पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Dec
Follow

व्यावसायिक महामार्गासाठी एकरी दोन कोटी भरपाई द्या, शेतकरी आक्रमक

सांगली : व्यावसायिक महामार्गांसाठी जमिनी घेताना दोन कोटी रुपये प्रतिएकर भरपाईसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, आदी महापालिका क्षेत्रात चार कोटी रुपये भरपाईची मागणी केली जात आहे. राज्यभरातील विविध महामार्गांमध्ये शेतजमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर यासाठी मोर्चाही काढला. जमिनीला बिगरशेती दराने प्रतिएकरी किमान दोन कोटी रुपये भाव देण्याची मागणी केली. राजन क्षीरसागर, दिगंबर कांबळे, राजाभाऊ चोरगे, बाळासाहेब मोरे, नारायण विभूते, आदी आंदोलकांनी सरकारसोबत तीव्र संघर्षाचा इशारा दिला.


51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ