पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
टमाटर
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
21 Feb
Follow

टोमॅटो पिकातील प्लॅस्टिक व्हायरस व्यवस्थापन (Tomato Crop: Plastic Virus Symptoms and Management)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांपैकी एक आहे. देशातील एकूण टोमॅटो उत्पादनापैकी सुमारे 20 टक्के उत्पादन या राज्यात होते. महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर हे आहेत. खरीप, रब्‍बी व उन्‍हाळी या तिन्ही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख फळपिक आहे. मात्र अलीकडे या तिन्ही हंगामात टोमॅटो पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान होत आहे. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण टोमॅटो पिकातील एका घातक व प्रमुख रोगाविषयी म्हणजेच टोमॅटो पिकातील प्लॅस्टिक व्हायरस रोगाविषयी आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

टोमॅटो पिकातील प्लॅस्टिक व्हायरस रोगाची लक्षणे (Symptoms of Tomato Plastic virus):

  • जमिनीत ओलावा वाढल्यास या रोगाचा प्रदुर्भाव झाल्याचे दिसून येते.
  • टोमॅटो कडक होतात.
  • टोमॅटो पिकत नाहीत.
  • टोमॅटोवर पांढरे, पिवळट डाग व हिरवे चट्टे दिसतात.
  • टोमॅटोचे आवरण भाजल्यासारखे दिसते.
  • टोमॅटोचा आकार बिघडलेला दिसतो.

उपाययोजना (Management of Tomato Plastic virus):

  • रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकांचा उपयोग होत नाही. किडीमार्फत होणारा प्रसार थांबवणे हाच उपाय आहे. रोपवाटिकेपासून एकात्मिक पद्धतीने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी:
  • रोपवाटिकेत पेरणी करण्यापूर्वी 20 दिवस अगोदर काळ्या किंवा पांढऱ्या प्लॅस्टिकचा पातळ कागद कडक उन्हात गादीवाफ्यावर पसरून ठेवावा. या सौर प्रक्रियेमुळे जमिनीतील बुरशी, जिवाणू व किडींचे नियंत्रण होते.
  • गादीवाफ्यावर पेरणी झाल्यानंतर 60 ते 100 मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड 2 मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे गादीवाफ्यास लावावे. यामुळे रोगवाहक किडींचा अटकाव होईल.
  • सापळा पीक म्हणून लागवडीपूर्वी 50 ते 60 दिवस आधी प्लॉटच्या सर्व बाजूने 5 ते 6 ओळी मका पेरल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण रोखण्यास मदत होते.
  • मिरची, बटाटा, वांगी, ढोबळी मिरची या पिकांनंतर टोमॅटो घेऊ नये फेरपालट करावी.
  • हा रोग मुख्यतः नागअळी या किडीमुळे पसरतो.

रोपवाटिकेत किडीद्वारे रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुढील कीटकनाशकांची फवारणी करावी. (प्रति 200 लिटर पाणी)

  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
  • पुनर्लागवडीपूर्वी रोपांवर डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • लागवडी वेळेस पांढऱ्या, पिवळ्या किंवा सिलव्हर काळ्या प्लॅस्टिकचा उपयोग मल्चिंग म्हणून केल्यास कीटकांचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते.
  • विषाणूजन्य रोगाचा प्रसार काही गवतांमार्फत, फुलझाडांमार्फत होत असल्याने टोमॅटोचे पीक तसेच बांध तणविरहित स्वच्छ ठेवावेत.
  • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे, फळे काढून जाळून नष्ट करावीत.
  • नागअळी (Tomato Leaf Miner) नियंत्रणासाठी खालील उपाययोजना कराव्यात:
  • क्विनालफॉस 25% ईसी (सिजेंटा-एकालक्स) 400 मिलि 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
  • कार्टॅप हायड्रोक्लोराइड 75% एसजी (धानुका-मोर्टार) 400 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी. किंवा
  • नीम तेल 400 मिली एकरी फवारावे.

टोमॅटोच्या पिकात रोगाचा प्रसार झाल्यास करावयाच्या काही गोष्टी:

  • टोमॅटोची शेवटची तोडणी होताच संपूर्ण पीक काढून नष्ट करावे.
  • पीक असेच काही दिवस राहिल्यास रोगाचा प्रसार किडींद्वारे नव्या टोमॅटो पिकावर होऊने प्रादुर्भाव वाढतो.
  • अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे विषाणूजन्य रोगांप्रमाणे लक्षणे दिसून येतात. यासाठी माती परीक्षण करून शिफारशी प्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये, रासायनिक खतांचा संतुलीत वापर करावा.

तुम्ही तुमच्या टोमॅटो पिकामधील प्लॅस्टिक व्हायरस रोगाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महाराष्ट्रात टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी योग्य वेळ कोणती?

महाराष्ट्रात टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी हिवाळ्यात ऑक्टोबर ते डिसेंबर आणि पावसाळ्यात जून ते जुलै हा काळ उत्तम असतो.

2. महाराष्ट्रात टोमॅटो पीक घेण्यासाठी आदर्श तापमान श्रेणी कोणती?

महाराष्ट्रात टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी आदर्श तापमान श्रेणी 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.

3. टोमॅटो पिकासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची पोषक द्रव्ये कोणती?

टोमॅटो पिकासाठी लागणारी महत्त्वाची पोषक द्रव्ये म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम.

51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ