पोस्ट विवरण
सुने
उर्वरक
प्याज
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
22 Jan
Follow

कांदा पिकात कोणते खत वापरावे? (Which fertilizer should be used in Onion crop?)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

कांदा हे व्यापारिक दृष्ट्या जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केले जाणारे भाजीपाला पीक आहे. कांद्याची लागवड साधारणपणे रब्बी हंगामात मैदानी आणि मध्य डोंगरी भागात केली जाते परंतु अनेक भागात हे पीक खरीप हंगामातही घेतले जाते. भारतीय कांद्याची मागणी परदेशातही चांगली आहे, त्यामुळे ते एक महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे. कांदा पिकविणाऱ्या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे हेक्टरी कांदा पिकविण्यासाठी प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा, विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील 37 टक्के तर भारतातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन एकटया नाशिक जिल्हयात घेतले जाते. आज आपण याच भरघोस उत्पादन आणि उत्पन्न देणाऱ्या कांद्याच्या खत व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

कांदा लागवडीच्या आधी 1 दिवस करावयाचे खत व्यवस्थापन (बेसल डोस) : सर्व खते मिक्स करून मातीमध्ये मिसळावीत किंवा बेड वर लागवड करणार असल्यास बेड भरून घ्यावेत.

  • डी.ए.पी. - 100 किलो प्रति एकर
  • एम.ओ.पी. (पोटाश) - 50 किलो प्रति एकर
  • सल्फर - 8 किलो प्रति एकर
  • मायक्रोनुट्रीएंट खत - 10 किलो प्रति एकर
  • देहात स्टार्टर - 4 किलो

लागवडीनंतर 15 दिवसांनी ड्रीपद्वारे किंवा पाटपाण्याने रोपांच्या मुळांच्या विकासासाठी आणि पिकाच्या चांगल्या वाढीसाठी करावयाचे खत व्यवस्थापन:

  • 19:19:19 (देहात न्यूट्री - एनपीके) - 2 किलो प्रति एकर
  • ह्यूमिक एसिड (देहात - पंच) - 1 किलो प्रति एकर

लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांनी दोन्ही खते प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:

  • 19:19:19 (देहात न्यूट्री - एनपीके) - 50 ग्रॅम
  • न्यूट्री वन बूस्ट मास्टर  - 30 मिली

लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:

  • 12:61:00 (देहात न्यूट्री - एमएपी) - 70 ग्रॅम
  • चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट - 15 ग्रॅम

लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:

  • 13:00:45 (देहात न्यूट्री - केएनओ3) - 75 ग्रॅम
  • बोरॉन 20% - 15 ग्रॅम

लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांनी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:

  • 00:52:34 (देहात न्यूट्री - एमकेपी)  - 75 ग्रॅम
  • न्यूट्री वन बोरॉन 20% - 15 ग्रॅम
  • समुद्री शेवाळ अर्क - 15 ग्रॅम

लागवडीनंतर 80 ते 100 दिवसांनी  प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावयाची फवारणी:

  • 00:00:50 (देहात - न्यूट्री एसओपी) - 75 ग्रॅम
  • चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट - 15 ग्रॅम

वरील सर्व खते देताना अमलात आणायच्या महत्त्वाच्या गोष्टी:

  • वरील खतांचा डोस मातीपरीक्षां आवहालानुसार बदलू शकतो.
  • फवारणी करताना प्रत्येक वेळी स्टिकरचा वापर करावा.
  • फवारणी करताना शेतात ओलावा असणे आवश्यक आहे.
  • नमूद केलेली खते जास्त प्रमाणात देऊ नये.
  • पिकावर सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.
  • फवारणी मध्ये बुरशीनाशके आणि खत मिसळताना कृषी तंज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार कांद्याची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या कांदा पिकाची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. कांदा लागवडीसाठी जमीन कशी असावी?

कांदा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा.

2. कांदा पिकाची लागवड कधी करावी?

कांदा पिकाची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्‍यात करावी.

3. कांदा लागवडीसाठी किती बियाणे लागते?

कांदा लागवडीसाठी एकरी 2 किलो बियाणे पुरते. नेहमीच्या पद्धतीमध्ये 3.5 किलो बी लागते.

31 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ