पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Mar
Follow

तीन जिल्ह्यांत सरासरीच्या 19 टक्केच उन्हाळी पिके

तीन जिल्ह्यांत सरासरीच्या 19 टक्केच उन्हाळी पिके

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालया अंतर्गतच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत उन्हाळी पेरणीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत जवळपास 6 हजार 204 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. ही पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ 19 टक्के इतकी आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे उन्हाळी हंगाम क्षेत्र 14 हजार 903 हेक्टर आहे. प्रत्यक्षात 3042 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात उन्हाळी मका 1402 हेक्टर, बाजरी 1283 हेक्टर, भुईमूग 135 हेक्टर, सूर्यफूल 29 हेक्टर तर 22 हेक्टरवर सोयाबीन क्षेत्र आहे. जालना जिल्ह्यात उन्हाळी पिकाचे सरासरी क्षेत्र 10 हजार 298 हेक्टर असून प्रत्यक्षात 573 हेक्टर क्षेत्रावरच उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात 158 हेक्टर मका, 270 हेक्टर बाजरी, 69 हेक्टर भुईमूग, 58 हेक्टर सोयाबीन तर केवळ 2 हेक्टरवर सूर्यफूल आहे. बीड जिल्ह्यात उन्हाळी पिकाचे सरासरी क्षेत्र 7455 हेक्टर आहे. प्रत्यक्षात 2588 क्षेत्रावरच उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात 288 हेक्टर मका, 1817 हेक्‍टर बाजरी, 330 हेक्टर भुईमूग तर 25 हेक्टरवर सोयाबीन पीक आहे.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ