उन्हाळी हवामानसाठी टोमॅटोचे सर्वोत्तम वाण! (The best tomato varieties for Summer!)

नमस्कार शेतकरी बंधुंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांपैकी एक आहे. देशातील एकूण टोमॅटो उत्पादनापैकी सुमारे २० टक्के उत्पादन या राज्यात होते. महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर हे आहेत. खरीप, रब्बी, उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. म्हणूनच आजच्या या भागात आपण उन्हाळी हवामानासाठी सर्वोत्तम अशा टोमॅटोच्या काही वाणांची माहिती जाणून घेणार आहोत.
सेमिनिस - आर्यमन :
- सेमिनिस - आर्यमन एकसमान आणि आकर्षक गडद लाल, मध्यम व अंडाकृती फळे देणारे उत्कृष्ट वाण आहे.
- हे वाण लांब अंतराच्या वाहतुकीसाठी योग्य फळे देते.
- चांगली उत्पादन क्षमता असलेले लवकर पक्व होणारे हे एक संकरित वाण आहे.
- लागवडीच्या तारखेपासून 55-60 दिवसांनंतर पहिली तोडणी करता येते.
- बियाण्याचे प्रमाण (अंतरावर अवलंबून): 3.5 फूट x 1 फूट (60-70 ग्रॅम/एकर) 4.0 फूट x 1.5 फूट (50 ग्रॅम/एकर)
- पुनर्लागवड: टोमॅटोची रोपे 25-30 दिवसांची आणि 8-10 सेमी उंचीची झाल्यावर किंवा प्रत्येक रोपाला 5-6 पाने असताना त्यांची पुनर्लागवड केली जाते.
सिजेंटा - मेघदूत TO-2048 :
- उत्तम उत्पादन क्षमता असलेले संकरित वाण.
- पानांवरील रोग आणि TYLCV प्रति सहनशील वाण.
- लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी या वाणाचे टोमॅटो परिपक्व होतात.
- 25-30 मेट्रिक टन/एकरी (हंगाम आणि लागवडीच्या पद्धतीनुसार) उत्पादन मिळते.
- बियाणे 40-50 ग्रॅम प्रति एकर वापरावे.
- पेरणीसाठी 180x90x15 सेमी आकाराचे उंच वाफे तयार करावे, 1 एकरसाठी 10 ते 12 वाफे आवश्यक असतात.
- पेरणीनंतर 21-25 दिवसांनी पुनर्लागवड करावी.
- ओळी ते ओळ आणि रोप ते रोप - 120 x 45 किंवा 90 x 45 सेमी अंतर ठेवावे.
BASF - Nunhems US-440 :
- हे वाण 60-65 दिवसांत परिपक्व होते.
- फळांचे सरासरी वजन 80-100 ग्रॅम असते.
- या वाणाच्या फळांचा आकार सपाट गोल असतो आणि फळांना चांगला कडकपणा असतो.
- शेल्फ लाइफ उत्कृष्ट असते.
- TLCV रोगप्रति व उष्ण वातावरणाप्रती सहनशील वाण.
सेमिनिस - अनसल टोमॅटो :
- या वाणाच्या फळांना उत्कृष्ट कडकपणा असतो.
- या वाणाची फळे एकसारखी आणि आकर्षक गडद लाल असतात.
- या वाणाची फळे लवकर पक्व होतात.
- लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी योग्य वाण.
- या वाणाच्या रोपांची वाढ मजबूत होते.
- उबदार वातावरणात सर्वोत्तम कामगिरी करणारे हे वाण आहे.
- बियाण्याचे प्रमाण (अंतरावर अवलंबून) 3.5 फूट x 1 फूट (60-70 ग्रॅम/एकर) 4.0 फूट x 1.5 फूट (50 ग्रॅम/एकर).
- टोमॅटोची रोपे 25-30 दिवसांची आणि 8-10 सेमी उंचीची झाल्यावर किंवा प्रत्येक रोपाला 5-6 पाने असताना त्यांची पुनर्लागवड करावी.
Advanta - Golden Seeds - जयम 2 :
- जयम 2, हे एक अद्वितीय संकरित बियाणे आहे.
- फळांचा आकार चौकोनी गोल/अंडाकृती असतो.
- TYLCV आणि उष्णते प्रति सहनशील.
- हे वाण लवकर पक्व होणारे व उच्च उत्पादन क्षमता असलेले आहे.
- उन्हाळ्यात भरपूर फळे देण्याची क्षमता असणारे हे वाण आहे.
- या वाणाच्या फळांचा आकार एकसमान असल्याने शेतकऱ्यांना ‘अ’ दर्जाची फळे भरपूर मिळतात.
सिजेंटा - साहो TO-3251 :
- साहो टोमॅटो सीड्स हे सिजेंटा कंपनीने विकसित केलेले उच्च-उत्पादन देणारे टोमॅटोचे संकरित बियाणे आहे.
- हे वाण फळांच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखले जाते.
- साहो टोमॅटो वाणामध्ये उष्णता उत्तम प्रकारे सहन करण्याची क्षमता आहे.
- या वाणाची पिकलेली फळे आकर्षक लाल आणि चमकदार असतात.
- फळांचा आकार सपाट गोल व एकसमान हिरवा असतो.
- या वाणाच्या फळांचे वजन 80-100 ग्रॅम असते.
- या वाणापासून सरासरी उत्पादन 25-40 मेट्रिक टन/एकर (हंगाम आणि लागवडीच्या पद्धतीनुसार) मिळते.
- बियाण्याचा दर 40-50 ग्रॅम प्रति एकर असावा.
- पेरणीनंतर 21-25 दिवसांनी पुनर्लागवड करावी.
- लागवड करताना ओळी ते ओळ आणि रोप ते रोप - 120 x 60 सेमी अंतर ठेवावे.
- हंगाम/हवामानानुसार लावणीनंतर 65-70 दिवसांनी टोमॅटो पिकण्यास सुरुवात होते.
- साधारणपणे 4-5 दिवसांच्या अंतराने काढणी केली जाते.
- उन्हाळ्यात साहो टोमॅटोच्या बियांना वारंवार पाणी द्यावे लागते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार योग्य वाणाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या शेतात उन्हाळी हवामानात टोमॅटोच्या कोणत्या वाणाची लागवड करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड कधी करावी?
टोमॅटोची लागवड खरीप हंगामात जून, जूलै महिन्यात, रब्बी (हिवाळी हंगाम) हंगामात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात व उन्हाळी हंगामात डिसेंबर, जानेवारी महिन्यात करावी.
2. महाराष्ट्रात टोमॅटो पीक घेण्यासाठी आदर्श तापमान श्रेणी कोणती?
महाराष्ट्रात टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी आदर्श तापमान श्रेणी 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.
3. टोमॅटो पिकासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची पोषक द्रव्ये कोणती?
टोमॅटो पिकासाठी लागणारी महत्त्वाची पोषक द्रव्ये म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
