पोस्ट विवरण
पपई पिकातील तण व्यवस्थापन (Weed management in Papaya)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात. पपईच्या रोपांची पुनर्लागण केल्यानंतर बागेतील काही कामे प्रथमदर्शनी क्षुल्लक वाटली तरी भरघोस पीक येण्याच्या दृष्टीने त्याचे फार महत्व असते. बागेत गवत आणि झाडेझुडपे म्हणजेच तण वाढल्यास ते पपईच्या झाडाशी स्पर्धा करुन जमिनीतील पोषणद्रव्ये ब-याच प्रमाणात शोषून घेतात. विशेषत: झाडे लहान असताना विस्ताराला अडथळा येऊन ती कायमची कमजोर बनतात. मुळ्यांना नीट हवा मिळू शकत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडतात. शिवाय गळतात. ही हानी टाळण्य़ासाठी बागेतील तण नियंत्रण अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच आजच्या लेखात आपण पपई पिकातील तण व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
पपई पिकात कोणते तण आढळतात (Important Weeds in Papaya)?
गवत:
हरियाली (बर्म्युडा गवत)
लव्हाळा:
नागरमोथा
रुंद पानांची तणे:
गोग तण (घाणेरा ओसाडी), जंगली राजगिरा, घेटुळी, युफोर्बिया हिर्टा (अस्थमा-वनस्पती), काँग्रेस, सरनाई
पपई पिकाचे तणांमुळे होणारे नुकसान:
- पपईच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होतो ज्यामुळे फळांचे उत्पन्न कमी होते.
- पपई पिकाचे तणांमुळे होणारे नुकसान पुढील घटकांवर अवलंबून असते:(अ) तण स्पर्धेची तीव्रता (ब) तणांच्या प्रजाती (क) तण स्पर्धेचा कालावधी आणि (ड) हवामान घटक जसे की पाऊस, तापमान आणि सूर्यप्रकाश. त्यामुळे पपई बागेतील तण पूर्णपणे नियंत्रणात ठेवावे.
- जमिनीत ओलावा ठेवण्यासाठी आच्छादन अतिशय प्रभावीपणे कार्य करते व तणांची वाढ रोखते.
- तणांची वाढ रोखण्यासाठी शेतात पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.
- फवारणीचे द्रावण कोवळ्या रोपांवर जाऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.
आता जाणून घेऊया तण काढताना काय काळजी घ्यावी याविषयी:
- झाडे लावल्यानंतर 15-20 दिवसांनी निंदणी करावी.
- पपईच्या झाडाच्या मुळ्या जमिनीत उथळ वाढतात म्हणुन खोल आंतरमशागत कधीही करू नये.
- आंतरमशागत हलकी व वारंवार करावी.
- वर्षातून दोन वेळा उभी-आडवी हलकी नांगरणी व वखरणी करावी.
- जमीन भुसभुशीत ठेवल्याने फळांची प्रत व उत्पादन सुधारते.
- आळ्यातील गवत खुरप्याने निंदून घ्यावे.
- पावसाळ्यात हिरवळीचे खत पीक पेरणे व तागाची पेरणी करुन फुलावर येण्याअगोदर जमिनीत गाडून टाकणे चांगले.
- ठिबक सिंचन वापरल्यास तण वाढीचे प्रमाण कमी असते.
पपई पिकात कोणते तणनाशक वापरावे (Which herbicide should be used in papaya?)
- तणनाशक वापरायचे झाल्यास झाड 1 मीटर उंच झाल्यावर पॅराक्वॅट डिक्लोराईड 24% एसएल (देहात-चॉपऑफ) 800 ते 1000 मिली / एकर फवारणी करावी.
- सारखे स्पर्शजन्य तणनाशक 200 लिटर पाण्यात 1 लिटर या प्रमाणात मिसळून साधे नोझल न वापरता डब्लूएफएन 78 किंवा डब्लूएफएन 562 नोझल वापरून फवारा. झाडाच्या कोणत्याही भागावर ते उडणार नाही, अशी दक्षता घेऊन फक्त तणांवर मारा. यामुळे लव्हाळा, हरळीसारखी एकदल तणे आटोक्यात येतात.
- तसेच पॅराक्वाँट हे तणनाशक 0.8 किलो प्रति एकर 200-280 लीटर पाण्यात मिसळून देखील फवारणी करता येते.
- फवारणी करताना हूडचा वापर करावा.
- झाडाच्या खोडावर तणनाशक पडणार नाही याची काळजी घ्यावी.
- झाडाच्या बुंध्यातील गवत शक्यतो खुरपणी करून काढावे.
- किंवा ग्लायफोसेट 41% एसएल (देहात-MAC7) चा 800 ते 1200 मिली प्रति एकर याप्रमाणात देखील तण नष्ट करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
पपई पिकात तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी (Precautions to be taken while spraying herbicides in Papaya) :
- तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
- तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
- रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
- तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
- तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
- फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
- तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
- उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
- तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
- तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.
तुम्ही पपई पिकाचे तणांपासून कसे संरक्षण करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. पपई पिकाची लागवड कधी केली जाते?
पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात.
2. पपई पिकाचे ताणांमुळे होणारे नुकसान कोणत्या घटकांवर अवलंबून असते?
(अ) तण स्पर्धेची तीव्रता (ब) तणांच्या प्रजाती (क) तण स्पर्धेचा कालावधी आणि (ड) हवामान घटक जसे की पाऊस, तापमान आणि सूर्यप्रकाश यावर अवलंबून असते.
3. तणनाशकांच्या वापरासाठी योग्य वेळ कोणती?
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तणनाशके फवारावीत. फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ