ऊस खोडवा व्यवस्थापन
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
महाराष्ट्रात ऊस लागवडीचे पूर्व, सुरु, आडसाली असे तीन हंगाम आहेत. या तीनही हंगामात ऊस तोडून घेल्यानंतर त्यापासून खोडवा धरला जातो. खोडवा पीक घेणे शेतकरी आणि कारखांदार या दोघांनाही आर्थिक दृष्ट्या फायदा करून देते. ऊस लागवडीसाठी जेवढ लक्ष आपण देतो तेवढ लक्ष खोडवा ऊस पिकाला दिल्यास, नक्की जास्त उत्पादन मिळू शकते.
खोडवा पीक घेण्याचे फायदे:
- खोडवा पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.
- लागवड ,बेणेप्रक्रिया, मशागती वरील खर्च वाचतो.
- फुटवा लवकर येतो.
- पाचट आसल्यामुळे जैविक खत मिळते आणि तणांचा बंदोबस्त होतो.
खोडव्याचे उत्पादन कमी येण्याची कारणे:
- 15 फेब्रुवारी नंतर खोडवा धरणे.
- ऊसाचे पाचट जाळणे.
- पाणी आणि खत नियोजन नसणे.
- कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव.
खोडवा ऊस राखण्याची योग्य वेळ:
- ऑक्टोबर पासून मे पर्यंत तोडणी चालते.
- परंतु 15 फेब्रुवारी नंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास उत्पादनांत घट येते कारण फेब्रुवारी नंतरच्या अधिक तापमानामुळे खोड किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि पाण्याचा ताण पडल्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते.
खोडवा पीक घेताना काय काळजी घ्यावी:
जाती:
- अधिक उत्पादनक्षम, रोग, किडींना कमी बळी पडणारी व फुटव्यांची क्षमता जास्त असलेल्या जातींची खोडव्यासाठी निवड करावी.
- उदा. को-86032, को-एम-265, को-8040, को-7219, को-8014, को-युएआय 9805 इ. जाती खोडव्यासाठी उत्तम.
खोडवा पिकातील पाचट व्यवस्थापन:
- यंत्राच्या साहयाने पाचट बारीक करून घ्यावे किंवा सरीत दाबून द्यावे.
- एक हेक्टर मधून 8 ते 10 टन पाचट मिळते. या पाचट मध्ये - नत्र (नीम कोटेड-उज्वला)- 40 ते 50 किलो, स्फुरद (रामबाण-ज्युबिलंट) - 20 ते 30 किलो, पालाश (एमओपी-आयपीएल)- 75 ते 100 किलो आणि सेंद्रिय कर्ब - 3 ते 4 किलोग्रॅम. पाचट कुजवण्यासाठी - युरिया (ईफको) - 80 किलो, सिंगल सुपर फास्फेट (महाधन) - 100 किलो सम प्रमाणात पसरून पाणी घ्यावे.
- पाणी देण्याच्या अगोदर फास्ट डी - पाचट कुजवणारे जिवाणू 1 ते 2 लिटर प्रति एकरी पाचटावर फवारणी करावी.
बडख्याची छाटणी व काळजी:
- ऊस तुटल्यानंतर शेतात पडलेली कांडी गोळा करून घ्यावी.
- तोडणीनंतर बुडख्यावर असलेले पाचट सरीमध्ये लोटावे, बुडखे उघडे करावेत, जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतील. तोडणीवेळी जमिनीलगत तोड झाली नसल्यास आणि ऊसाचे बुडखे मोठे राहिल्यास धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत.
- ट्रॅक्टर यंत्राद्वारे बुडखा छाटणी आणि पाचटाचे तुकडे करणे ही कामे सुलभरीत्या करणे शक्य झाले आहे. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो.
- फुटव्यांची एकूण संख्या वाढते.
- बुडख्याच्या छाटणीनंतर 1 ग्रॅम कार्बेन्डाझिम (यामाटो-ईफको एमसी) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.
बगला फोडणे:
- ऊस लागणीवेळी मोकळी व सच्छिद्र असणारी जमीन घट्ट व टणक बनते. अशी घट्ट व टणक झालेली जमीन मोकळी करण्यासाठी सरीच्या बगला फोडणे गरजेचे असते.
- त्यामुळे हवा खेळती राहते, खोडव्याच्या नको असलेल्या मुळ्या तुटून जातात.
- नवीन मुळ्याची वाढ होते.
खत व्यवस्थापन:
- खोडवा ऊसाची चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि हलके पाणी अतिशय महत्त्वाचे असते.
- त्यासाठी ऊस तुटल्यावर 15 दिवसांच्या आत फोडलेल्या बगलात एकूण शिफारशीच्या खतांपैकी एकरी 75 किलो युरिया (ईफको), 150 किलो सिंगल सुपर फास्फेट (महाधन) व 50 किलो पोटॅश (एमओपी-आयपीएल) किंवा 100 किलो 10:26:26 (एनपीके - ईफको), 50 किलो युरियाची मात्रा सरीच्या बगलेत द्यावी.
- खते माती आड करून पाणी द्यावे.
- पहिल्या मात्रेनंतर 6 आठवड्यांनी युरियाची दुसरी मात्रा एकरी 75 किलो द्यावी.
- उर्वरित मात्रा एकरी 100 किलो युरिया (ईफको), 150 किलो सिंगल सुपर फास्फेट (महाधन) व 50 किलो पोटॅश (एमओपी-आयपीएल) किंवा 100 किलो 10:26:26 (एनपीके - ईफको) व 75 किलो युरियाची मात्रा भरणीवेळी द्यावी.
- ठिबक सिंचनाचा वापर करत असल्यास शिफारशीत मात्रेपैकी 60 टक्के स्फुरद जमिनीतून द्यावा.
- उरलेली सर्व मात्रा ठिबकमधून फर्टिगेशन तंत्राने द्यावी.
- (टीप - दर 15 दिवसांनी एकरी 8 किलो मॅग्नेशियम सल्फेट (एमजीएसओ४-देहात न्यूट्री) व 250 ग्रॅम चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेनुसार द्यावीत.)
तुम्ही खोडवा पिकाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ