पोस्ट विवरण
रताळे पिकामधील तण व्यवस्थापन (Weed management in Sweet potato)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
कंदवर्गीय पिकामध्ये रताळे हे महत्वाचे कंद वर्गीय पीक आहे. रताळे हे एक फळ म्हणुन भारतात अनेक प्रांतात खाल्ले जाते. रताळे बटाट्यासारखेच असते, ते उपवासात फराळ म्हणुन देखील खाल्ले जाते. रताळे हे औषधीगुणांनी भरपूर असल्याने याचे सेवन आरोग्यासाठी लाभकारी ठरते. रताळ्याची पांढरी, लाल, जांभळी आणि तपकिरी साल देखील असते. कमी खर्चात आणि कमी वेळेत रताळ्याचे पिक तयार होते आणि इतर फळांपेक्षा व भाजीपालापेक्षा रताळ्याचे दाम हे जास्त असतात. तसेच, ह्याची मागणी ही कायम बनलेली असते. रताळ्याचे हे बहुगुण पाहता रताळ्याची शेती शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न कमवून देऊ शकते. मात्र शेतात वाढणाऱ्या निरनिराळ्या तणांमुळे पिकानां अन्नद्रव्ये आणि पाण्याची कमतरता भासते. तसेच तणांची पिकांबरोबर हवा, जागा व सूर्यप्रकाश इत्यादी बाबतीत स्पर्धा होते परिणामी उत्पादनामध्ये घट येते म्हणूनच योग्य वेळी योग्य पद्धतीने तण नियंत्रण करणे गरजेचे आहे. याकरिताच आजच्या आपल्या या भागात आपण रताळा पिकातील तण व्यवस्थापनाविषयी (Weed Management in Sweet Potato) जाणून घेणार आहोत.
तणनाशक म्हणजे काय?
तणनाशक म्हणजे उपयोग नसणाऱ्या वनस्पती नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाणारे एक रसायन. जे पिकाची मोठ्या प्रमाणात होणारी हानी रोखते व तणांचा प्रादुर्भाव नियंत्रित करते.
रताळे पिकात कोणती तणे आढळून येतात?
महाराष्ट्रात रताळे पिकामध्ये आढळणाऱ्या काही सामान्य तणांमध्ये जंगली राजगिरा, पित्तपापड, कामिनी घोळू, रान करडई, रान वाटाणा, बनसोया तसेच इत्यादी अनेक तणांचा समावेश आढळून येतो. हे तण पोषक, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी रताळ्याशी स्पर्धा करू शकतात, ज्यामुळे रताळा पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे रताळे पिकांचे तणांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रभावी तण व्यवस्थापन पद्धती राबविणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया तण नियंत्रण पद्धतींविषयी.
एकात्मिक तणनियंत्रण पद्धती:
रताळे पिकात तणनियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures):
- रताळे पिकाची इतर पिकांबरोबर आवर्तन पद्धतीने लागवड केल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. कारण वेगवेगळ्या पिकांमध्ये तणांच्या प्रजाती वेगवेगळ्या असतात.
- पिकाची वेळेवर पेरणी करणे आवश्यक आहे जेणेकरून पीक लवकर स्थिर होईल आणि तणांना सावली मिळेल. उशीरा पेरणी केल्यास पिकांची वाढ कमी होऊन तणांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
- पेरणी अगोदर शेतात नांगरणी करून तणांची वाढ काढून टाकावी.
- पीकतणमुक्त ठेवण्यासाठी स्वच्छ बियाणे वापरणे गरजेचे आहे.
- रताळ्याचे पीक शेंगदाण्यासारख्या इतर पिकांबरोबर आंतरपीक म्हणून घेतल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. कारण शेंगदाणे जमिनीत नायट्रोजन स्थिर करतात, ज्यामुळे रताळे पिकाची वाढ सुधारण्यास आणि तणांची वाढ कमी होण्यास मदत होते.
- भुसा किंवा गवत यांसारख्या सेंद्रिय पदार्थांनी पिकाला मल्चिंग केल्यास तणांची वाढ कमी होण्यास मदत होते.
- या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास रताळे पिकातील तणांचा प्रादुर्भाव रोखून चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते.
तण व्यवस्थापन तंत्र:
- खुरप्याच्या साहाय्याने वेळोवेळी तण काढणे ही पिकातील तण नियंत्रणाची सर्वात पारंपारिक आणि प्रभावी पद्धत आहे.
- पेरणीनंतर 30 दिवसांच्या आत किंवा ठराविक अंतराने शेतातील तण काढणे आवश्यक आहे.
- रताळे पिकामध्ये तण नियंत्रण पद्धती:
- रताळे पिकातील तण व्यवस्थापनासाठी पहिले ६० दिवस अत्यंत महत्वाचे असतात.
- तण मुक्त पीक उत्पादन, पिकाची फेरपालट आणि उन्हाळ्यात लागवड करणे या योग्य कृषी पद्धतींमुळे पिकाची चांगली वाढ होते व अनावश्यक तणांचे नियंत्रण होते.
- आच्छादन पद्धतीने वार्षिक तणांचे नियंत्रण करता येते. यासाठी लागवडीनंतर ताबडतोब भाताच्या पेंढ्याने जमीन झाकावी. आच्छादनासाठी प्लास्टिक कागदाचा किंवा पट्ट्यांचा देखील वापर करता येतो.
- हाताने तण उपटून काढणे, खुरपे, कुदळ, फावडे यांनी तण खणून काढणे या पद्धतींचा तण नियंत्रण पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
- रोटरी विडर सारखी उपकरणे, ट्रॅक्टर व बैल चलित फणणी तसेच ट्रॅक्टर संबंधित इतर यंत्रांनी देखील प्रभावीपणे तण नियंत्रण होऊ शकते.
- अधिक चांगल्या प्रकारे तण नियंत्रणासाठी ट्रॅक्टर चलित नऊ स्प्रिंग फण दातळे असलेल्या फणणीचा वापर करावा.
तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी:
- तणनाशकाच्या डब्यावरील लेबल नीट वाचून घ्यावे.
- शिफारशीत मात्रेनुसार व वेळेनुसार फवारावे.
- ढगाळ व पावसाळी वातावरण, धुके किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी करू नये.
- वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करावी.
- कडक उन्हात उगवणपश्चात तणनाशकाची फवारणी टाळावी.
- उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी.
- तणनाशकांचा शिफारशीत मात्रेतच वापर करावा.
- वारंवार एकच तणनाशक न वापरता आलटून पालटून वापर करावा. एकदा पेरणीपूर्व तर दुसऱ्यावेळी शिफारशीप्रमाणे उगवणपश्चात तणनाशक वापरावे.
- फेरपालट केल्यास पर्यायाने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होतो.
- सेंद्रिय खताचा एकरी 4 ते 6 टन वापर केल्यास जमिनीतील तणनाशकाचे अंश धरून ठेवले जातात तसेच अधिकच्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण सुध्दा वाढते.
- खोल नांगरट केल्यास जमिनीच्या थरांची उलथापालथ होऊन वरचा जास्त अंश असलेला थर अशा मशागतीमुळे खोल जातो.
- त्यामुळे तणनाशकाच्या अंशाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही.
तणनाशकांमुळे होणारे तोटे:
- काही तणनाशके नॉन-बायोडिग्रेडेबल असतात आणि दीर्घ काळासाठी हानिकारक असतात.
- तणनाशके किंचित विषारी आहेत. त्यामुळे ती विविध आजारांना कारणीभूत ठरू शकतात. काही डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्या आणि वापरकर्त्यांच्या श्वासोच्छवासावर देखील परिणाम करू शकतात आणि तण नाशकाच्या अयोग्य वापरामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
- वाहत्या पावसाच्या पाण्यासह तणनाशके प्रवाहात वाहून जाऊ शकतात किंवा भूगर्भातील पाण्याच्या पुरवठ्यात मिसळून पाणी प्रदूषित करू शकतात.
- तृणभक्षी तणनाशकांनी उपचार केलेल्या वनस्पती खाऊ शकतात ज्यामुळे वाढणाऱ्या अन्न साखळीत विषारी घटक जातील.
तुम्ही रताळे पिकात तणांचे व्यवस्थापन कसे केले? आणि तुम्हाला त्याचा काय फायदा दिसून आला? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. रताळे पिकाची लागवड कधी करावी?
रताळे पिकाची लागवड रब्बी हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात तर, खरीप म्हणजेच पावसाळी हंगामात जून ते ऑगस्ट दरम्यान करता येते.
2. तणनाशक फवारणीसाठी कोणते नोझल व पंप वापरावा?
जमिनीवर तणनाशक फवारणी करत असल्यास शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेट नोझलचा वापर करावा. तणनाशकांच्या फवारणीसाठी शक्यतो वेगळा पाठीवरचा नॅपसॅप पंप वापरावा.
3. रताळे लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
रताळ्याच्या लागवडीसाठी सुपीक जमीन निवडली पाहिजे मग त्यामध्ये लोममाती (वाळू, गाळ आणि थोड्या प्रमाणात चिकनमाती याचे मिळून बनलेली) ही रताळे लागवडीसाठी योग्य मानली जाते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ