पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
कृषि
अनार
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
12 Jan
Follow

विश्रांतीच्या काळात डाळिंब पिकातील तण व्यवस्थापन (Weed Management in Pomegranate during Rest Period)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

डाळिंब हे एक प्रमुख कोरडवाहू फळपिक असून हलक्या जमिनीत आणि कमी पाण्यावर घेता येणारे एक महत्वाचे पीक आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन दशकांपासून डाळिंब हे एक महत्वाचे नगदी पीक बनले आहे. महाराष्ट्रात साधारणपणे सद्यपरिस्थितीत एक लाख वीस हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र डाळिंब फळपिकाखाली लागवडीस आले आहे. राज्यात सध्या सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, धुळे, बुलढाणा, उस्मानाबाद आणि लातुर जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची लागवड व्यापारी तत्वावर केली जाते. डाळिंबात प्रामुख्याने तीन बहार घेतले जातात मृग बहार, हस्त बहार आणि आंबे बहार. इतर पिकांप्रमाणेच डाळिंब पिकातील तणांमुळे देखील उत्पादनात मोठी घट येऊ शकते म्हणूनच तणांचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आपण विश्रांती काळात घ्यावयाच्या डाळिंब पिकातील तण व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

डाळींब बागांमध्ये विशेषतः झाडाच्या तणांची वाढ गुडघ्याच्या उंचीची होती.

कार्यक्षम मुळ्यांच्या कक्षेत सततचा पडणारा रिमझिम पाऊस व बागेत वाढलेले तण यामुळे जमिनीचा पृष्ठभाग जास्त काळ ओला राहून बागेत आद्रता वाढण्यास मदत होते व यामुळे रोगास अनुकुल परिस्थिती निर्माण होते.

डाळिंब बागेत एकात्मिक तण व्यवस्थापनाचा वापर -

  • "कार्यक्षम मुळ्यांच्या कक्षेतील" चाळणी/टिचणी - ताण तोडण्यापूवी किंवा आहार नियोजना अगोदर 15 दिवस झाडाच्या आकारानुसार 6 इंच खोल कार्यक्षम मुळ्यांच्या कक्षेतील चाळणी करावी. चाळणी / टिचणी हा भौतिक तणनियंत्रणाचा एक उपाय आहे.
  • चाळणी केल्यानंतर कार्यक्षम मुळ्यांच्या कक्षेतील तणांच्या मुळ्या, सुकलेले तणांचे अवशेष व इतर अनावश्यक घटक जमा करावेत व बागेच्या बाहेर टाकावे.
  • कार्यक्षम मुळ्यांच्या कक्षेतील चाळणी केल्यास मुळ्या 15 दिवस आधी सुर्यप्रकाशात उघड्या पडण्यास मदत होते. तसेच टिचणी करतेवेळेस मुळ्यांची छाटणी देखील होते.
  • मुळ्यांची तुट झाल्यानंतर नवीन येणाऱ्या पांढरी मुळी (केश मुळ्या) या बऱ्याच प्रमाणात वरील मातीच्या 1 ते 1.5 फुटाच्या थरात स्थिर असतात. या कारणास्तव हा थर भुसभुशीत, तणविरहित व मर्यादित ओला असणे गरजेचे असते यासाठी पुढील फवारण्या कराव्यात.
  • 0.52.34 (देहात-न्यूट्री MKP) - 5 ग्रॅम प्रति लिटर किंवा
  • 13.0.45 (देहात-न्यूट्री KNO3) - 5 ग्रॅम प्रति लिटर + सूक्ष्म पोषक 1 ग्रॅम प्रति लिटर 15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.

तण कापणे:

  • तण कापून घेणे हा भौतिक तण नियंत्रणाचा एक उपाय आहे.
  • मृग बहारामध्ये सततचा पडणारा रिमझिम पाऊस हा तणवाढीस पोषक ठरतो.
  • अनेक परिस्थितीमध्ये तण काढणे कठीण जाते. अशा परिस्थितीत पावसाची उघडीप मिळाल्यास दोन ओळीतील व झाडाभोवतीचे तण धारधार विळ्याने कमी उंचीवर कापून घेतल्यास फायदा होतो.

पाणसोट फुटवे काढणे:

  • झाडाच्या खोडावरील व खालील बाजू कडून येणारे पानसोट फुटवे नियमित काढावेत. असे पानसोट फुटवे तणांप्रमाणेच झाडाच्या फळधारक काड्या व वाढणारी फळे या भागांकडे होणारा अन्न पुरवठ्याशी स्पर्धा करतात. यामुळे कमकुवत फुलधारणा व फळांना कमी आकार व वजन या समस्या निर्माण होतात.

तण व्यवस्थापनामध्ये डाळींब बागेचे "कार्यक्षम मुळ्यांच्या कक्षेत" तण व्यवस्थापनाकडे लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. दोन ओळीतील तण कमी असल्यास फारसे नुकसानकारक ठरत नसले तरी असे तण हे कमी उंचीवरच कापणे अथवा निंदणी करणे फायद्याचे ठरते.

तण नियंत्रणाचे फायदे:

  • झाडाच्या व तणांच्या मुळ्यांमधील स्पर्धा कमी होते:

'कार्यक्षम मुळ्यांच्या कक्षेत' तण नियंत्रण हे डाळींब झाडाच्या व तणांच्या मुळ्यांमध्ये पाणी, अन्नद्रव्य व प्राणवायूसाठी होत असलेली स्पर्धा कमी करते.

मातीमधील सूक्ष्म नलीका व छिद्रांमध्ये तण व झाडाच्या केशमुळ्या शिरकाव करतात. यामुळे मातीमधील सूक्ष्म नलिका व छिद्रांमधील प्राणवायू, पाणी व अन्नद्रव्य यांचे प्रमाण कमी होत जाते व याचा परिणाम डाळींब झाडाच्या केश मुळ्यांच्या वाढीवर व परिणामी पाणी व अन्नद्रव्य शोषणावर होतो.

  • तणांच्या मुळयांद्वारे बाहेर पडणाऱ्या हानिकारक रसायनांची बाधा कमी होते:

अनेक परिस्थितींमध्ये विविध ठिकाणच्या स्थानिक तणांच्या प्रजाती वेगवेगळ्या असतात. अनेक तणांच्या प्रजातीमध्ये मुख्य पिकाच्या मुळ्यांना इजा करण्याची प्रवृत्ती असते. अशा तणांच्या / वनस्पतींच्या सान्निध्यात वाढणारे पीक हे कमी वाढ, फळधारणा करते किंवा काही परिस्थितीत मर पावते. अशी इजा ही विशेषतः इजा करणारी जीवंत वनस्पती आपल्या तणांव्दारे किंवा कुजते वेळेस आपल्या अवशेषांव्दारे काही हानिकारक रसायन सोडून करते.

  • तणांमुळे होणाऱ्या रोग व किडींचा प्रार्दुभाव कमी होतो:

अशा वाढलेल्या तणांमुळे जमिनीचा पृष्ठभाग झाकलेला राहून ओलावा टिकून राहतो. अशी परिस्थिती रोगास किडीस प्रादुर्भावास अनुकूल ठरते.

"कार्यक्षम मुळ्यांच्या कक्षेतील" अधिक काळ टिकून राहिलेला ओलावा हा हानीकारक बुरशीचे बिजाणु रूजण्यास व प्रसार पावण्यास मदतीचा ठरतो.

सुत्रकृमींचा प्रादुर्भाव देखील ओलाव्यास कारणीभूत आहे.

मृग बहारात ही समस्या प्रामुख्याने निदर्शनास येते.

तण कापून घेतल्यास जमिनीचा पृष्ठभाग उघडा होतो. यामुळे पृष्ठभाग लवकर सुकण्यास मदत होते.

गवत कापण्यासाठी बाजारात यांत्रिक साधन (ग्रास कटर) उपलब्ध आहे. अशा साधनांनी गवत कापल्यानंतर ते उचलून घेणे महत्वाचे आहे.

रासायनिक तण नियंत्रण:

  • कुदळाच्या साहाय्याने वेळोवेळी तण काढणे ही पिकातील तण नियंत्रणाची सर्वात पारंपारिक आणि प्रभावी पद्धत आहे.
  • पेरणीनंतर 30 दिवसांच्या आत किंवा ठराविक अंतराने शेतातील तण काढणे आवश्यक आहे.
  • डाळिंब बागेतील तणांचे रसायनिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% एसएल हा घटक असलेले (देहात-Cimelio) हे तणनाशक 1000 ते 1200 मिली एकर या प्रमाणात 300 लिटर पाण्यातून फवारावे.

तणनाशके वापरताना घ्यावयाची काळजी:

  • विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके योग्य प्रमाणात वापरावीत.
  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
  • तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
  • फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
  • तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
  • उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
  • तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.
  • उगवणीपूर्व फवारणी पेरणी दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी. पीक अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये. उगवणीपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी.
  • फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी.
  • तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.

तुम्ही विश्रांती काळात डाळिंब पिकाचे तणांपासून कशा प्रकारे संरक्षण करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. डाळिंब पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

डाळींब पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्‍त आहे.

2. डाळिंबाचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?

डाळिंबाचे पिक कोणत्‍याही जमिनीत घेता येते.

3. डाळिंब पिकात कोणती आंतरपिके घेता येतात?

डाळिंबाच्या लागवडीनंतर सुरुवातीची दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्‍ये कांदा, काकडी, मुग, चवळी, सोयाबीन यासारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्‍हणून घेता येतात.

4. डाळिंब पिकात किती बहार घेता येतात?

डाळिंब पिकात प्रामुख्याने तीन बहार घेतले जातात मृग बहार, हस्त बहार आणि आंबे बहार.

20 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ