पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
कृषि
ईख
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
26 Jan
Follow

ऊसाच्या खोडवा पिकातील तण व्यवस्थापन! (Weed management in the Ratoon Sugarcane crop!)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. (Sugarcane crop) ऊस उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे एक महत्वाचे राज्य आहे. महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे तीन हंगामात घेतले जाते. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी असे प्रकार आहेत. ऊसाचे पीक हे वर्षभर शेतात उभे असते, त्यामुळे ऊसात तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. वाढत्या तणामुळे उत्पादनात 40 ते 50 टक्के घट येते. तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड व रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानी एवढेच आहे. या तीनही हंगामात ऊस तोडून घेतल्यानंतर त्यापासून खोडवा धरला जातो. खोडवा पीक घेणे शेतकरी आणि कारखांदार या दोघांनाही आर्थिक दृष्ट्या फायदा करून देते. ऊस लागवडीसाठी जेवढ लक्ष आपण देतो तेवढ लक्ष खोडवा ऊस पिकाला दिल्यास, नक्की जास्त उत्पादन मिळू शकते. मात्र ऊस तोडणीनंतर उरलेल्या ऊसाच्या खोडव्यात तणांचा बंदोबस्त करणे आवश्यक असते. ऊसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची गतवर्गीय तणे आणि घोळू, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची गवतवर्गीय तणे आढळतात. ऊस बागायती पीक असल्यामुळे पिकाला वारंवार पाणी पाणी दिलं जातं पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास तिथे बेसुमार तणांची वाढ होत राहते याच तणांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे म्हणूनच आजच्या या लेखात आपण ऊसाच्या खोडवा पिकातील तण व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures) :

  • जमिनीची पूर्वमशागत म्हणजेच नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी इ. मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करावीत.
  • लव्हाळ्याच्या गाठी, हळदीच्या काश्या, कुंदाची खोडे व मुळे वेचून ती जाळावीत.
  • टारफुलासारखे परोपजीवी तण ज्वारीच्या पिकातून ऊसात येतात.
  • त्यासाठी या तणांचा बंदोबस्त उभी ज्वारी असतानाच करावा व ज्वारीनंतर ऊसाचे पीक घेऊ नये.
  • पूर्वीचे पीक निघाल्यानंतर राहिलेली तणे, धसकटे वेचून जाळून नष्ट करावी.
  • खतांची मात्रा शिफारसी प्रमाणे वापरावी.
  • तणे काढताना ती मुळासकट काढली तर त्याचा फायदा होतो नाही तर ते तण पुन्हा जोमाने वाढतात. त्यामुळेच खुरपणी ही वेळेवर करणे व तणे मुळासकट काढणे आवश्यक आहे.
  • आडसाली तसेच पूर्वहंगामी लागवड केलेल्या ऊसातील तण नियंत्रणासाठी सुरुवातीला बाळबांधणी सारखी आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे.

आंतरपिकाचे महत्व :

  • आंतरपीकांमुळे तणांचे नियंत्रण होते.
  • द्विदल वर्गातील आंतरपीके ऊसात घेतल्यास हवेतील नत्राचे जामिनीत स्थिरीकरण होऊन नत्राची उपलब्धता वाढते.
  • बैल किंवा ट्रॅक्टर अवजारांच्या साहाय्याने मोठ्या बांधणीपूर्वी व नंतर देखील अंतरमशागत करावी.
  • पट्टा पद्धत व रुंद सरीमध्ये पाचटाचे अच्छादन करावे किंवा आंतरपीके व हिरवळीचे पीक घेऊन त्याचे आच्छादन करावे.

रासायनिक नियंत्रण (Weed control) :

  • रासायनिक तणनाशकांचा वापर करून तणांचा बंदोबस्त करता येऊ शकतो.
  • तणनाशकाची पहिली फवारणी ऊस लागवडीनंतर जमिनीच्या वापश्यावर 3 ते 5 दिवसांनी व दूसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 30 दिवसांनी करावी.
  • तणनाशकाची फवारणी करण्यासाठी खालील पैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी करावी.
  • ऊस पिकातील लांब आणि रुंद पानांच्या तणांसाठी, तण 2 ते 4 पाने अवस्थेत असताना अमेट्रीने 80% डब्ल्यूडीजी (अदामा-तमर) 1 किलो प्रति 150 लिटर पाणी प्रति एकर याप्रमाणे घेऊन एकरी फवारणी करावी किंवा
  • हॅलोसल्फुरॉन मिथाइल 75% डब्ल्यूजी (धानुका-सेम्प्रा) 36 ग्रॅम प्रति एकर प्रति 150 ली पाणी प्रमाणात फवारणी करावी.
  • ऊसाच्या खोडवा पिकामध्ये तण नियंत्रणासाठी मेट्रीब्युझीन 70% डब्ल्यू.पी. (देहात-मेट्रीमॅक्स) या तणनाशकाची शिफारस केली आहे. अरुंद व रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी ऊस-उगवणीपूर्वी 400-500 ग्रॅम/एकर व उगवणीनंतर 300 ग्रॅम/एकर या प्रमाणात वापरावे. याचा परिणाम २ महिने टिकून राहतो. विशेष म्हणजे ऊसावर याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. पण याची फवारणी केली तर कोणतेही आंतरपीक टिकत नाही.

तणनाशके फवारताना खालील गोष्टींची काळजी घ्या (Herbicide) :

  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • तणनाशकाचा वापर शिफारशीनुसार व वेळेवर करावा.
  • तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा पंप वापरावा.
  • तणनाशक फवारताना द्रावण सतत ढवळावे. संपूर्ण क्षेत्रावर एकसारखे तणनाशक फवारावे.
  • तणनाशकांची फवारणी सर्व ठिकाणी एकसमान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
  • तणनाशक फवारल्यानंतर तीन ते चार दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
  • तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी वाऱ्याचा वेग, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पाऊस येण्याची शक्यता या बाबी विचारात घ्याव्यात.
  • फवारणीवेळी फवारा मारणाऱ्या व्यक्तीने मागे सरकत जावे. जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जागी पावले पडणार नाहीत.
  • उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना द्रावण मुख्य पिकांवर किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी हूडचा वापर करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
  • तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.

तुम्ही तुमच्या ऊसातील खोडवा पिकाचे तणांपासून संरक्षण कसे करता? आणि कोणती तणनाशके वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. ऊसाची लागवड महाराष्ट्रात कोणत्या हंगामात करतात?

महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे तीन हंगामात घेतले जाते. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी असे प्रकार आहेत.

2. ऊसाच्या खोडवा पिकातील प्रमुख तण कोणते?

ऊसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची गतवर्गीय तणे आणि घेळ, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची गवतवर्गीय तणे आढळतात.

3. महाराष्ट्रातील सर्वात जास्त ऊस उत्पादक जिल्हे कोणते?

पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद हे प्रमुख ऊस उत्पादक जिल्हे आहेत.

39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ