पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

तुरीची आवक वाढली! पण दर किती? जाणून घ्या सविस्तर

खरिपात लागवड केलेल्या तुरीची बाजारातील आवक सध्या वाढत असून तुरीला संमिश्र दर मिळत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे. पाच हजार ते 9 हजारांच्या दरम्यान सध्या दर मिळत असून हे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आज पांढरा, लाल, गज्जर या वाणाच्या तुरीची आवक बाजारात झाली होती. जालना येथे उच्चांकी 765 क्विंटल तुरीची आवक झाली होती. सोलापूर, लातूर, दुधणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, करमाळा, औराद शहाजानी या बाजार समित्यांमध्ये विक्रमी आवक झाली होती.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ