पोस्ट विवरण
टोमॅटोमधील विषाणूजन्य रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापन (Symptoms and management of virus disease in tomato)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांपैकी एक आहे. देशातील एकूण टोमॅटो उत्पादनापैकी सुमारे 20 टक्के उत्पादन या राज्यात होते. महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर हे आहेत. खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख फळपिक आहे. मात्र अलीकडे या तिन्ही हंगामात टोमॅटो पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान होत आहे. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण टोमॅटो पिकातील प्रमुख रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रात आढळणारे टोमॅटो पिकातील प्रमुख विषाणूजन्य रोग:
- ग्राउंडनट बड नेक्रोसिस व्हायरस
- टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस
- कुकुंबर मोझॅक व्हायरस
- टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस
टोमॅटो पिकात विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणारे कीटक:
- मावा
- तुडतुडे
- पांढरी माशी
- फुलकिडे
- इत्यादी रसशोषक किडी
ग्राउंडनट बड नेक्रोसिस व्हायरस/शेंडेमर (Groundnut bud necrosis virus):
लक्षणे:
- रोगवाढीच्या सुरुवातीच्या काळात लक्षणे बुरशीपासून होणाऱ्या लवकर व उशिरा येणाऱ्या करपा रोगासारखी दिसतात. त्यामुळे बऱ्याच वेळा रोग ओळखण्यात चूक होते.
- सुरुवात प्रथम शेंड्याकडून होते. शेंड्याकडून नवीन पानांवर प्रथम लहान तांबूस - काळसर ठिपके, चट्टे, तपकिरी वर्तुळे दिसून येतात.
- रोगाचे प्रमाण वाढून तीन - चार दिवसांत कोवळी पाने करपून काळी पडतात.
- रोग पाने, देठ, कोवळ्या फांद्या आणि खोडापर्यंत पसरत जाऊन तपकिरी - काळपट चट्टे पडतात.
- प्रादुर्भाव लागवडीपासून एक महिन्याच्या आत झाल्यास फळधारणा न होता झाड 10 ते 15 दिवसांत करपून मरून जाते.
- उशिरा रोगाची लागण झाल्यास फळांचे काही तोडे होतात. प्रादुर्भाव फळांवरही होतो.
- आकार वेडावाकडा, अनियमित होतो.
- फळांवर पिवळसर - लाल डाग तसेच गोलाकार एकात एक वलये दिसून येतात.
- फळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच पिकतात. त्यांना एकसारखा आकर्षक रंग येत नाही.
- या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिड्यांमार्फत (थ्रिप्स) मार्फत होतो.
टोमॅटो पिकातील चुरडामुरडा रोग (Leaf Curl Virus):
लक्षणे:
- पाने वेडी वाकडी होतात. आकाराने लहान राहून झाडाची वाढ खुंटते.
- नवीन येणारी पानेही अशीच लक्षणे दाखवतात. पानांच्या शिरा आणि कडा पिवळ्या होऊन वरील बाजूने आत वळतात.
- पानांचा आकार चहाच्या कपासारखा दिसतो.
- प्रादुर्भाव झालेली पाने जाड आणि खडबडीत होऊन जांभळ्या रंगाची होतात.
- फळ धारणा होण्यापूर्वीच फुले गळून पडू शकतात.
- या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरी माशी या कीटकामार्फत होतो.
कुकुंबर मोझॅक व्हायरस (Cucumber mosaic virus):
लक्षणे:
- कुकुंबर मोझॅक व्हायरस CMV चा अन्य विषाणूजन्य रोगाच्या तुलनेत सर्वाधिक प्रादुर्भाव होतो.
- पानांवर हिरवट व पिवळे असंख्य ठिपके दिसतात.
- लक्षणे थोड्या फार फरकाने टोमॅटो मोझॅक व्हायरससारखीच असू शकतात.
- अधिक प्रादुर्भावात फांद्यांचा आकार बुटाच्या लेसप्रमाणे किंवा दोरीसारखा होतो.
- या विषाणूजन्य रोगाचा प्रसार मावा या कीटकामार्फत होतो.
- टोमॅटो शिवाय काकडी, शेंगावर्गीय पिके, बटाटा, पपई, केळी, मिरची तसेच जंगली वनस्पती अशा वेगवेगळ्या पिकात या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्यामुळे या रोगाचा पूर्ण बंदोबस्त करणे तसे अवघड जाते
टोमॅटो क्लोरोसिस व्हायरस (Tomato chlorosis virus):
लक्षणे:
- पानावर अनियमित निरनिराळ्या रंगांचे, आकाराचे ठिपके (हरितरोगाची) लक्षणे दिसतात.
- पानांच्या शिरा हिरव्या राहून, दोन शिरांमधील भाग पिवळसर होतो.
- पिवळसरपणा हळूहळू तीव्र होतो.
- या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरी माशी या कीटकामार्फत होतो.
टोमॅटो पिकातील प्लॅस्टिक व्हायरस (Tomato Plastic virus):
लक्षणे:
- फळे कडक होतात.
- फळे पिकत नाहीत.
- फळावर पांढरे, पिवळट डाग व हिरवे चट्टे दिसतात.
- फळाचे आवरण भाजल्यासारखे दिसते.
- फळांचा आकार बिघडलेला दिसतो.
उपाययोजना:
- रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकांचा उपयोग होत नाही. किडीमार्फत होणारा प्रसार थांबवणे हाच उपाय आहे. रोपवाटिकेपासून एकात्मिक पद्धतीने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी:
- चुरडामुरडा रोगास प्रतिकारक किंवा सहनशील जातीचे बियाणे निवडावे.
- रोपवाटिकेत पेरणी करण्यापूर्वी 20 दिवस अगोदर काळ्या किंवा पांढऱ्या प्लॅस्टिकचा पातळ कागद कडक उन्हात गादीवाफ्यावर पसरून ठेवावा. या सौर प्रक्रियेमुळे जमिनीतील बुरशी, जिवाणू व किडींचे नियंत्रण होते.
- गादीवाफ्यावर पेरणी झाल्यानंतर 60 ते 100 मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड 2 मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे गादीवाफ्यास लावावे. यामुळे रोगवाहक किडींना अटकाव होईल.
- सापळा पीक म्हणून लागवडीपूर्वी 50 ते 60 दिवस आधी प्लॉटच्या सर्व बाजूने 5 ते 6 ओळी मका पेरल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण रोखण्यास मदत होते.
- मिरची, बटाटा, वांगी, ढोबळी मिरची या पिकांनंतर टोमॅटो घेऊ नये फेरपालट करावी.
रोपवाटिकेत किडींद्वारे रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुढील कीटकनाशकांची फवारणी करावी. (प्रति २०० लिटर पाणी)
- थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
- पुनर्लागवडीपूर्वी रोपांवर डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- लागवडी वेळेस पांढऱ्या, पिवळ्या किंवा सिलव्हर काळ्या प्लॅस्टिकचा उपयोग मल्चिंग म्हणून केल्यास फुलकिडे, पांढरीमाशीचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते.
- विषाणूजन्य रोगाचा प्रसार काही गवतांमार्फत, फुलझाडांमार्फत होत असल्याने टोमॅटोचे पीक तसेच बांध तणविरहित स्वच्छ ठेवावेत.
- रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे, फळे काढून जाळून नष्ट करावीत.
- पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रति एकर 40 ते 50 पिवळे व निळे चिकट सापळे वापरावेत.
- पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
- पांढरीमाशी, मावा आणि फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी
- डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली किंवा
- इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 40 ग्रॅम किंवा
- थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम ची 200 लिटर पाण्यासह एकरी फवारणी करावी.
- अथवा निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडिरेक्टिन (1500 पीपीएम) 30 मिली. किंवा व्हर्टिसिलीयम (बगीसाईड) अथवा मेटारायझीम ॲनिसोप्ली 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून - पालटून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
टोमॅटोच्या पिकात रोगाचा प्रसार झाल्यास करावयाच्या काही गोष्टी:
- टोमॅटोची शेवटची तोडणी होताच संपूर्ण पीक काढून नष्ट करावे.
- पीक असेच काही दिवस राहिल्यास रोगाचा प्रसार किडींद्वारे नव्या टोमॅटो पिकात होऊने प्रादुर्भाव वाढतो.
- अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे विषाणूजन्य रोगांप्रमाणे लक्षणे दिसून येतात. यासाठी माती परीक्षण करून शिफारशी प्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये, रासायनिक खतांचा संतुलीत वापर करावा.
तुम्ही तुमच्या टोमॅटो पिकामधील विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी योग्य वेळ कोणती?
महाराष्ट्रात टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी हिवाळ्यात ऑक्टोबर ते डिसेंबर आणि पावसाळ्यात जून ते जुलै हा काळ उत्तम असतो.
2. महाराष्ट्रात टोमॅटो पीक घेण्यासाठी आदर्श तापमान श्रेणी कोणती?
महाराष्ट्रात टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी आदर्श तापमान श्रेणी 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.
3. टोमॅटो पिकासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची पोषक द्रव्ये कोणती?
टोमॅटो पिकासाठी लागणारी महत्त्वाची पोषक द्रव्ये म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ