पोस्ट विवरण
सुने
टमाटर
नाशीजीव प्रबंधन
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
7 May
Follow

टोमॅटो मधील टुटा ॲबसोलुटाचे नियंत्रण (Tomato - Tuta Absoluta)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव अलीकडील काळात वाढत आहे. या किडीची सविस्तर ओळख, नुकसानीची लक्षणे ओळखून एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे. टुटा ॲबसोलुटा या किडीच्या प्रादुर्भावाने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. या किडीमुळे टोमॅटो पिकाचे सुमारे 80-90% नुकसान होते. जेव्हा प्लॉटमध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो तेव्हा कोणतेही कीटकनाशक त्यावर चांगले काम करू शकत नाही, जर तुम्हाला टोमॅटो पिकातील टुटा ॲबसोलुटा किडीचे नियंत्रण करायचे असेल तर प्रतिबंधात्मक उपचारांकडे चांगले लक्ष दिले पाहिजे. जेव्हा वातावरणातील तापमान 20-25 अंश सेल्सिअस दरम्यान असते तेव्हा टुटा ॲबसोलुटा टोमॅटो पिकाचे अधिक नुकसान करते. या किडीचा प्रादुर्भाव, दिवाळी म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान खूप जास्त दिसून येतो. या किडीची नेमकी ओळख करून घेणे व वेळीच उपाय करून ती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. चला तर मग आता जाणून घेऊया टुटा ॲबसोलुटा या किडीविषयी.

टोमॅटो टुटा ॲबसोलुटाचे जीवनचक्र :

  • जर आपण टुटा ॲबसोलुटाचे जीवनचक्र पहिले तर त्यात चार अवस्था असतात अंडी, अळ्या, प्यूपा आणि प्रौढ.
  • एका वर्षात या किडीच्या 10-12 पिढ्या तयार होतात आणि एक जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी अंदाजे 30-35 दिवस लागतात.
  • त्यानंतर या प्युपा अवस्थेतून 9-11 दिवसांत प्रौढ (पतंग) बाहेर पडतो आणि नंतर हा पतंग पानांवर अंडी घालतो.
  • अशा पद्धतीने टुटा ॲबसोलुटाचे जीवनचक्र पूर्ण होते.

पोषक हवामान :

  • टुटा किडीसाठी हिवाळा किंवा खूप उष्ण व कोरडे वातावरण प्रतिकूल असते. त्यामुळे या दिवसांत एक जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी 30 ते 74 दिवस लागतात.
  • कोषावस्थाही दीर्घ होते.
  • त्यामुळे पावसाळ्यात, हिवाळ्यात व अति उष्ण, कोरड्या भागात या किडीचा उपद्रव दिसत नाही.
  • उन्हाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते एप्रिल 28 ते 34 अंश सेल्सिअस तापमान व आर्द्रता 55 ते 60 टक्के हे वातावरण उपद्रवासाठी पोषक असते.
  • त्यामध्ये ही कीड जीवनक्रम 18 ते 22 दिवसांत पूर्ण करते व त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

किडीची नेमकी ओळख :

  • नेहमीची नागअळी, फळमाशी आणि टूटा यांच्या ओळखण्यामध्ये संभ्रम होऊ नये म्हणून पुढील बाबी गोष्टी तपासाव्यात:
  • नेहमीची नागअळी पानांवर नागासारख्या रेषा ओढते. आकाराने ती टूटा किडीपेक्षा खूप लहान असते.
  • फळमाशी फळाला दंश करते. फळ कापल्यावर आतमध्ये लहान सुतके आढळतात.
  • टुटा फळाच्या सालीवर गॅलरी बनवते. पाने गुंडाळते.

टोमॅटो टुटा ॲबसोलुटाची लक्षणे :

  • टुटा ॲबसोलुटा पानांच्या वरील पृष्ठभाग मध्ये सापाप्रमाणे फिरत आपला उदरनिर्वाह करते.
  • जसे - जसे अळी पुढे खात जाते तसे - तसे पाठीमागचा भाग धाग्यासारखा पांढऱ्या रंगाचा दिसतो.
  • ज्या पानावर प्रादुर्भाव झाला आहे त्या पानावर काळी विष्टा सुद्धा दिसते तसेच ते पान नंतर पूर्णपणे वाळले जाते.
  • पान किंवा फळ कापून तपासले असता आत मध्ये पिवळ्या रंगाची अळी दिसून येते.
  • तसेच फळा वरती सुद्धा 3 ते 4 प्रकारची छोटी छोटी ज्वारीच्या दाण्याच्या आकारासारखी ओल किंवा छिद्र दिसतात.

टोमॅटो टुटा ॲबसोलुटाच्या एकात्मिक नियंत्रणाविषयी जाणून घेऊया,

  • जमिनीची खोल नांगरणी करावी म्हणजे जमिनीत राहणारे कोष उन्हाने मरून जातील.
  • नांगरलेली जमीन 2 ते 3 महिने चांगल्या सूर्यप्रकाशात तापवून द्यावी.
  • टुटा ॲबसोलुटा प्रतिरोधक व्हरायटीची किंवा वाणाची निवड करावी.
  • टोमॅटो टुटा ॲबसोलुटा नियंत्रणासाठी 10 ते 15 ट्युटा एब्सोल्युटा ल्यूर आणि डेल्टा ट्रॅप प्रति एकरी लावावे.
  • प्रादुर्भाव ग्रस्त पाने तोडून एका जागेवर जमा करून जाळून टाकावी.
  • अळीने खाल्लेली फळे प्लॉटमध्ये ठेवू नका. ही फळे प्लॉट बाहेर काढा आणि जमिनीखाली खड्ड्यात गाडून टाका.
  • बेसल डोस टाकत असताना त्याबरोबर निंबोळी पेंडचा 200 किलो प्रति एकरी वापर करावा.

रासायनिक नियंत्रण (प्रति लिटर पाणी):

  • टुटा ॲबसोलुटा किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील नियंत्रण:
  • किडीची अंडी तसेच प्राथमिक अवस्था नष्ट करण्यासाठी टोमॅटोच्या रोप लागवडीनंतर जवळ जवळ 10 दिवसांनी सायंट्रानिलिप्रोल 10.26% (FMC-बेनेविया) 30 मिली, नीम तेल 10000 पीपीएम, 1% ईसी (IFC-निम ऑइल) 25 मिली + स्टिकर 4 मिली या प्रमाणात 15 लिटर पाण्यात मिसळून आपल्या टोमॅटो पिकात फवारणीसाठी वापरायचे आहे.
  • पहिल्या फवारणीनंतर 10 ते 12 दिवसांनी आपण हीच फवारणी पुन्हा करू शकतो.
  • टुटा ॲबसोलुटा किडीने टोमॅटो पिकात आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्या नंतर करावयाच्या उपाययोजना:
  • क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% डब्ल्यू/डब्ल्यू एससी (FMC-कोराजन) 6 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % एससी (डाव-डेलिगेट) 18 मिली या मध्ये स्टिकरची मात्रा 4 मिली मिसळून प्रति 15 लिटर पाण्यात द्रावण तयार करून त्याची फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व पिकावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या टोमॅटोच्या पिकामधील टुटा ॲबसोलुटा किडीचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

टोमॅटोमध्ये कोणते रोग व किडी आढळून येतात?

टोमॅटोमध्ये प्रामुख्याने मर, करपा, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तर फळे पोखरणारी अळी, टूटा नागअळी, टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

टुटा ॲबसोलुटा कीड कशी ओळखावी?

टुटा ॲबसोलुटा कीड फळाच्या सालीवर गॅलरी बनवते. पाने गुंडाळते.

टुटा ॲबसोलुटा कीड कोणत्या पिकांचे नुकसान करते?

टुटा ॲबसोलुटा कीड मुख्यत्वे टोमॅटो पिकावर आपली उपजीविका करते. या व्यतिरिक्त मिरची, बटाटा, सिमला मिरची व वांगी या ‘सोलॅनॅनिसी’ वर्गातील पिकांचे देखील ती नुकसान करते.

40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ