पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Apr
Follow

टोमॅटो, कांद्याला कवडीमोल भाव तर झेंडू, शेवंतीच्या फुलांचे दर वाढले

कोल्हापूर: उन्हाळा सुरू झाल्याने काही ठिकाणी बाजारातील स्थिती बदलत चालली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाला बाजारात पालेभाज्यांचे भाव कमी होताना दिसत आहे. या आठवड्यात आवक सुधारली आहे. कांदापात, मेथीचे भाव अन्य भाज्यांच्या बरोबरीत आले आहेत. शेवग्याची आवक चांगली आहे. दहा रुपयाला चार ते पाच शेंगा विक्रीस आहेत. देशी काकडीची आवक जोमात होत आहे. फळबाजारात हंगामी फळांची मागणी वाढताना दिसत आहे. हापूस आंब्याला सध्या मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. बेबी हापूस दाखल झाला असून, याची किलोवर विक्री केली जाते. कलिंगड, टरबूजची मागणी अधिक आहे. फूल बाजारात झेंडू, शेवंतीच्या फुलांचे दर काहीसे वाढले आहेत.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ