पोस्ट विवरण
पिकांची काढणी झाल्यानंतर तण व्यवस्थापन (Weed management after crop harvesting)
नमस्कार शेतकरी बंधुनो,
तणांचा अप्रत्यक्ष परिणाम पिकाच्या वाढीवर होतो तसेच उपलब्ध आकडेवारीनुसार एक तृतीयांशपेक्षा जास्त उत्पादनातील घट ही केवळ तणांमुळे येते. तसेच तणामुळे केवळ पीक उत्पादनच घटत नाही तर तणांच्या प्रादुर्भावामुळे कृषि उत्पादनाची गुणवत्ता, जैव विविधता, मनुष्याचे व जनावरांचे आरोग्य या गोष्टींवरही विपरीत परिणाम होतो. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण पिकांची काढणी झाल्यानंतर करावयाच्या तण व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
तणांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत ते म्हणजे:
1) एकदलवर्गीय – शिप्पी, लोना, मरड, घोडकात्रा, पंदाड, हराळी, कुंदा, लव्हाळा, विंचू चिमणचारा.
2) द्विदलवर्गीय – दीपमाळ, दुधी, नाठ, कुंजरू, काठेमाठ, माका, हजारदाणी, तांदुळजा, पेटारी, रानताग, उंदीर काणी, शेवरा, चिमटा, रानएरंडी, गाजर गवत, बरबडा, कुरडू, टाळप, पाथर, चांदवेल, चंदनबटवा इ.
पिकांची काढणी झाल्यानंतर वापरायची तणनाशके:
- एट्राजीन 50% डब्लूपीची (एट्राफोर्स- देहात ) 400 ते 800 ग्रॅमची सर्व प्रकारच्या तणांवर एकरी 800 ते 1600 ली पाण्यातून फवारणी करावी.
- किंवा एलाक्लोर 50% ईसीची (स्वाल-स्वच्छ) 1600-2000 मिली वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानांच्या तणांसाठी एकरी 200- 300 ली पाण्यातून फवारणी करावी.
- पेंडीमेथालिन 30% ईसीची (यूपीएल - दोस्त) 700-1000 मि.ली. वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानांच्या तणांसाठी एकरी 300 ली पाण्यातून फवारणी करावी.
- मेट्रिबुझीन 70% डब्लूपीची (टाटा रैलिस-टाटा मेट्री) 140 ग्रॅम जंगली ओत, केना गवत, रुंद पानांच्या तणांसाठी एकरी 200-300 ली पाण्यातून फवारणी करावी.
- पेंडीमेथालिन 30% ईसीची (देहात - पेंडिक्स) 1400 ते 1600 मि.ली. रुंद पानांच्या तणांसाठी व वार्षिक गवतवर्गीय तणांसाठी एकरी 200 ते 400 ली पाण्यातून फवारणी करावी
- ऑक्सिफ्लोरफेन 23.5 % ईसी (युपीएल-अमिगो) 160 ते 200 मिली रुंद पानांची तणे व वार्षिक गवतवर्गीय तणांसाठी एकरी 200 - 300 ली पाण्यातून फवारावे.
तणनाशकामुळे होणारे फायदे:
- पीक उत्पादन वाढते.
- तणनाशके मॅन्युअल खुरपणी किंवा तण नियंत्रणाच्या इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा अधिक किफायतशीर ठरतात, विशेषत: मोठ्या शेतात.
- हाताने तण काढणे किंवा तण नियंत्रणाच्या इतर यांत्रिक पद्धतींच्या तुलनेत तणनाशकांचा वापर केल्यास वेळ वाचतो.
- तणनाशके मशागतीची गरज कमी करतात, ज्यामुळे मातीची धूप रोखता येते आणि मातीचे आरोग्य सुधारते. जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या यंत्रसामग्रीची गरज कमी करून ते हरितगृह वायूचे उत्सर्जनही करतात.
- तणनाशके शेतातील मजुरीचा खर्च कमी करू शकतात.
तणनाशकांमुळे होणारे तोटे:
- काही तणनाशके नॉन-बायोडिग्रेडेबल असतात आणि दीर्घ काळासाठी हानिकारक असतात.
- तणनाशके किंचित विषारी आहेत. त्यामुळे ती विविध आजारांना कारणीभूत ठरू शकतात. काही डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्या आणि वापरकर्त्यांच्या श्वासोच्छवासावर देखील परिणाम करू शकतात आणि तण नाशकाच्या अयोग्य वापरामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
- वाहत्या पावसाच्या पाण्यासह तणनाशके प्रवाहात वाहून जाऊ शकतात किंवा भूगर्भातील पाण्याच्या पुरवठ्यात मिसळून पाणी प्रदूषित करू शकतात.
- तृणभक्षी तणनाशकांनी उपचार केलेल्या वनस्पती खाऊ शकतात ज्यामुळे वाढणाऱ्या अन्न साखळीत विषारी घटक जातील.
तणनाशन करणे जसे गरजेचे आहे, तसेच तणनाशक फवारताना व वापरताना काळजी घेणेही आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया,
तणनाशक फवारणी करताना कशी घ्यावी काळजी:
- तणनाशक खरेदी करताना मुदत संपलेली तणनाशक खरेदी करू नयेत.
- विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके दिलेल्या मात्रेत वापरावी.
- तणनाशकांचा वापर शिफारशीनुसार दिलेल्या पिकात, दिलेल्या वेळी व दिलेल्या मात्रेत अचुकपणे करावा.
- तणनाशकाची फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असावा.
- उभ्या पिकात तणनाशके फवारतांना हुडचा वापर करावा.
- तणनाशके फवारलेल्या जमिनीत दरवर्षी कंपोस्ट, गांडूळखत या खतांचा वापर भरपूर करावा.
- तणनाशकची फवारणी जोराचे वारे नसताना करावी. तसेच, 2-3 तास सूर्यप्रकाश राहील हे पाहूनच फवारणी करावी.
- आपल्या पिकाभोवती इतर कोणती पिके आहेत ते लक्षात घेऊन फवारणी करावी.
- जमिनीवर तणनाशक फवारणी करत असल्यास शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेट नोझलचा वापर करावा.
- तणनाशकांच्या फवारणीसाठी शक्यतो वेगळा पाठीवरचा नॅपसॅप पंप वापरावा.
- ग्लायफोसेटसारखे तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी 21 दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.
- तणनाशके फवारतांना जमीन ढेकळे रहित भुसभूशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
- फवारणी करताना धूम्रपान करू नये, तंबाखू खाऊ नये.
तुम्ही पिकांची काढणी झाल्यानंतर तुमच्या पिकात कोणती तणनाशके वापरता? आणि तुम्हाला त्यांचा काय फायदा दिसून आला? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. तण किती प्रकारचे असतात?
तणांचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात. प्रथम म्हणजे एकदलवर्गीय व दुसरं म्हणजे द्विदलवर्गीय.
2. तणनाशक फवारणीनंतर किती दिवस शेतात मशागत करू नये?
ग्लायफोसेटसारखे तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी 21 दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.
3. तणनाशक फवारणीसाठी कोणते नोझल व पंप वापरावा?
जमिनीवर तणनाशक फवारणी करत असल्यास शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेट नोझलचा वापर करावा. तणनाशकांच्या फवारणीसाठी शक्यतो वेगळा पाठीवरचा नॅपसॅप पंप वापरावा.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ