पोस्ट विवरण
कलिंगड: फळमाशी कीटकामुळे होणारे नुकसान आणि प्रतिबंधात्मक पद्धती (Watermelon: Fruit Fly: pest damage and preventive methods)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
कलिंगड हे उष्ण आणि कोरड्या उन्हाळ्याच्या महिन्यांत उगवणारे ताजेतवाने आणि गारव्याचे पीक आहे. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे 660 हेक्टर क्षेत्रावर केली जाते. कलिंगडाचे पीक हे उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि जळगाव अशा ठिकाणी केली जाते. महाराष्ट्रात कलिंगडाचे सर्वाधिक उत्पादन हे जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत घेतले जाते. योग्य हवामान, जमीन न मिळाल्यास कलिंगडाच्या पिकामध्ये विविध प्रकारच्या किडी आढळून येतात. कलिंगड हे पिक कीड व रोगास फारच संवेदनशील आहे. किडींमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आज आपण कलिंगडाच्या पिकातील प्रमुख अशा फळमाशी या किडीविषयी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
फळमाशीची (Fruit Fly) ओळख:
- फळमाशी रंगाने पिवळसर तांबूस असते.
- फळमाशीची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशी सारखी दिसते व साधारण पाच ते सहा मी. मी. लांब असते.
- फळमाशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब असतात.
फळमाशी जीवनक्रम:
- नर आणि मादी फळमाशीचे मिलन होते व त्यानंतर मादी फुलोऱ्यात आलेल्या पिकामध्ये आढळून येते.
- एकदम कळीतून बाहेर आलेल्या छोट्या अशा फळावर फळमाशीची मादी डंख मारते आणि आतमध्ये अंडी घालते.
- एक दोन दिवसात म्हणजेच अंडी घालण्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यामधून अळी बाहेर येते व फळाच्या आतमध्येच वाढ चालू होते.
- जसे जसे फळ मोठे होईल तसतसे आतमध्ये अळी पण मोठी होत जाते आणि फळ आतून खायला सूरवात करते.
- अळी चा कालावधी संपल्यानंतर अळी फळातून बाहेर जमिनीत पडते व कोषावस्थे मध्ये जाते ज्यातून पुन्हा नवीन प्रौढ फळमाशी तयार होते.
फळमाशीची लक्षणे (Symptoms):
- फळमाशीची एक मादी संपूर्ण जीवन काळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते.
- त्यामधून चार ते पाच दिवसात किंवा सात दिवसात अळ्या बाहेर पडतात.
- या बाहेर पडलेल्या अळ्या फळांच्या गरावर उपजीविका करतात व फळे कुजवतात.
- या अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांना अकाली पक्वता येते तसेच फळांमध्ये अळ्या पडतात अशी फळे वेडीवाकडी होतात व फळगळ होते.
फळमाशीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन:
- जमिनीची नांगरट करून जमीन चांगली तापू देणे गरजेचे असून त्यामुळे या अळीचे कोष उष्णतेत नष्ट होतात.
- शक्यतो फळमाशीला प्रतिकारक असणाऱ्या जातींची लागवड करावी.
- फळमाशी ग्रस्त बागेत पडलेली फळे गोळा करून ती नष्ट करून टाकावी किंवा लांब नेऊन त्यांचा नायनाट करावा.
- बागेमध्ये कामगंध सापळे एका एकरसाठी 15 ते 20 लावावे.
- फळधारणा जेव्हा होईल तेव्हा पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टरीन (1000 पीपीएम) 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यासोबतच तज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक नुकसानीची पूर्वसंकेत पातळी पाहून शिफारशीप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांची फवारणी घेणे गरजेचे आहे.
उपाय (Remedy):
- शेतात कामगंध सापळे एका एकरसाठी 15 ते 20 लावावे.
- फ्लुबेंडियामाइड 90 + डेल्टामेथ्रिन 60 एससी (बायर-फेनोस क्विक)100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- सायंट्रानिलिप्रोल 10.26% डब्ल्यू /डब्ल्यू ओडी (एफएमसी-बेनेविया) 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- फ्लुबेंडिएमाइड 39.35% एम/एम एस.सी (बायर-फेम) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- फ्लुबेंडियामाइड 20% डब्ल्यूजी (टाटा-ताकुमी) 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
कीड नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणीच्या वेळी लक्षात ठेवायच्या गोष्टी:
- फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
- फवारणीसाठी वापरण्यात येणारे पाणी हे 6.5 ते 7.5 पीएच चे असावे.
- फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा आहे याची खात्री करून घ्यावी.
- फवारणी करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
- फवारणी मिश्रणामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नयेत.
तुमच्या पिकात फळमाशीची कोणती लक्षणे दिसून आली? व तुम्ही काय उपाययोजना केल्या? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रात कलिंगडाचे सर्वाधिक उत्पादन कुठे घेतले जाते?
महाराष्ट्रात जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत कलिंगडाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
2. कलिंगड पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?
कलिंगड पिकावर प्रामुख्याने मोझॅक व्हायरस, भुरी रोग, करपा, केवडा रोग, मर रोग तसेच मावा, फळमाशी, फुलकिडे, पांढरीमाशी आणि नाग अळी यासारख्या प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळतो.
3. कलिंगड पिकात कीड नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणी कधी करावी?
कीड नियंत्रणाच्या दृष्टीने फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ