पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
मक्का
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
28 Apr
Follow

मका पिकातील तण व्यवस्थापन (Weed management in Maize crop)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

मका, हे जगातील सर्वात महत्वाच्या पिकांपैकी एक आहे. तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. तसेच हे पीक भारतासोबतच महाराष्ट्रात ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मका हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पिक असुन या पिकाखाली सुमारे 7.08 लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. मका हे उबदार हंगामातील पीक आहे. त्याला किमान 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. पीक कोणतेही असले तरी तण प्रमाणापेक्षा जास्त उगवल्यास उत्पादनात घट होते. तणांच्या प्रादुर्भावामुळे मुख्य पीक आणि तण यांच्या विविध पोषक घटकांसाठी स्पर्धा होते. पिकास वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पोषक घटकांचा पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्याने उत्पादनात घट येते. लागवडीनंतर पीकवाढीच्या सुरुवातीचा एक तृतीयांश काळ हा पिकला अतिसंवेदनशील मानला जातो. इतर पिकांप्रमाणेच मका पिकातील तणांमुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते म्हणूनच तणांचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे.

तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी याबाबतीत स्पर्धा करण्याचा कालावधी पेरणीनंतर 15 ते 35 दिवसांपर्यंतचा असल्याने तणांचा या कालावधीत बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळते. चला तर आता जाणून घेऊया मका पिकातील तण नियंत्रणाविषयी.

मका पिकात कोणते तण आढळून येतात? (Weeds in Maize crop)

मक्याच्या पिकामध्ये प्रामुख्याने अरुंद पाने असलेले तण व रुंद पाने असलेले तण आढळून येतात.

तणांचा प्रतिबंध (Prevention of weeds) :

  • मक्याच्या शेतात 2 ते 3 वेळा खुरपणी व कुदळणी करावी.
  • खुरपणी आणि कुदळणी करताना लक्षात ठेवा की ते 4-5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल जाऊ नये.
  • जास्त खुरपणी आणि कुदळणीमुळे मक्याची मुळे कापली जाऊन पिकाचे नुकसान होऊ शकते.

मका पिकासाठी उपयुक्त तणनाशक (Useful Herbicides for Maize crop) :

  • ॲट्रॅझीन 50% डब्ल्यूपी (देहात - अटराफोर्स) हे तणनाशक तण उगवणीपूर्व आणि उगवणीनंतरचे तणनाशक म्हणून तण 2-3 पानांच्या अवस्थेत असताना हे 300 ते 400 ग्राम प्रति एकरी वापरावे.
  • तसेच पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांत टोप्रामेज़ोन 33.6% एससी (बीएएसएफ-टिंजर) 30 मिली+फ्लक्स 500 ग्रॅम

अथवा

टेम्बोट्रियोन 420 एससी 34.4% डब्ल्यू/डब्ल्यू (देहात - ट्रोनेक्स) 115 मिली+ॲट्रॅझीन 50% डब्ल्यूपी (देहात - अटराफोर्स) एकरी यांची वाफसा अवस्थेत फवारणी करावी.

  • कणीस लागण्यापूर्वी बैलांच्या सहाय्याने भर लावल्यास तण नियंत्रणा सोबतच उत्पादन वाढीसाठी देखील उपयोग होतो.

तणनाशके वापरताना घ्यावयाची काळजी:

  • विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके योग्य प्रमाणात वापरावीत.
  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
  • तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
  • फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
  • चॉपऑफसारखे बिन निवडक तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी 21 दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.
  • उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
  • तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.
  • उगवणीपूर्व फवारणी पेरणी दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी. पीक अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये. उगवणीपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी.
  • फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे. म्हणजे फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल. असे नोझल कमी दाबावर फवारा उडवते. त्यामुळे शेजारच्या पिकावर फवारा जात नाही.
  • फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी.
  • तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.

तुम्ही मका पिकाचे तणांपासून कशा प्रकारे संरक्षण करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. मका हे कोणत्या हंगामातील पीक आहे?

मका हे उबदार हंगामातील पीक आहे.

2. मका पिकाला किमान किती दिवसांचा कालावधी लागतो?

मका पिकाला किमान 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो.

3. मका पिकात कोणते तण आढळून येतात?

मक्याच्या पिकामध्ये प्रामुख्याने अरुंद पाने असलेले तण व रुंद पाने असलेले तण आढळून येतात.

56 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ