पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Aug
Follow

तीन जिल्ह्यांत २० लाख हेक्टरवर खरीप पिके

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील खरिपाच्या सर्वसाधारण वीस लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्रापैकी २० लाख ८४ हजार ४२५ हेक्ट क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९९.७२ टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांतील पावसाची वार्षिक सरासरी ६४६.५३ मिलिमीटर असून महावेधनुसार ८ ऑगस्ट अखेरपर्यंत ४०४.५० मिलिमीटर पाऊस झाला. जो वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत ६२.५६ टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६३७.५० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ३८७.२० मिलिमीटर पाऊस झाला.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ