पोस्ट विवरण
टोमॅटोच्या सुधारित जाती (Toamto : Best Varieties)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामातील पीक पेरणीला मोठा वेग येणार आहे. राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, कांदा, मका, बाजरी अशा विविध पिकांची लागवड करत असतात. यासोबतच खरीप हंगामात टोमॅटो या फळ भाजीपाला पिकाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते. खरीप हंगामात टोमॅटो लागवडीसाठी मे आणि जून महिन्यात रोपवाटिका तयार केली जाते आणि जून किंवा जुलै महिन्यात या रोपांची प्रत्यक्षात पुनर्लागवड होत असते. म्हणूनच आजच्या या भागात आपण टोमॅटोच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
सिजेंटा - अभिनव टोमॅटो बियाणे:
- सिजेंटा अभिनव या टोमॅटो बियाण्याच्या पेरणीचा हंगाम खरीप व रब्बीचा शेवट हा आहे.
- या वाणाचे बियाणे पुनर्लागवड पद्धतीने लावले जाते.
- अभिनव वाणाच्या पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर 4-6 फूट तर दोन रोपातील अंतर 1 फूट ठेवायचे सुचविले जाते.
- परीपक्कव झालेली फळे आकर्षक लाल आणि चमकदार असतात.
- टोमॅटो गुच्छ पद्धतीने लागत असून पहिली तोडणी 60-65 दिवसांत केली जाते.
सेमिनिस - आर्यमान टोमॅटो बियाणे:
- सेमिनिस सीड्स कंपनीचे आर्यमान हे एक संकरित वाण असून लोकप्रिय आहे.
- टोमॅटोचे हे वाण तोडणी साठी थोडे लवकर तयार होते.
- पावसाळी वातावरणात लागवडीसाठी हे वाण अतिउत्कृष्ट मानले जाते.
- आर्यमान वाणाची फळे काढणीसाठी लवकर तयार होतात.
- या वाणाच्या टोमॅटोचे वजन एकसारखे असते.
- टोमॅटोचे प्रति फळ वजन 90 ते 100 ग्रॅम असते.
- फळे अधिक टिकाऊ आणि दूरच्या बाजारपेठेत वाहतुकीसाठी चांगली असतात.
- तसेच रोग प्रतिरोधक क्षमता देखील चांगली असते.
- या वाणापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते.
- राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल असून या जातीची झाडे चांगली मजबूत असतात.
सिजेंटा - मेघदूत टोमॅटो बियाणे:
- मेघदूत या वाणाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते.
- पावसाळी हंगामात लागवडीसाठी हे वाण सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.
- या वाणाची सोलापूर, कोल्हापूर भागात मोठ्या प्रमाणात लागवड होते.
- पावसाळी हंगामासाठी उपयुक्त असणाऱ्या टोमॅटोच्या या वाणापासून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते.
- मेघदूत या टोमॅटो बियाण्याच्या पेरणीचा हंगाम खरीप व रब्बीचा शेवट असून बियाणे पुनर्लागवड पद्धतीने लावले जाते.
- पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर 4-6 फूट तर दोन रोपातील अंतर 1 फूट ठेवायचे सुचविले जाते.
सेमिनिस - अभिराज टोमॅटो बियाणे:
- अभिराज वाणाची फळे अंडाकृती असून, वजन साधारणत 80-90 ग्रॅम असते.
- फळे आकर्षक लाल रंगाची व चमकदार असतात.
- फळाची गुणवत्ता उत्कृष्ट असते.
- फळांची गुणवत्ता विक्रीयोग्य असून किरकोळ विक्रेत्यांद्वारे या वाणाला प्राधान्य दिले जाते.
- टोमॅटोच्या या वाणाची रोपे 25-30 दिवसांची झाल्यावर त्यांची पुनर्लावणी केली जाते.
क्लॉज - रीसिका 225 टोमॅटो बियाणे:
- रीसिका 225 हे टोमॅटोचे वाण महाराष्ट्रात खूपचं लोकप्रिय आहे.
- हे वाण पावसाळी हंगामासाठी म्हणजेच खरीप हंगामात लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट आहे.
- Clause व्हेजिटेबल सीड्स कंपनीचे Rishika 225 हे वाण आपल्या महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त आहे.
- राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष पोषक आहे.
- रीसिका 225 वाणाची मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व आजूबाजूच्या भागात लागवड पाहायला मिळते.
- सरासरी तीन महिन्यात म्हणजेच 90 दिवसात हे वाण कापणीसाठी तयार होते.
- झाडांची ऊंची चांगली असून फळ टणक असते. यामुळे लांबच्या बाजारपेठेसाठी हे वाण फायदेशीर ठरते.
- तसेच टोमॅटो यलो लीफ कर्ल व्हायरसला देखील हे वाण प्रतिकारकक्षम आहे.
ॲडवंटा - जयम 2 टोमॅटो बियाणे:
- ॲडवंटा - जयम 2 या वाणाचे टोमॅटो लांब अंतराच्या वाहतुकीसाठी योग्य आहेत.
- या वाणाचा परिपक्वता कालावधी 60 - 65 दिवसाचा आहे.
- ॲडवंटा - जयम 2 या वाणाच्या फळांचा आकार चौरस गोल तर फळांचे वजन 90-100 ग्रॅम असते.
- रोपांचा रंग एकसमान हिरवा असतो.
- फळांचा रंग गडद लाल असतो.
सेमिनीस - विरंग टोमॅटो बियाणे:
- सेमिनीस - विरंग या टोमॅटो वाणाच्या फळांचा रंग आकर्षक लाल असतो.
- फळाचा आकार लांबट असून फळांचे वजन 90 - 100 ग्रॅम असते.
- सेमिनीस - विरंग या वाणाचे टोमॅटो अधिक टिकाऊ असतात.
- या वाणाची पेरणी पुनर्लागवड पद्धतीने केली जाते.
- या वाणाच्या पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर 90 सेमी, दोन रोपांतील अंतर 45 - 60 सेमी व खोली 1 सेमी ठेवावी.
- सेमिनीस - विरंग या टोमॅटो वाणाची पहिली कापणी 65 - 70 दिवसांत करावी.
आइरिस - केसर टोमॅटो बियाणे:
- आइरिस केसर टोमॅटोचे वाणाची फळे उत्कृष्ट दर्जाची असून लवकर पिकतात.
- या वाणाची फळे लांब वाहतुकीसाठी योग्य आहेत.
- आइरिस केसर टोमॅटो बियाण्याच्या फळांचा आकार अंडाकार असून, रंग गडद लाल असतो.
- या वाणाच्या फळांचे वजन 100 ते 110 ग्रॅम असते तर परिपक्वता कालावधी 58 ते 62 दिवसांचा असतो (प्रत्यारोपणानंतर).
- आइरिस केसर हे वाण बोकड्या रोग आणि जिवाणूजन्य मर रोगाप्रति सहनशील आहे.
- तसेच या वाणासाठी प्रति एकर 60 ग्रॅम बियाणे वापरावे.
Nunhems - युएस ४४० टोमॅटो बियाणे:
- युएस ४४० या टोमॅटोच्या वाणाचा परिपक्वता कालावधी 60-65 दिवसांचा असतो.
- फळांचे सरासरी वजन 80-100 ग्रॅम असून आकार गोल असतो.
- या वाणाचे शेल्फ लाइफ उत्कृष्ट असून या वाणात चांगली रोग प्रतिरोधक क्षमता आहे.
- खरीप आणि रब्बी हंगामासाठी हे वाण योग्य मानले जाते.
सिजेंटा - ६२४२ टोमॅटो बियाणे:
- टोमॅटोचे ६२४२ हे वाण उन्हाळी हंगामात लावण्यासाठी योग्य मानले जाते.
- प्रत्यारोपण पद्धतीने या वाणाची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते.
- या वाणाची पेरणी करताना ओळीपासून ओळीचे अंतर 4-6 फूट, रोप ते रोप अंतर 1 फूट तर पेरणीची खोली 1 सेमी पेक्षा कमी ठेववी.
- टोमॅटोच्या ६२४२ या वाणाची उत्पादन क्षमता चांगली असून फळे देखील उत्तम दर्जाची मिळतात.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार योग्य वाणाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या शेतात टोमॅटोच्या कोणत्या वाणाची लागवड करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड कधी करावी?
टोमॅटोची लागवड खरीप हंगामात जून, जूलै महिन्यात, रब्बी (हिवाळी हंगाम) हंगामात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात व उन्हाळी हंगामात डिसेंबर, जानेवारी महिन्यात करावी.
2. महाराष्ट्रात टोमॅटो पीक घेण्यासाठी आदर्श तापमान श्रेणी कोणती?
महाराष्ट्रात टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी आदर्श तापमान श्रेणी 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.
3. टोमॅटो पिकासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची पोषक द्रव्ये कोणती?
टोमॅटो पिकासाठी लागणारी महत्त्वाची पोषक द्रव्ये म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ