पोस्ट विवरण
देहात कंपनीचे गव्हाचे DWS 555 वाण उत्पादन देईल भरमसाठ - श्री. निखिल मुरुमकर (Wheat DWS 555)
गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगांसारख्या रोगांप्रति सहनशील असणारे तसेच आकर्षक कणीसे असणारे असे देहातचे DWS 555 वाण सर्वोत्कृष्ट असून त्याची लागवड सर्वांनी करावी, असा सल्ला देहातचे अकोला जिल्हा विस्तार प्रमुख श्री. निखिल मुरुमकर यांनी अकोल्यातील नायगाव येथील आदित्य कृषी केंद्र येथे आयोजित केलेल्या "पिक पाहणी कार्यक्रमात" शेतकऱ्यांना दिला.
देहात कंपनीच्या गव्हाच्या DWS 555 या वाणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा "पिक पाहणी कार्यक्रम", अकोल्यातील नायगाव येथील आदित्य कृषी केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला नायगाव येथील 30 पेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवली. सदर कार्यक्रमात भरघोस व दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या DWS 555 या वाणाबद्दलची माहिती तसेच, देहातच्या सेवा, देहाताची इतर उत्पादने व पशु खाद्य याबद्दलची देखील माहिती शेतकरी बांधवांना दिली.
DWS - 555:
- झाडाची उंची: 98-105 सेमी
- प्रतिकूल परिस्थितीत पडण्यास सहनशील वनस्पती
- उच्च उत्पन्न
- आकर्षक कणीसे
- 1000 धान्यांचे वजन: 46 ग्रॅम
- काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगां प्रति सहनशील.
- पेरणीची वेळ: 10 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान
बियाणे दर: 40 किलो/एकर
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ