पोस्ट विवरण
सुने
कपास
उर्वरक
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
20 Sep
Follow

कपाशी पिकातील प्रमुख सूक्ष्म पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय (Symptoms and Remedies of Nutrient Deficiency in Cotton Crop)

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

कापसाची पांढरे सोने म्हणूनही सर्वत्र ओळख आहे. कापसाचे उत्पादन 100 पेक्षा अधिक देशांमध्ये घेतले जाते. महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. याच कपाशी पिकाचे सूक्ष्म पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे नुकसान होते. म्हणूनच आजच्या आपल्या या भागात आपण कपाशी पिकातील प्रमुख सूक्ष्म पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे आणि उपाय याविषयी जाणून घेणार आहोत.

बहुतेक वेळा वेगवेगळ्या पिकामधील अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे वेगळी असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कपाशी पिकातील पोषक तत्वांच्या कमतरतेची लक्षणे व उपयांविषयी (Symptoms and Remedies of Nutrient Deficiency in Cotton Crop):

नायट्रोजनची कमतरता (Nitrogen Deficiency):

  • कपाशी पिकाची सर्व पाने पिवळ्या रंगाची होतात, गळतात.
  • कपाशी पिकाची वाढ थांबते.
  • जुनी पाने पक्व होण्याच्या अगोदरचं वाळून जातात.

उपायः

  • 40% Nitrogen (इफको-युरीया) 100 ग्रॅम किंवा
  • 19:19:19 (देहात न्यूट्री - NPK) 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.

फॉस्फरसची कमतरता (Phosphorus Deficiency):

  • फॉस्फरसच्या कमतरतेमुळे कपाशीचे पीक बटू होते.
  • शाखांचे प्रमाण कमी होते.
  • पानांचा रंग हिरवा, निळा, होतो आणि पानांची वाढ थांबून पाने अखूड (अरुंद) राहतात.

उपाय:

  • 18:46:0 (ईफको-डी.ए.पी.) 100 ग्रॅम किंवा
  • 12:61:00 (देहात न्यूट्री - MAP) 75 ग्रॅम किंवा
  • 00:52:34 (देहात न्यूट्री - MKP) 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.

पोटॅशिअम कमतरता (Potassium Deficiency):

  • वाढ चांगली होत नाही.
  • जुनी पाने पिवळी पडुन किनाऱ्यावर कोरडी पडतात आणि नारंगी, पिवळा रंग जुन्या पानांमध्ये दिसु लागतो ज्यात अनेक क्लोरोटिक स्पॉट विकसित होतात जे नंतर मृत, तपकिरी होतात.

उपायः

  • 13:00:45 (देहात न्यूट्री - KN03) - 75 ग्रॅम किंवा
  • 00:00:50 (देहात न्यूट्री - पोटॅशिअम सल्फेट) - 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • पीक लहान असल्यास 00:00:50 वापरू नये.

झिंक कमतरता (Zinc Deficiency):

  • जस्ताच्या कमतरतेमुळे पानामध्ये रंगद्रव्यांचा विकास न करण्याची प्रवृत्ती दिसून येते.
  • मुख्य शिरांबरोबर हरीतद्रव्याचे नुकसान झाल्यामुळे सफेद पट्टे पडल्यासारखे दिसतात.
  • जास्त प्रमाणामध्ये जस्ताची कामतरता असल्यास पेशीसमूहाचा काही भाग मृत होतो आणि पेशींची वाढ थांबते.
  • पाने लहान होतात आणि वर वळतात आणि कपाचा आकार घेतात, पीक झुडुपासारखे दिसते.

उपाय:

  • शेणखतासोबत झिंक सल्फेट मोनोहायड्रेट (देहात न्यूट्री - ZnSO4) 5 ते 7 किलो प्रति एकरी द्यावे.
  • Zn12%-EDTA (देहात न्यूट्री - Zn12%) 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे.

लोह कमतरता (Iron Deficiency):

  • लोह कमतरतेची लक्षणे साधारणपणे नवीन पानावरती दिसून येतात.
  • हरीतद्रव्यांचे प्रमाण कमी होते व फिक्कट पट्टे समांतर ओळींमधून दिसतात.
  • जास्त प्रमाणामध्ये कमतरता असल्यास नवी पाने शिरांसह पूर्णपणे पांढरी पडतात व मुळांची वाढ देखील खुंटते.

उपायः

  • शेणखतासोबत फेरस सल्फेट (देहात न्यूट्री - FeSo4) 5 किलो प्रति एकरी द्यावे.
  • Zn12%-EDTA (देहात न्यूट्री - Zn12%) 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे.

बोरॉनची कमतरता Boron Deficiency):

  • पानांचा आकार विकृत होतो.
  • कळ्यांचे प्रमाण कमी होते.
  • फुले व बिया कमी प्रमाणात तयार होतात.
  • बोरॉन हा परागकणांसाठी आवश्यक घटक असल्यामुळे फुलांमधील फलन प्रक्रिया विस्कळीत होते.
  • अर्धी पिकलेली बोंड पडू लागतात.
  • नवीन कळ्या तयार होणे थांबते, वाढीचा भाग कोमेजून जातो आणि डायबॅकमुळे सुकतो.

उपाय:

  • बेसल डोस देताना चेलट्स बोरॉन 20% (देहात न्यूट्री - बोरॉन 20%) 2 किलो प्रति एकरी द्यावे.
  • चेलट्स बोरॉन 20% (देहात न्यूट्री - बोरॉन 20%) हे 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा 500 ग्रॅम प्रति एकरी ड्रीप मधून 7 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळा सोडावे.

तुमच्या कपाशी पिकामध्ये पोषक तत्वांच्या कमतरतेची कोणती लक्षणे दिसून आली व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. कापसाची लागवड कधी करावी?

कापसाची लागवड मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.

2. कापसाची वेचणी कधी करायची?

कापूस पूर्णपणे परीपक्व झाल्यावर म्हणजेच वाणांच्या परीपक्वतेच्या कालावधीनुसार साधारणतः 145 ते 160 दिवसांत कापसाची वेचणी करवी.

3. कापूस लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?

पाण्याचा निचरा होणारी व जलसंधारणशक्ती उत्तम असणारी मध्यम ते भारी जमीन कापूस लागवडीसाठी उत्तम समजली जाते.

44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ