पोस्ट विवरण
सुने
रोग
गेहूं
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
19 Nov
Follow

गहू पिकातील तांबेरा रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापन (Symptoms and management of Rust disease in Wheat crop)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

गहू हे रब्बी हंगामातील सगळ्यात महत्वाचे पिक आहे. भारतातील गहू लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक असून, गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी सु. 30 टक्के क्षेत्र बागायती असून ते मुख्यत्वे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आहे. परंतु  याच गहू पिकाचे सगळ्यात जास्त नुकसान करणारा कोणता रोग असेल तर तो आहे तांबेरा. सुरुवातीच्या काळात नारंगी तांबेरा व नंतरच्या काळात म्हणजेच तापमान वाढल्यानंतर फेब्रुवारी महिन्या अखेरीस काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास दुर्लक्ष केले असता 100 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते आणि उत्पादनात घट होते. म्हणूनच आजच्या आपल्या या भागात आपण गहू पिकातील तांबेरा रोगाची लक्षणे व व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

तांबेरा रोगाविषयी (Wheat Rust Disease)?

  • सुरुवातीच्या काळात नारंगी तर फेब्रुवारी महिन्या अखेरीस काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव गहू पिकावर दिसून येतो.
  • वातावरणात भरपूर आर्द्रता आणि ढगाळ हवामान जर असले तर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
  • गव्हाचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना जर प्रादुर्भाव झाला तर दाण्यावर सुरकुत्या पडून त्यांचे नुकसान होते.

तांबेरा रोगाचा प्रसार व अनुकूल वातावरण:

तांबेरा रोगाचा प्रसार हा पक्सीनिया ट्रिटिकीया बुरशीमुळे होतो. 15 ते 25 अंश सेल्सिअस तापमान व पानावर किमान तीन तास दंव असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

काळा किंवा खोडावरील तांबेरा:

  • काळा किंवा खोडावरील तांबेऱ्याचा प्रसार प्रामुख्याने हवेद्वारे वाहून आणलेल्या बीजाणूमुळे होतो.
  • पानावर किमान सात ते आठ तास ओलावा किंवा दंव साचलेले असल्यास व तापमान 15 ते 24 अंश सेल्सिअस असल्यास रोगाची लागण होते.
  • मात्र तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यावर रोगाचा प्रादुर्भाव खूपच झपाट्याने वाढतो.
  • काळा तांबेरा रोगाच्या वाढीसाठी नारंगी तांबेरा रोगापेक्षा 5.5 अंश सेल्सिअस जादा तापमानाची गरज असते.

तांबेरा रोगाची लक्षणे (Wheat Rust Symptoms) :

  • तांबेरा रोगाच्या प्राथमिक अवस्थेत नारंगी तांबेरा प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर दिसून येतो.
  • या रोगाची लागण झाल्यावर पानावर गोलाकार अंडाकृती आकाराचे लहान-लहान ठिपके दिसून येतात.
  • अनुकूल हवामान असेल तर ठिपक्यांच्या जागी असंख्य बीजाणू तयार होऊन ठिपक्यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगी दिसू लागतो. अशा रोगग्रस्त पानांवरून बोट फिरवल्यास नारिंगी रंगाची पावडर बोटाला लागते.
  • जर गहू पिकामध्ये फुलोरा पूर्वीच्या अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर 80 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते अगदी सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव झाला तर 100 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते.
  • या रोगाचा प्रादुर्भाव पानाच्या खालच्या व वरच्या बाजूवर होतो. परंतु जर अनुकूल हवामान असेल तर याचा प्रादुर्भाव खोडावर, देठावर, गव्हाच्या ओंबीवर
  • आढळून येतो.
  • पानावर रोगाचा प्रादुर्भाव होताच अंडाकृती लंबवर्तुळाकार आकाराचे हरितद्रव्य नष्ट झालेले लहान ठिपके दिसून येतात.
  • रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर याचा प्रादुर्भाव गव्हाची ओंबी व कुसळावर दिसू लागतो.

तांबेरा रोगाचे व्यवस्थापन:

  • तांबेरा रोगास प्रतिकारक्षम गहू वाणाची पेरणी करावी. फुले समाधान, नेत्रावती, गोदावरी, पंचवटी इत्यादी.
  • पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गव्हाला जास्त पाणी दिल्यास पिकात सतत ओलावा टिकून राहतो व आद्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते.
  • युरिया खताचा पुरवठा जास्त करू नये. जर जास्त पुरवठा झाला तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
  • तांबेरा रोगास बळी पडणाऱ्या वाणांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. असा प्रादुर्भाव दिसताच प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) प्रति एकर 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
  • प्रोपिनेब 70% WP (बायर-अँट्राकोल) 600 ग्रॅम 200 लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • सायमोक्सॅनिल 8% + मॅन्कोझेड 64% WP (कोर्टेवा-कर्झेट) 600 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • हेक्साकोनाझोल 4% + झिनेब 68% WP (इंडोफिल-अवतार) 400 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात अझिटॉप) 300 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • अझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात सिमपेक्ट) 200 मिली प्रति 200 लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
  • आवश्यकता भासल्यास पुढील फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या गहू पिकातील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. गहू पिकासाठी अनुकूल हवामान कोणते?

गहू पिकाला थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशीत हवामान चांगले मानवते.

2. गहू पिकासाठी योग्य जमीन कोणती?

पाण्याचा चांगला निचरा होणारी माध्यम ते भारी जमीन गहू पिकासाठी योग्य आहे.

3. गहू पिकाच्या पेरणीसाठी योग्य वेळ कोणती?

जिरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तर बागायती पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.

35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ