पोस्ट विवरण
सुने
अरहर
pigeon pea | तूर
कीट
कृषि ज्ञान
अरहर दाल
कृषी ज्ञान
DeHaat Channel
22 Nov
Follow

तुरीमधील प्रमुख किडींचे व्यवस्थापन

तुरीमधील प्रमुख किडींचे व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

तूर हे पीक महाराष्ट्रात विस्तृत प्रमाणात घेण्यात येते. मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ होत असून महाराष्ट्रात लागवडी खालील जातींचा कालावधी 110 ते 200 दिवसापर्यंतच आहे. याच तूर पिकाच्या उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणारा किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. साठवणुकीमध्येही अनेक किडी तुरीवर स्वतःचे पोषण करतात. परंतु फुले व शेंगावर होणाऱ्या किडींचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरते. कधी कधी जास्त प्रमाणात कीड आल्यास 70 टक्क्यांपेक्षा ही अधिक नुकसान शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून होते. तूर पिकावरील मुख्यतः हिरवी घाटे अळी, पिसारी पतंगाची अळी व शेंगा वरील माशीची अळी अशा तीन प्रकारच्या शेंगा पोखरणाऱ्या किडी आढळतात. चला तर मग आता जाणून घेऊया, या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आणि नियंत्रणाविषयी.

शेंगा पोखरणारी अळी:

 • तुरीचे पीक कळी अवस्थेत आल्यावर शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे तूर पिकाच्या शेंगा धरण्याच्या अवस्थेपासूनच या किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
 • शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीचा प्रादुर्भाव डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरण असल्यास मोठ्या प्रमाणात आढळतो.
 • मोठ्या अळ्या शेंगांना छीद्र करून आतील दाणे पोखरुन खातात.

पिसारी पतंग:

 • पिसारी पतंगाची अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते.
 • ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे खाते. त्यामुळे दाण्याची मुकानी होते.

पाने गुंडाळणारी मरुका अळी:

 • अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळ्यांना चिकटून झुपके तयार करून पिकाचे नुकसान करते.

काय कराल उपाययोजना?

 • वरील किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरिता खालील प्रमाणे उपाययोजना कराव्यात.
 • प्रति एकरी 20 पक्षी थांबे शेतात उभारावेत.
 • पहिली फवारणी पीक 50% फुलोरा अवस्थेत असताना करावी. यामध्ये निंबोळी अर्क 5% किंवा अ‍ॅझाडीरेक्टीन 0.03% ईसी (नीमेक्स) 300 पीपीएम 50 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% ईसी (धानुका-धनुलक्स) 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • दुसरी फवारणी म्हणजेच पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी (धानुका-इ.एम.1) 8 ग्रॅम प्रति 15 लिटर किंवा लम्बाडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी (सिजेंटा-कराटे) 8 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • पाने गुंडाळणाऱ्या मरूका अळीच्या नियंत्रणासाठी फ्लू-बेंडामाईड 20% डब्ल्यूजी (इन्सेक्टीसाईड इंडिया लिमिटेड-सुझुका) 6 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी किंवा नोव्हॅल्युरॉन 5.25% + इंडोक्साकार्ब 4.5% एससी (ब्लॅक पँथर-रुमीकॉन) 22 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

 • तूर पिकावरील प्रमुख रोगांविषयी माहितीसाठी https://dehaat-kisan.app.link/cbkFFGhANEb हे वाचा.
 • वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्रा विषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home
 • त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre

39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ