पोस्ट विवरण
सुने
कृषि
पपीता
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
26 Apr
Follow

पपई पिकाची लागवड कधी करावी? (When to cultivate Papaya crop?)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

महाराष्ट्रात पपईची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पपई हे एक उष्णकटिबंधीय फळ असून, गेल्या तीन ते चार वर्षांत देशातील पपई निर्यातीमध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. तसेच निर्यातमूल्यामध्ये पण सुमारे दोन पटींनी वाढ झाली आहे. पपईची मागणी वाढल्याने आता शेतकरी मोठ्या प्रमाणात पपई लागवडीकडे वळत आहेत. पपईच्या पिकापासून कमी कालावधीत, कमी खर्चांत बर्‍यापैकी उत्पादन मिळते म्हणूनच आजच्या लेखात आपण पपई लागवड तंत्राविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

पपईची लागवड कधी करतात :

पपईची लागवड ही वर्षातून तीन वेळा करता येते. ते म्हणजे

  • जून-जुलै
  • सप्टेंबर-ऑक्‍टोबर किंवा
  • फेब्रुवारी-मार्च दरम्यान

पपईसाठी योग्य हवामान (Weather) :

  • पपईसाठी उष्ण व कोरडे हवामान आणि योग्य पाणीपुरवठा असलेले ठिकाण आवश्यक असते.
  • पपईची वाढ 38 ते 44 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते.
  • तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्यास पिकावर प्रतिकूल परिणाम होतो.
  • उबदार आणि समतोल उष्णतामान या पिकास योग्य समजले जाते.

पपईसाठी योग्य जमीन (Soil) :

  • पपईच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन योग्य असते.
  • पपईची मुळे जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे मध्यम खोलीची पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असलेली सकस जमीन या पिकास चांगली मानवते.
  • चांगली मशागत करून आणि भरपूर सेंद्रिय खते घालून पपईचे पीक हलक्या जमिनीतही घेता येते.

पपईच्या जाती (Varieties) :

  • पपईच्या अनेक जाती आहे त्यामध्ये
  • कॉरग मध दव (रियल सीड्स)
  • तैवान 786 (रेड लेडी): (नो यु सीड्स)
  • रेड बेबी हायब्रीड (नो यु सीड्स)
  • ग्रीन बेरी/ रास्पबेरी- (औस इको वेल)
  • एक्सप -15 (नो यु सीड्स)
  • या जाती उत्तम मानल्या जातात.

पपई लागवडीसाठी पूर्व मशागत:

  • पपई लागवड करण्यापूर्वी जमिनीची उभी आणि आडवी दोन्ही बाजूने नांगरणी करून घ्यावी.
  • त्यानंतर त्यावर 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन सपाट व भुसभुशीत करून घ्यावी.

पपईची लागवड (Cultivation) :

  • पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि स्थनिक परिस्थितीनुसार हंगामाची निवड करावी.
  • जून ते जुलैमध्ये अधिक पाऊस आणि भारी जमीन असलेल्या भागात जून ते जुलैची लागवड शक्यतो करू नये.
  • पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर पुढे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये लागवड करावी.
  • पपईची लागवड करण्यासाठी शेतात 45 बाय 45 बाय 45 सें.मी. आकाराचे खड्डे 1.8 बाय 1.8 मीटर अंतरावर खोदावे.
  • खड्ड्यात एक ते दोन किलो शेणखत टाकून त्यात उभयलिंगी पपईची रोपे लावावीत.
  • सर्वसाधारण पपईला दोन महिन्यांनी एकदा खत दिले जाते.
  • एका महिन्यानंतर प्रत्येक झाडाला 90 ग्रॅम युरिया, 250 ग्रॅम सुपर फॉस्फेट, 140 ग्रॅम पोटॅश द्यावे.
  • पुढे खत देताना निंबोळी खत तसेच शेण खताचा पण वापर करावा.
  • अशा पद्धतीने प्रति एकरी 1200 झाडांची देखभाल करावी.

आंतरपीक:

  • शेतात पहिल्या सहा महिन्यांमध्ये भाजीपाला लावावा.
  • पपई मध्ये आंतरपीक घेतल्याचा दुहेरी फायदा होतो.
  • विशेषत: तणांचे प्रमाण कमी होते; आणि आर्थिक फायदा देखील होतो.

खत व्यवस्थापन (Fertilizer Management) :

  • ज्या क्षेत्रामध्ये पपईची लागवड करायची आहे त्या क्षेत्रामध्ये आडवी उभी नांगरणी करताना प्रति हेक्टरी वीस टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत मिसळावे.
  • लागवडीवेळी युरिया 110 ग्रॅम, DAP 110 ग्रॅम, MoP 80 ग्रॅम प्रति झाड द्यावे.
  • लागवडीनंतर तिसऱ्या महिन्यात युरिया 110 ग्रॅम, DAP 110 ग्रॅम, MoP 80 ग्रॅम प्रति झाड द्यावे.
  • लागवडीनंतर पाचव्या महिन्यात युरिया 110 ग्रॅम, DAP 110 ग्रॅम, MoP 80 ग्रॅम प्रति झाड द्यावे.
  • लागवडीनंतर सातव्या महिन्यात युरिया 110 ग्रॅम, DAP 110 ग्रॅम, MoP 80 ग्रॅम प्रति झाड द्यावे.

पाणी व्यवस्थापन (Water Management) :

  • पपईला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
  • जास्त पाण्यामुळे पपईची मुळे कुजतात आणि खूप लवकर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो.
  • ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे पपई बागेतील पाण्याचा निचरा उत्तम राहतो आणि गरजे इतकेच पाणी दिल्याने पपई जास्त निरोगी व जोमदार वाढते.
  • दर्जेदार व वजनदार फळे मिळतात.
  • झाडाच्या दोन्ही बाजूला एक फूट अंतरावर ठिबक इमिटर बसवावेत.
  • दररोज दर झाडाला बारा लिटर पाणी मिळेल तीन महिन्यानंतर हे प्रमाण वाढवत जावे.

पपई पिकात आढळणारे प्रमुख रोग व कीटक (Papaya Insects and Disease) :

पपईच्या पिकाला लागणारे मुख्य रोग अँथ्रॅकोनोझ, पावडरी बुरशी, स्टेम रॉट, आणि damping off हे आहेत. हे रोग मुळांच्या आसपास पाणी साचल्यामुळे होतात. तसेच पपई पिकात  मावा, लाल कोळी, खोड माशी, राखाडी भुंगा आणि नाकतोड्या हे मुख्य कीटक आढळून येतात.

काढणी:

  • लागवडीनंतर 9 ते 10 महिन्यांनी पपई ची फळे काढणी योग्य होतात.
  • पपईच्या झाडाला वर्षभर फळे लागत असतात. त्यामुळे एकाच वेळी सर्व फळांची काढणी करता येत नाही.
  • फळांची तोडणी करताना फळे देठांसह तोडावीत.
  • फळे पूर्ण तयार झाल्यावर काढल्यास चव उत्तम मिळते. परंतु लांबच्या बाजारपेठांसाठी पूर्ण वाढलेली फिक्कट हिरवी आणि कडक फळे काढावीत.

उत्पादन:

एका झाडापासून प्रत्तेक वर्षाला 70-80 फळे मिळतात, फळांचे वजन साधारणतः 500 ग्रॅम ते 3 किलो असते. म्हणजेच दर एकरी दरवर्षी सरासरी 12-15 टन उत्पादन मिळते.

तुम्ही पपई पिकाची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. पपई लागवडीसाठी योग्य वेळ कोणती?

पपई लागवडीसाठी जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्‍टोबर किंवा फेब्रुवारी-मार्च दरम्यानची वेळ योग्य मानली जाते.

2. पपई पिकात आढळणारे मुख्य रोग कोणते?

पपईच्या पिकाला लागणारे मुख्य रोग अँथ्रॅकोनोझ, पावडरी बुरशी, स्टेम रॉट, आणि damping off हे आहेत. हे रोग मुळांच्या आसपास पाणी साचल्यामुळे होतात.

3. पपई पिकात आढळणारे मुख्य कीटक कोणते?

पपई पिकात मावा, लाल कोळी, खोड माशी, राखाडी भुंगा आणि नाकतोड्या हे पपईच्या वनस्पतींवर हल्ला करणारे कीटक आहेत.

50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ