पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 July
Follow

विधानसभेपूर्वी १३ सहकारी साखर कारखान्यांना दिलासा, १ हजार ८९८ कोटींचे कर्ज मंजूर

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना कर्जरुपी दिलासा दिला आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील सहकारी साखर कारखान्यांना १ हजार ८९८ कोटींचा कर्जरुपात बुस्टर डोस दिला आहे. १३ सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम विभागाकडून हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. आठ वर्षांच्या मुदतीने हे कर्ज देण्यात आले असून, त्याची वेळेत परतफेड न केल्यास दोन टक्के अतिरिक्त दंडही आकारण्यात येणार आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ