पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
ईख
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
21 Jan
Follow

ऊस पिकातील तण व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड व रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानी एवढेच आहे. ऊस वाढीच्या अवस्थेत तणांचा बंदोबस्त न केल्यास उत्पादनामध्ये 10 ते 20 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. ऊसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची गतवर्गीय तणे आणि घेळ, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची गवतवर्गीय तणे आढळतात. ऊस बागायती पीक असल्यामुळे पिकाला वारंवार पाणी पाणी दिलं जातं पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास तिथे बेसुमार तणांची वाढ होत राहते याच तणांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे म्हणूनच आजच्या या लेखात आपण ऊस पिकातील तण व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

प्रतिबंधात्मक उपाय :

  • जमिनीची पूर्वमशागत म्हणजेच नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी इ. मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करावीत.
  • पूर्वीचे पीक निघाल्यानंतर राहिलेली तणे, धसकटे वेचून जाळून नष्ट करावी.
  • खतांची मात्रा शिफारसी प्रमाणे वापरावी.
  • गाजरगवतसारखी तणे बी येण्यापूर्वीच उपटून टाकावीत.
  • आडसाली तसेच पूर्वहंगामी लागवड केलेल्या ऊसातील तण नियंत्रणासाठी सुरुवातीला बाळबांधणी सारखी आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे.
  • तसेच ऊस पिकातील लांब आणि रुंद पानांच्या तणांसाठी तण 2 ते 4 पाने अवस्थेत असताना अमेट्रीने 80% डब्ल्यूडीजी (अदामा-तमर) 1 किलो सोबतच 2-4-डी अमीन साल्ट 58% एस एल (धानुका-वीडमार सुपर) @1 लिटर प्रति 150 पाणी याप्रमाणे घेऊन एकरी फवारणी करावी.
  • तणनाशकाची फवारणी करताना फ्लॅट पॅन अथवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा आणि तणनाशकांचे द्रावण तयार करताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा.
  • ऊस पिकामध्ये तण नियंत्रणासाठी टाटा मेट्री म्हणजेच मेट्रीब्युझीन 70% डब्ल्यू.पी. (टाटा रैलिस-टाटा मेट्री) या तणनाशकाची शिफारस केली आहे. अरुंद व रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी ऊस-उगवणीपूर्वी 400-500 ग्रॅम/एकर व उगवणीनंतर 300 ग्रॅम/एकर या प्रमाणात वापरावे.

तणनाशके फवारताना खालील गोष्टींची काळजी घ्या :

  • तणनाशकाचा वापर शिफारशीनुसार व वेळेवर करावा.
  • तणनाशक फवारताना द्रावण सतत ढवळावे. संपूर्ण क्षेत्रावर एकसारखे तणनाशक फवारावे.
  • तणनाशकाची सर्वत्र समान दाबाने फवारणी करावी.
  • तणनाशक फवारल्यानंतर तीन ते चार दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये.

तुम्ही तुमच्या ऊस पिकात तण व्यवस्थापन कशाप्रकारे करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ