पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Apr
Follow

‘तुषार-ठिबक’ अनुदानाचे कोट्यवधी रुपये रखडले

अकोला: पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात ठिबक, तुषार संचाचे कोट्यवधींचे अनुदान रखडले आहे. एकट्या बुलडाण्याचे सुमारे 50 कोटींपेक्षा, तर अकोल्यातही साडेतीन कोटींवर अनुदान कधी मिळेल, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. हा निधी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांचा आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. या राजकीय रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला कुणाकडे फारसा वेळ नाही आहे. अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतील हजारो ठिबक, तुषार संचाचे लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत लटकलेले आहेत.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ