पोस्ट विवरण
सुने
ईख
कीट
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
31 Jan
Follow

ऊस पिकातील खोडकिडा व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

राज्यात ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख २५ किडींपैकी खोड कीड ही अत्यंत महत्त्वाची कीड आहे. ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत पाण्याची कमतरता भासल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात येऊ शकतो. वाढलेल्या तापमानात आणि हलक्‍या जमिनीत या किडीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. ही कीड वनस्पतीच्या खोडात राहून आतील भाग खाऊन नुकसान करते. या किडीच्या अळ्या फुटव्याच्या मधल्या पोंग्यात शिरून आतील भाग खातात त्यामुळे पोंगे वाळू लागतात. खोड किडीचा प्रादुर्भाव खोडवा पिकातही जास्त प्रमाणात असतो. खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व, जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात खोडातून बाहेर येतात. महाराष्ट्रात या किडीचा प्रादुर्भाव आडसाली (जुलै-ऑगस्ट) ते सुरू (फेब्रुवारी) लागवडीपर्यंत आढळतो.

खोड कीड कशी ओळखायची?

 • अंड्यातून नुकत्याच बाहेर आलेल्या अळ्या मऊ पेशींवर राहतात. नंतर या अळ्या खोडाच्या आत शिरुन उगवणाऱ्या कोंबाला 7-8 दिवसांत खाऊन टाकतात. त्यामुळे 12-18 दिवसांत आपणास पिकावर पोंगा मर दिसतो.
 • या किडीचा प्रादुर्भाव फुटव्यावर व लागवडीपेक्षा खोडवा पिकात अधिक प्रमाणात दिसून येतो.
 • सुरू लागवड जेवढी उशिरा होईल, त्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.
 • या किडीमुळे नुकसान झालेले ऊसाचे पीक विरळ दिसते.
 • खोड किडीचा नुकसान कालावधी हा ऊस उगवणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत (साधारणतः 4 महिने) दिसून येतो.

खोड किडीचा जीवनक्रम:

1) अंडी -

 • मादी पतंग हिरवीगार व टोकाकडे वाकलेल्या पानांवर अंडी देतात.
 • या किडीची अंडी उसाच्या जमिनीलगतच्या तीन हिरव्या पानावरील मध्यशिरेजवळ आढळतात.
 • या किडीचा अंडी अवस्था 3 ते 6 दिवस राहते.

2) अळी -

 • अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीच्या अंगावर नारंगी रंगाचे पट्टे असतात.
 • ती अळी रात्रीच्या वेळी ऊसाच्या कोवळ्या पानावर उपजीविका करते. परिणामी ऊसात पोंगा मर आढळतो.
 • अळी अवस्था 22 ते 31 दिवस राहते.

3) कोष -

 • कोष खोडामध्ये (पोंग्यात) तयार होतात.
 • हे कोंब लांब, पिवळसर ते तपकिरी रंगाचे दिसतात.
 • ही अवस्था 5-9 दिवस राहते.

4) पतंग -

 • या किडीचा पतंग शक्‍यतो सूर्योदयापूर्वी बाहेर पडतो.
 • प्रौढ अवस्था 5-9 दिवस राहते.

प्रतिबंधात्मक उपाय :

 • हलक्‍या जमिनीत ऊसाची लागवड टाळावी.
 • सुरू ऊसाची लागवड 15 फेब्रुवारी पूर्वीच करण्याचे नियोजन करावे.
 • बेणे मळ्यातील निरोगी व कीड विरहीत बेण्याची निवड करावी.

खोड किडीचे नियंत्रण व्यवस्थापन:

 • पाण्याच्या पाळ्या जर वेळेवर देता येत नसतील, तर पाचटाचे योग्य प्रकारे मल्चिंग करणे अवश्‍य असते. त्यामुळे देखील खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
 • बाळ भरणीच्या वेळी खतांचा डोस देताना - देहात स्लायमाईट 8 किलो प्रति एकर त्यामध्ये मिसळून द्यावे.
 • ऊसामध्ये मका, ज्वारी व गहू ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत.
 • ऊस लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी 2 फुले ट्रायकोकार्ड प्रति एकर या प्रमाणात साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या अंतराने शेतामध्ये लावावेत.
 • क्लोरोपायरीफॉस 20 % @1 लिटर प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर या प्रमाणात ड्रीप वाटे सोडावे किंवा पाटाच्या पाण्याने सोडल्यास सुद्धा किडीचे व्यवस्थापन होते.
 • खोडकीडग्रस्त वाळलेला पोंगा उपसून काढून नष्ट करावा.
 • शेतात एकरी 5 कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या 1 फूट वर लावावे.

तुमच्या ऊसाच्या पिकात खोड किडीची कोणती लक्षणे दिसत आहेत का? तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. आणि हो, ऊस पिकातील तण व्यवस्थापनाविषयी माहितीसाठी https://dehaat-kisan.app.link/elMzzUnPKGb हे वाचा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ