पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Jan
Follow

ऊसतोड मजुरांसाठी खूशखबर! ऊसतोडणी दरात 34 टक्के वाढ

पुणे : ऊसतोड कामगारांच्या तोडणी दरामध्ये वाढ करावी आणि मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी ऊसतोड संघटना आणि कामगारांचे मागील अनेक दिवसांपासून आंदोलने सुरू होते. साखर महासंघ, सरकारी प्रतिनिधी आणि आंदोलकांच्या आजच्या बैठकीनंतर या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे.

दरम्यान, ऊसतोडणीसाठी ऊसतोड मजुरांना प्रतिटन 238 रूपये मिळत होते. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून या दराच्या 34 टक्के रक्कम वाढीव मिळणार आहे. त्याचबरोबर मुकदमांच्या कमिशनमध्ये 1 टक्क्यानी वाढ करण्यात आली असून ते आता 20 टक्के करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ऊसतोड मजुरांना फायदा होणार असून आंदोलकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.


61 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ