पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
18 Apr
Follow

चाऱ्याची कमतरता असताना कसा असावा जनावरांचा आहार? (when there is a shortage of fodder What should be the Animals feed?)


नमस्कार पशुपालकांनो,

संतुलित आहारा अभावी जनावरांची जनुकीय क्षमता कमी होऊ लागते. यासोबतच जनावरांना अनेक प्रकारच्या पोषक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.

बहुतेक लहान शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांसाठी संतुलित आहाराची व्यवस्था करणे कठीण जाते. एप्रिल ते जून महिन्यात अनेकदा चाऱ्याची कमतरता भासते. यावेळी चारा उपलब्ध असला तरी त्याचा दर्जा कमी असतो. याशिवाय काही वेळा अतिवृष्टी किंवा अति तापमानामुळे पिकांचे नुकसान होते आणि याचा थेट परिणाम जनावरांसाठीच्या चारा उपलब्धतेवर होतो. अशा परिस्थितीत सायलेज करून आपण चारा दीर्घकाळ टिकवून ठेवू शकतो. याशिवाय अनेक पिके आहेत जी जनावरांच्या आहारात समाविष्ट केली जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया चाऱ्याची कमतरता असताना जनावरांना नेमकं काय खायला द्यावं याविषयी.

जनावरांचा संतुलित आहार म्हणजे काय?

सुदृढ जनावरांच्या आरोग्यासाठी सकस आहार (Healthy Animal Diet) आवश्यक असतो. प्रत्येक जनावराला त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार आहाराचा पुरवठा (Animal Diet Management) होणे गरजेचे असते. जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता या सर्व बाबी विचारात घेऊन पोषक अन्नघटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे यास ‘संतुलित आहार’ (Animal Diet) असे म्हणतात. आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे मिश्रण असणे आवश्यक आहे.

जनावरांचा आहार कसा असावा:

  • आहारात नियमितपणा असावा. जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकांत अचानक बदल करू नये.
  • प्रत्येक जनावराला रोज वाळलेला चारा, हिरवा चारा (एकदल आणि द्विदल), पशुखाद्य (Animal feed) व खनिज मिश्रण द्यावे. वाळलेला चारा, हिरवा चारा कुट्टी करूनच द्यावा.
  • आहार शुष्क तत्त्वाच्या आधारावर द्यावा. देशी गाईंना 2 ते 2.5 टक्के तर म्हशींना व संकरित गाईंना त्यांच्या वजनाच्या 2.5 ते 3 टक्के शुष्क पदार्थाची गरज असते.
  • पशू आहारात 2/3 भाग वैरण तर 1/3 भाग पशुखाद्य असावे.
  • एकदल वर्गातील हिरवा चारा (मका, कडवळ, ओट, बाजरी, नेपियर इ.) यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते.
  • द्विदल वर्गातील चारा (लुसर्न, बरसीम, सुबाभूळ, चवळी, शेवरी) यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
  • वाळलेली वैरण जसे कडबा, सरमाड, पेंढा, वाळलेले गवत, बगॅस, गव्हाचे काड आणि उसाचे वाढे यामध्ये एकूण पचनीय पदार्थांचे प्रमाण फार कमी असते.
  • जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागविण्यासाठी चिलेटेड खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे.
  • हिरवा चारा मुबलक प्रमाणात दिल्यास पशुखाद्यावरील 30 टक्के खर्च कमी करता येतो.
  • संतुलित आहारासह पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी द्यावे. दिवसातून साधारण 3 वेळा ताजे आणि स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे.
  • जनावरांना पिण्यासाठी दिले जाणारे पाणी वासरहीत, रंगहीन असावे. त्यात कोणतेही अपायकारक क्षार नसावेत. पाण्याची नियमित तपासणी करावी.
  • जनावरांना पिण्यासाठी दररोज साधारणपणे 80 ते 100 लिटर पाणी द्यावे.

उन्हाळ्यातील चारा कमतरतेचा परिणाम दुग्धोत्पादनावर होतो. सध्याच्या काळात धान्य मिश्रित खाद्य, ऊस चिपाडे, पीक अवशेषांपासून पूरक खाद्य मिश्रण तयार करणे आवश्‍यक आहे. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने खाद्य मिश्रण तयार करून त्याचा उपयोग चाराटंचाईच्या काळात करावा. योग्य खाद्याअभावी जनावरांची वाढ खुंटते, प्रजोत्पादनावर परिणाम होतो. दूध, मांस उत्पादनात घट येते, विविध आजार होतात. हे लक्षात घेऊन जनावरांच्या आहारात पुरेसा चारा, खाद्य मिश्रणांचा वापर करावा. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्‍याची कमतरता असते. या काळात आपल्याला जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी पूरक खाद्य मिश्रण तयार करणे आवश्‍यक आहे.

आता जाणून घेऊया चाऱ्याची कमतरता असताना जनावरांना काय खायला द्यावे?

  • काही कारणास्तव बाजारात उपलब्ध असलेल्या पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात समावेश करता येत नसेल तर खाली नमूद केलेल्या पिकांचा आहार जनावरांना द्यावा.
  • पिकांचे अवशेष जनावरांच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात.
  • केळीच्या झाडांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे जनावरांच्या खाद्यामध्ये केळ्यांचा समावेश करावा. यामुळे जनावरांना वेगळे पाणी पाजण्याची आवश्यकता देखील कमी होते.
  • शेंगदाण्याच्या भुस्यात प्रथिनांचे प्रमाण बरसीम एवढेच असते. त्यामुळे जनावरांच्या आहारात शेंगदाण्याच्या भुस्याचा समावेश हा एक उत्तम पर्याय आहे.
  • आंब्याच्या बियांमध्ये प्रथिने, ऊर्जा आणि टॅनिन मुबलक प्रमाणात असतात. जनावरांना दिल्या जाणाऱ्या एकूण आहारात 10 टक्के आंब्याच्या बियांचा समावेश करता येतो.
  • धान्य मिश्रित खाद्यामध्ये कडबा, गवत, तूस आणि धान्य यांचे 50 - 50 मिश्रण करून घ्यावे. ते जनावरांना खायला द्यावे. दररोज एका जनावराला दूध उत्पादनानुसार हे खाद्य मिश्रण द्यावे. यामुळे जनावरांची भूक वाढते, चाऱ्याची पचनीयता वाढते.
  • रस काढल्यानंतर उसाची चिपाडे फेकून दिली जातात. अशा चिपाडांचा वापर पूरक खाद्यनिर्मितीसाठी करता येतो.
  • ज्वारी, मक्याची चिपाडे, सूर्यफूल, शेंगदाण्याचा भुसा, भुईमुगाची टरफले, जंगली गवत याचा उपयोग 12 ते 15 टक्के प्रथिने असलेले खाद्य बनविता होतो. या पदार्थातील गंधक व स्फुरद खाद्याची पचनीयता वाढविणासाठी मदत करते.

जनावरांसाठी संतुलित आहाराचे फायदे:

  • जनावरांच्या शरीराची वाढ व एकूणच आरोग्य उत्तम राहते.
  • दूध उत्पादनात वाढ होते.
  • वासरांची योग्य वाढ होऊन लवकर माजावर येण्यास मदत होते.
  • रोगप्रतिकार क्षमता वाढते. परिणामी जनावरे आजारास बळी पडण्याचे प्रमाण कमी होते.
  • जनावरांचे आरोग्य सुधारते.
  • उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर होतो.

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. तुम्ही तुमच्या जनावरांना चाऱ्याची कमतरता असताना कसा आहार देता? त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. जनावरांचा संतुलित आहार म्हणजे काय?

जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता या सर्व बाबी विचारात घेऊन पोषक अन्नघटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे यास ‘संतुलित आहार’ (Animal Diet) असे म्हणतात.

2. जनावरांना संतुलित आहार न मिळाल्यास त्यांच्यावर काय परिणाम होतात?

संतुलित आहारा अभावी जनावरांची जनुकीय क्षमता कमी होऊ लागते. यासोबतच जनावरांना अनेक प्रकारच्या पोषक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.

3. योग्य आहाराअभावी जनावरांवर काय परिणाम होतात?

योग्य खाद्याअभावी जनावरांची वाढ खुंटते, प्रजोत्पादनावर परिणाम होतो. दूध, मांस उत्पादनात घट येते, विविध आजार होतात.

43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ