पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
मिर्च
हरी मिर्च
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
18 Feb
Follow

मिरची पिकातील तण व्यवस्थापन (Weed management in Chilli crop)


मिरची पिकातील तण व्यवस्थापन (Weed management in Chilli crop)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

महाराष्ट्र राज्यात मिरची हे प्रमुख मसाल्याचे पीक आहे. महाराष्ट्रात बहुतेक भागात मुख्यत्वेकरून औरंगाबाद, सातारा, पुणे, धुळे, इ. जिल्ह्यांमध्ये मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. तसेच मिरचीच्या सरासरी उत्पादनात आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे.

विविध रोग आणि कीटकांपासून झाडांचे संरक्षण करण्याबरोबरच उच्च दर्जाचे पीक घेण्यासाठी तणांचे नियंत्रण करणे देखील आवश्यक आहे. तणांच्या जास्त प्रमाणामुळे पिकाचे उत्पादन 30 ते 70 टक्के कमी होऊ शकते. यासोबतच मिरचीच्या गुणवत्तेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळीच तणांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आपण मिरची पिकामधील तण व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

मिरची पिकात तणांमुळे होणारे नुकसान (Damage in Chilli crop due to Weeds) :

  • जमिनीतील ओलावा, पोषक तत्वे, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी तण पिकाशी स्पर्धा करतात त्यामुळे उत्पादन कमी होते.
  • तणांची तीव्रता सामान्यतः अल्फिसोल (लाल माती) मध्ये व्हर्टिसॉल (काळी कापूस माती) पेक्षा जास्त असते, रब्बी आणि उन्हाळी हंगामापेक्षा खरीप हंगामात तणांची तीव्रता जास्त दिसून येते.
  • तण वनस्पती परिसर, लागवडीचा हंगाम आणि मातीच्या प्रकारानुसार भिन्न असतात.
  • चिकणमाती मातीत बारमाही तण आणि लाल मातीत वार्षिक तण समस्याप्रधान असतात, मिरची पिकाशी संबंधित सामान्य बारमाही तण म्हणजे हरळी(सिंडन डॅक्टिलॉन), मोथा (सायपेरस रोटंडस) आणि चांद वेल (कॉन्व्होल्युलस आर्वेन्सिस).
  • वार्षिक गवतांमध्ये Dianebra retroflexa, Panicum isachne in vertisols आणि Digetartia marginata, Dactylocatinum aeqyptinum हे लाल मातीतील सामान्य तण आहेत.
  • कॉमेलिना बेंघालेन्सिस, सायनोटिस एसपीपी हे सामान्यपणे पाहिले जाणारे इतर डिकॉट तण आहेत.
  • मिरची पिकाच्या मुळांना परजीवी म्हणून ओळखले जाते.

मिरचीमधील तण नियंत्रणासाठी आंतरमशागत:

  • आंतरमशागतीची मुख्य उद्दिष्टे आहेत (अ) तणांचे नियंत्रण (ब) मातीत हवा खेळती ठेवणे (क) जमिनीतील ओलावा टिकवणे (ड) बाष्पीभवन टाळण्यासाठी मातीचे आच्छादन तयार करणे.
  • मिरचीची रोपे तयार केल्यानंतर आंतरमशागत प्रामुख्याने कुदळाच्या सहाय्याने केली जाते.
  • कुदळाची रुंदी ओळ लावणीच्या अंतरावर आणि अचूकतेवर अवलंबून असते.
  • पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, आंतरमशागत करताना रोपे गाडली जाणार नाहीत किंवा फांद्या तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.
  • मिरची पिकात 8 ते 10 वेळा आंतरमशागत केली जाते.
  • भेगा पडू नयेत आणि जमिनीत ओलावा राहावा म्हणून तण नसतानाही वारंवार आंतरमशागत केली जाते.

मिरची पिकात तणनाशकांचा वापर (Use of herbicides in Chilli crop) :

मिरचीचे शेत तयार करण्यापुर्वी:

  • ऑक्सीफ्लोरफेन 23.5% ईसी (डाऊ-गोल) एकरी 120 मिलीची 400 लिटर पाण्यातून ओलसर जमिनीत फवारणी करावी.
  • रुंद पानांचे तण उगवणीपुर्वी आणि उगवणीनंतर देखिल हे नियंत्रणासाठी उपयोगी ठरते.
  • पिक लागवडीपुर्वी शेताची मशागत करुन मगच लागवड करावी.
  • हे तणनाशक लागवड करण्याच्या 90 ते 120 दिवस अगोदर वापरावे.

मिरचीच्या तयार केलेल्या शेतावरिल तण नियंत्रण:

  • तण 1 ते 6 इंचाचे असतांना पॅराक्वॅट डिक्लोराईड 24% एसएल (देहात-चॉपऑफ) 800 ते 1000 मिली / एकर फवारणी करावी.
  • तणांसोबत उगवुन आलेले किंवा पुर्नलागवड केलेले रोप देखिल मरुन जाते, त्यामुळे शक्यतो लागवड करण्यापुर्वीच तणनाशक वापरावे.
  • फवारणी करतांना जमिनीला चिकटुन फवारणी करावी, मिरचीच्या पानांवर हे तणनाशक उडाल्यास पिकास इजा पोहचते, काळजी पुर्वक फवारणी घ्यावी.
  • तणांचे नियंत्रण हे तणांच्या बहुतांशी उंचीवर अवलंबुन असते.

मिरचीचे पीक उगवणीनंतर:

  • पुर्नलागवड केलेल्या मिरची साठीच उपयुक्त, लागवड करण्यापुर्वी किंवा लागवड केल्यानंतर वापरता येणारे तणनाशक पेंडिमिथालिन 30% ईसी (अडामा पेंडिगम) 1 लिटरची 400 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • मिरचीच्या पानांवर उडाल्यास पिकास इजा पोहचते त्यामुळे काळजीपुर्वक फवारणी करावी.
  • मेटाक्लोर 50% ईसी (युपीएल-ॲमिकस) ची 800 मिली / एकर फवारणी करतांना जमिनीला चिकटुन करावी, मिरचीच्या पानांवर उडाल्यास पिकास इजा पोहचते त्यामुळे, काळजीपुर्वक फवारणी घ्यावी.

(वरिल माहिती उपयुक्त आहे तरी तणनाशक शिफारस स्व-जबाबदारी वर वापरावे!)

तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी (Precautions to be taken while spraying herbicides) :

  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
  • तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
  • फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
  • तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
  • उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
  • तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.

तुम्ही मिरची पिकाचे तणांपासून कसे संरक्षण करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. मिरचीची लागवड कधी करावी?

मिरचीच्या खरीप पिकाची लागवड जून-जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी-फेब्रूवारी महिन्‍यात करावी.

2. मिरचीच्या पिकात आंतरमशागतीची मुख्य उद्दिष्टे कोणती?

(अ) तणांचे नियंत्रण (ब) मातीत हवा खेळती ठेवणे (क) जमिनीतील ओलावा टिकवणे (ड) बाष्पीभवन टाळण्यासाठी मातीचे आच्छादन

3. तणनाशकांच्या वापरासाठी योग्य वेळ कोणती?

सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे.

47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ