पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
अरहर
pigeon pea | तूर
कृषि ज्ञान
अरहर दाल
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
26 Nov
Follow

तूर पिकातील तण व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्वाचे पीक आहे. या पिकाला 21 ते 25 सें.ग्रे. तापमान चांगले मानवते. तूर पिकाच्या लागवडीकरता वापरण्यात येणाऱ्या जमिनित स्फुरद, कॅल्शियम, गंधक या द्रवाची कमतरता नसावी. साधारणतः 6.5 ते 7.5 सामु असलेली जमीन या पिकास योग्य असते. कडधान्यांपैकी, तूर हे एकच पीक आहे ज्याच्या प्रारंभिक वाढीचा दर कमी आहे आणि त्यामुळे वेळेत तणांचे नियंत्रण होत नाही. म्हणूनच आजच्या या लेखात आपण तूर पिकातील तण आणि त्यांच्या नियंत्रणाविषयी जाणून घेणार आहोत.

तूर पिकात मुख्यतः रुंद पानांची वार्षिक तणे व गवतवर्गीय तणे आढळून येतात. पारंपारिक उत्पादन पद्धतीने आंतरपीक घेतल्यास तणांचा प्रादुर्भाव 50 ते 70 टक्के कमी होतो. मका आणि ज्वारीचे आंतरपीक जास्त काळासाठी तण रोखू शकते. लहान हंगामाच्या तुरीसह, वेगाने वाढणारी तृणधान्ये ही आंतरपिके म्हणून घेणे अयोग्य ठरते. तथापि, चवळी, हरभरा, भुईमूग आणि सोयाबीन यांसारखी कमी उंचीची पिके तूर पिकातील तणांची समस्या कमी करू शकतात.

तूर पिकात वापरायची तणनाशके:

  • एलाक्लोर 50% ईसी (बीएएसएफ- अडेक्सर) एकरी 1.6 लिटर किंवा पेंडीमेथालिन 30% ईसी (धानुका-धानुटॉप) एकरी 1.32 लिटर पीक व तणे उगवणीपूर्वी 500 ते 600 लिटर पाण्यातून फवारावे.
  • मेटोलॅक्लोर 50% ईसी (यूपीएल-अमिकस) 0.8 लिटर 400 लिटर पाण्यातून पेरणीनंतर पंरतु बियाणे उगवणीपुर्वी फवारावे. जमिनीवरील फवा-यासाठी फुटपंप अथवा नॅपसॅक पंप वापरावा.
  • परस्युट इमेजेथपायर 10% एसएल + सर्फेक्टेंट 400 मिलीची उगवण झाल्यानंतर एकरी 10-15 दिवसांनी फवारणी करावी.
  • शाकेड प्रोपाक्विझाफॉप 2.5% + इमाझेथापीर 3.75% डब्ल्यू/डब्ल्यू 600 ते 650 मिली एकरी जमिनीत पुरेसा ओलावा असलेल्या तणांच्या 2 ते 4 पानांच्या अवस्थेत लावावे.

हे सामान्य निरीक्षण आहे की तणनाशके तुरीमध्ये हाताने तण काढण्यापेक्षा किंचित निकृष्ट असतात. म्हणूनच, तणनाशक लागू केलेल्या शेतात पेरणी केल्यानंतर 40 ते 45 दिवसांनी हाताने खुरपणी करावी. मेटोलॅक्लोर आणि पेंडीमेथालिन ही तणनाशके तूर पिकासाठी उत्तम दर्शविली गेली आहेत, कारण ती तुरीमधील तण नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या इतर तणनाशकांपेक्षा जास्त काळ प्रभावी राहतात. याविषयी अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

  • तूर पिकातील काही प्रमुख रोगांविषयी माहितीसाठी https://dehaat-kisan.app.link/CZJNFyYsSEb हे वाचा.
  • वरील उत्पादनांची खरेदी करण्यासाठी जवळच्या देहात केंद्राविषयी माहिती जाणून घ्या, येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/hyperlocal_home
  • त्याचबरोबर तणनाशक, कीटकनाशके आणि खते यासारखी उत्पादने घरपोच मिळविण्यासाठी येथे क्लिक करा https://app.agrevolution.in/dehaat-centre

25 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ