भुईमूग पिकातील तण व्यवस्थापन! (Weed management in Groundnut crop!)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
भारतातील सर्व तेलबिया पिकांमध्ये, शेंगदाणे हे उच्च पौष्टिक मूल्य असलेले पीक आहे. भुईमुगाची शेती आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. भुईमुगाची खरीप हंगामातील उत्पादकता सुमारे 1000 किलो तर उन्हाळी हंगामातील उत्पादकता 1400 किलो प्रति हेक्टर आहे. खरिपातील उत्पादकता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. देशातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के भुईमूग तेलासाठी, 10 टक्के प्रक्रिया करून खाण्यासाठी व 10 टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरत आहे. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (25 टक्के) असतात. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये भुईमूग हे आंतरपीक घेऊन उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करता येणे शक्य आहे. भुईमूग हे असे पीक आहे की त्यापासून सकस चारा, तेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की) सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळते परंतु, भुईमुगाचा सर्वात मोठा वापर हा तेल काढण्यासाठी केला जातो. मात्र याच भुईमूग पिकात वनस्पतींच्या वाढीदरम्यान वेगवेगळ्या अंतराने, भुईमूगाच्या झाडाभोवती अनेक प्रमुख तण दिसतात, ज्यामुळे भुईमुगाची सामान्य वाढ बिघडते. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया भुईमूग पिकाचे तणांपासून संरक्षण कसे करायचे याविषयीची थोडक्यात माहिती.
तण म्हणजे काय?
- तण म्हणजे अवांछित झाडे किंवा गवत जे शेतात पिकांच्या शेजारी उगवते आणि जमिनीतील पोषक द्रव्ये शोषून घेऊन पिकांची वाढ रोखते.
- भुईमूग पिकामध्ये जंगली राजगिरा, मोथा, दुधाळ गवत, लकासा, हिरणखुरी, बनचारी, हजारदाणा, गोखरू, सत्यनाशी, कृष्णनिल इत्यादी तण अधिक प्रमाणात आढळून येतात.
पिकामध्ये तणांमुळे होणारे नुकसान:
- पिकाच्या सुरुवातीला शेतात तण असल्याने ते जमिनीतील पोषकद्रव्ये शोषून घेतात. त्यामुळे झाडांना पोषण मिळत नाही आणि त्यांची वाढ खुंटते.
- विविध प्रकारचे कीटक आणि रोग या तणांना आपले आश्रयस्थान बनवतात.
- काढणीच्या वेळी तण सर्व बाजूंनी पिकाला चिकटून राहतात आणि कापणी करणे कठीण होते.
- पीक उत्पादनात 34.3% ते 89.8% पर्यंत कमतरता येऊ शकते.
- पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
- साठवणीत तण बिया पिकात मिसळल्यास पीक लवकर खराब होऊ लागते.
तण नियंत्रणाचे उपाय:
- शेतात खोल नांगरणी करावी.
- शेतात पाणी साचू देऊ नका.
- चांगले उत्पादन मिळविण्यासाठी, तणांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पहिले 45 दिवस फार महत्वाचे आहेत. यासाठी पिकात दोन वेळा खुरपणी केली जाते.
- पहिली खुरपणी पेरणीनंतर 15 दिवसांनी केली जाते.
- पहिल्या खुरपणीनंतर 3 आठवड्यांनी दुसरी खुरपणी करावी.
- दुसरी खुरपणी करताना मुळांसह माती टाकावी. त्यामुळे शेंगांचे उत्पादन सुलभ होऊन उत्पादनातही वाढ होते.
- शेंगा तयार होण्याच्या वेळी कुदळ मारू नका.
- पेरणीसाठी तणनाशकग्रस्त पीक बियाणे वापरू नका.
- वेळोवेळी शेताची पाहणी करत रहा आणि हाताने तण काढून शेत स्वच्छ करत रहा.
- तणांचा प्रादुर्भाव झाल्यास तणनाशक देखील वापरता येतात. परंतु जेव्हा भरपूर तण असतील तेव्हाच त्यांचा वापर करा.
रासायनिक नियंत्रण:
- गवत उगवण्यापूर्वी पेंडीमेथालिन 38.7% सीएस (देहात-पेंडेक्स प्लस) 600 मिली प्रति एकर वापरावे.
- उभ्या पिकावर इमेजेथापायर 10% एस.एल. (देहात-ग्रासआउट) 600 मिली एकर 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारावे.
- उगवण होण्यापूर्वी ऑक्सीपलोरफेन 23.5% ई.सी. (देहात-ऑक्सीबीक्स) 500 मिली एकर 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारावे.
- तसेच क्चिज्ञालोफॉप-एथिल 5% ई.सी (देहात-कॅपिएन्झा) हे देखील 400 मिली एकर 200 लिटर पाण्यातून प्रति एकर फवारता येऊ शकते.
तुमच्या भुईमूग शेतात कोणत्या प्रकारचे तण आढळून आले? व तुम्ही कोणते तणनाशक वापरले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या तण नियंत्रणाच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. भारतात भुईमूग लागवडीचा हंगाम कोणता?
भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत.
2. भुईमूग पिकासाठी योग्य जमीन कोणती?
भुईमूग पिकासाठी मध्यम प्रकारची, भुसभुशीत, चुना (कॅल्शियम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य समजली जाते.
3. भुईमुगाचे पीक घेण्याची योग्य वेळ कोणती?
भुईमुगाचे पीक हे खरीप व उन्हाळी हंगामात घेता येऊ शकते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
