पोस्ट विवरण
सुने
कृषि
आलू
कीट
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
22 Nov
Follow

बटाटा पिकातील कटवर्म किटकाची लक्षणे आणि व्यवस्थापन (Symptoms and management of Potato Cutworm)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

बटाटा हे रब्बी हंगामातील महत्वाचे पीक असून, या पिकाची लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे. बटाटा पिकामध्ये आधुनिक लागवड पद्धती, बियाणे निवड प्रक्रिया या बाबींकडे प्रामुख्याने लक्ष दिल्यास पिकापासून मिळणाऱ्या नफ्यात वाढ होऊ शकते. भारतात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड केलेली पाहायला मिळते. बटाट्यामध्ये जीवनसत्त्व ' ब ' आणि ' क ' जास्त प्रमाणात असते. तसेच पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात.  त्यामुळे बटाटा हे शक्तीवर्धक पीक आहे. हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास अल्पावधित अधिक पैसा मिळवून देऊ शकते. मात्र योग्य हवामान, जमीन न मिळाल्यास बटाटा पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी आढळून येतात. त्यातीलच एक महत्वाची व घातक कीड म्हणजे देठ पोखरणारी अळी (कटवॉर्म). कटवॉर्म रात्रीच्या वेळी रोपांचे देठ जमिनी जवळ कुरतडून टाकतो, कोवळी पाने खातो. त्यामुळे रोपे मोठ्या प्रमाणावर मरतात. याच कीटकामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आज आपण बटाटयाच्या पिकातील या प्रमुख कीटकाविषयी व त्याच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

कटवर्मची ओळख (Potato- Identification of Cutworms):

  • कटवर्म सर्वसाधारणपणे दिसायला सारखे असतात.
  • ते खूप कमी केसांसह गुळगुळीत असतात आणि पूर्ण वाढ झाल्यावर सुमारे दोन इंच लांब असतात.
  • मोठे झाल्यावर ते सामान्यत: 'C' आकारात दिसतात.
  • वेगवेगळ्या प्रजाती एकमेकांपेक्षा वेगळ्या दिसू शकतात आणि त्या तपकिरी, गुलाबी, हिरवा, राखाडी किंवा काळा यासारख्या रंगांमध्ये असतात.
  • काही कटवर्म एकसमान रंगाचे असतात तर काही पट्टेदार असतात.
  • काही अळ्या निस्तेज असतात आणि काही चकचकीत किंवा चमकदार दिसतात.
  • कटवर्म हे अळ्यांच्या स्वरूपात असतात.

कटवर्मची लक्षणे (Potato- Symptoms of Cutworms):

  • अळी काळपट रंगाची असून, तिला स्पर्श होताच वेटोळे करून मातीत पडते.
  • अळी रात्रीच्या वेळी रोपांचे देठ जमिनी जवळ कुरतडून टाकते, कोवळी पानेखाते. त्यामुळे रोपे मोठ्या प्रमाणावर मरतात.
  • ही अळी दिवसा वनस्पतीभोवती असलेल्या मातीमध्ये लपते तर, रात्रीच्या वेळी वनस्पतीचे खोड कुरतडते तसेच वनस्पतीची कोवळी पाने व फांद्या खाते त्याचबरोबर पिकामधील आतील भाग देखील खात असल्याने बटाटयाच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होतो त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते.

कटवर्मचे व्यवस्थापन (Management of Cutworms):

  • शेतातील भेगा आणि खड्ड्यांवर असलेल्या अळ्या सकाळी आणि संध्याकाळी हाताने उचलून नष्ट करा.
  • उन्हाळ्याच्या महिन्यांत नांगरणी करा.
  • प्रकाश सापळा लावा.
  • नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी फेरोमोन सापळे 5 एकरी लावा.
  • कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास इमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-Illigo) किंवा
  • थाईमेथोक्सम 12.6 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी (देहात-Entokill) किंवा
  • क्विनालफॉस 25% ईसी (धानुका-धनुलक्स) 600 मिलीची 200 लिटर पाण्यातून प्रति एकर ड्रेंचिंग करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या बटाटा पिकातील कटवर्म किडीचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. बटाटा पिकाची लागवड कधी करावी?

बटाटा पिकाची लागवड खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करावी.

2. बटाट्याचे पीक किती दिवसात येते?

बटाट्याचे पीक 90 ते 100 दिवसांत काढणीसाठी तयार होते.

3. बटाटा पिकात आढळून येणारे मुख्य रोग कोणते?

करपा व खोक्या रोग हे बटाटा पिकात आढळून येणारे प्रमुख रोग आहेत.

34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ