबरोबर शेंड्यात जातात. साधारण एक महिन्यानंतर रुजून शेंड्याकडील भागात प्रादुर्भाव करतात.
- कवकतंतू कोवळ्या पानांच्या ऊतीमध्ये शिरल्यामुळे त्या मरतात. त्यानंतर हे कवकतंतू पानातून खोडामध्ये शिरतात.
- रोगाचा दुय्यम प्रसार हवेतील बीजाणू द्वारे होतो.
पोक्का बोईंग (Pokka Boeing) रोगाची लक्षणे:
- रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला शेंड्यापासून येणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या कोवळ्या पानांवर दिसतो.
- पानांच्या खालच्या भागात सुरुवातीला फिक्कट हिरवे, पिवळसर अथवा पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. रोगट पानांचा आकार बदलून त्यांची लांबी कमी होते.
- खोडाकडील भाग आखूड होऊन पाने एकमेकांत गुरफटली जातात. त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत.
- रोगाची तीव्रता जास्त असल्यास कांडी आखूड होते. शेंडा कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात.
- रोगग्रस्त ऊसामध्ये शेंड्याकडील भाग चाबका सारखा वाळलेला दिसून येतो. अग्र भागाच्या ऊती कुजल्यामुळे ऊसाच्या बाजूचे डोळे फुटून वाढलेले दिसतात.
- ऊस वाढीच्या पेशी मेल्यानंतर बुरशी बाजूच्या पेशीमध्ये वाढत राहते, त्यामुळे वरील पाने मर लागलेल्या रोगाप्रमाणे पिवळसर दिसू लागतात.
- शेंडा कूज झालेला ऊस पूर्ववत होत नाही.
पोक्का बोईंग (Pokka Boeing) रोगामुळे ऊसावर होणारा परिणाम:
- ऊसाच्या टोकाकडील काही कांड्याची लांबी कमी झाल्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते.
- पोक्का बोईंग रोगाचे प्रमाण अधिक असल्यास काही जातीमध्ये मर दिसू शकते.
- रोगामुळे उंची, वजन, रसाचे प्रमाण, जाडी, आणि साखरेचे प्रमाण इत्यादी घटकांवर विपरीत परिणाम होतो.
ऊस पिकातील पोक्का बोईंग रोग नियंत्रण:
- निरोगी बियाण्याची लागवड करावी.
- शेंडा कूज झालेले ऊस काढून नष्ट करावेत.
- खालील कोणत्याही एका रासायनिक बुरशीनाशकाच्या प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आलटून पालटून 10 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
- अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% डबल्यु/डबल्यु (देहात - ॲझिटॉप) 200 मिली/200 लीटर पाणी किंवा
- अझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात - सिमपेक्ट) 200 मिली/200 लीटर पाणी किंवा
- कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्लूपी (क्रिस्टल-ब्लू कॉपर)- 160 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या ऊस पिकामधील पोक्का बोइंग रोगाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात ऊस पिकाची लागवड कुठे होते?
ऊसाचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे येथे घेतले जाते.
2. ऊस पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?
ऊस पिकावर प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड, मूळ पोखरणारी अळी, खवले कीड तसेच पोक्का बोईंग, लालकूज, तांबेरा, ऊसाची चाबूक काणी आणि मर रोग यासारख्या प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळतो.
3. पोक्का बोईंग रोगाचा प्रसार कोणत्या बुरशीमुळे होतो?
पोक्का बोईंग रोगाचा प्रसार फ्युजॅरीयम मोनिलीफॉरमी आणि फ्युजॅरीयम सॅकॅरी या बुरशीमुळे होतो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
