सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Apr
Follow
उन्हाळी मूग, तीळ, ज्वारी लागवडीकडे कल
अकोला: वर्षानुवर्षे खरिपात घेतली जाणारी मूग, तीळ, ज्वारी ही पिके आता उन्हाळ्यात घेतली जाऊ लागली आहेत. या वर्षी अकोला जिल्ह्यात या पिकांचे क्षेत्र वाढलेले दिसत आहे. आतापर्यंत पिकांची स्थितीसुद्धा चांगली असल्याने उत्पादनाची अपेक्षा शेतकरी लावून बसलेले आहेत. खरीप हंगामात घेतले जाणारे मूग, तीळ ही पिके गेल्या काही वर्षात कीड रोग, पावसाच्या तडाख्यात सापडत आहेत. यामुळे या पिकांचे लागवड क्षेत्र सातत्याने घटत चालले. याला पर्याय म्हणून शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर या पिकांची उन्हाळी हंगामात लागवड करू लागले आहेत. भुईमुगापेक्षा पीक कमी कालावधीचे असल्याने तसेच कमी पाण्यात येत असल्याने या पिकाचे उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढत आहे.
48 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ