पोस्ट विवरण
सुने
ईख
कीट
नाशीजीव प्रबंधन
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
8 Nov
Follow

ऊस पिकामध्ये हुमणी व्यवस्थापन (White Grub (Humani) Management in Sugarcane crop)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भारतात महाराष्ट्र राज्याचा ऊस क्षेत्रात दुसरा क्रमांक लागतो. दरवर्षी ऊसा खालील क्षेत्रामध्ये वाढ होतच आहे. पश्चिम महाराष्ट्राची ओळख ऊस पीक घेणारे क्षेत्र म्हणून आहे. आता मराठवाडा व विदर्भात सुद्धा ऊसाच्या क्षेत्रामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. महाराष्ट्रात ऊसा खालील क्षेत्र हे अकरा लाख हेक्टर व त्यापेक्षा जास्त आहे. याच ऊस पिकात अवर्षण स्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या प्रमुख कारणांमुळे राज्यामध्ये गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये हुमणी किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊस उगवणीमध्ये 40 टक्क्यापर्यंत, तर उत्पादनामध्ये 15 ते 20 टनापर्यंत नुकसान होते. म्हणूनच आजच्या या भागात आपण हुमणी किडीच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

हुमणी किडीविषयी (About White Grub Insect):

  • जमिनीमध्ये राहून पिकाची मुळी खाऊन आर्थिक नुकसान करणारी कीड म्हणजे हुमणी.
  • या किडीचे लवकर नियंत्रण न केल्यास पिकाचे 30-70% नुकसान होऊ शकते.

हुमणी किडीच्या नुकसानीचा प्रकार:

  • प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर किंवा जिवंत मुळे मिळाल्यास मुळांवरच उपजीविका करतात.
  • त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस व इतर पिकांची मुळे जून-ऑक्टोबर महिन्यात खातात.
  • मुळे खाल्ल्यामुळे पिकाचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडते.
  • प्रादुर्भावग्रस्त ऊस निस्तेज दिसतो व पाने मरगळतात.
  • पाने हळूहळू पिवळी पडण्यास सुरूवात होते व वीस दिवसात पूर्णपणे वाळतात.
  • ऊसाची मुळे कुरतडल्यामुळे संपूर्ण ऊस वाळतो आणि वाळक्या काठीसारखा दिसतो.
  • एका ऊसाच्या बेटाखाली जास्तीतजास्त 20 पर्यंत अळ्या आढळतात.
  • एक ऊसाचे बेट एक अळी तीन महिन्यात तर दोन किंवा जास्त अळ्या एक महिन्यात कुरतडून कोरडे करतात.
  • जमिनी खालील ऊसाच्या कांड्यांवरही अळी उपद्रव करते. प्रादुर्भावग्रस्त ऊसाला हलकासा झटका दिल्यास ऊस सहजासहजी उपटून येतो.
  • होलोट्रॅकियाच्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या उगवणीत 40% पर्यंत नुकसान होते. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास 100% पर्यंत नुकसान होते.
  • हेक्टरी 25000 ते 50000 अळ्या आढळल्यास साधारणपणे 15 ते 20 टनापर्यंत नुकसान होते.
  • हुमणीची 12 महिन्यात एकच पिढी तयार होत असली तरी अळीचा जास्त दिवसांचा कालावधी आणि पिकाच्या मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता यामुळे पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान होते.

हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण:

  • हुमणीच्या नियंत्रणासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण होत नाही. त्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन आवश्यक आहे. हुमणी कीडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात. हुमणी नियंत्रणाचे उपाय योग्य वेळीच योजणे अत्यंत महत्वाचे आहे. ही वेळ टळल्यास नियंत्रण उपायांचा हवा तसा परिणाम होत नाही.

मशागत:

  • नांगरणी : ऊस लागवडी अगोदर एप्रिल-मे किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शेत 2 ते 3 वेळा उभे आडवे खोलवर नांगरावे. नांगरणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी. त्यावेळी पक्षी व प्राणी मातीच्या वर आलेल्या अळ्या, कोष व भुंगेरे खातात.
  • ढेकळे फोडणे : शेतातील ढेकळे फोडावीत. मातीचे ठेकूळ मोठे राहिल्यास त्यात हुमणीच्या निरनिराळ्या अवस्था राहण्याची शक्यता असते. त्यासाठी तव्याचा कुळव किंवा रोटाव्हेटर वापरून ढेकळे फोडावीत.
  • पीक फेरपालट : ऊसाच्या तोडणीनंतर अति प्रादुर्भावग्रस्त शेतात ऊसाचा खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे व सूर्यफुल काढणीनंतर शेताची 3-4 वेळा नांगरट करावी. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जास्त पावसाच्या भागात भात हे फेरपालटीचे पिक म्हणून घ्यावे.
  • सापळा पीक : भुईमूग अथवा ताग पिकाचा हुमणीग्रस्त शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. ऊसाची उगवण झाल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी भुईमूग अथवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमुग अथवा तागाखालील अळ्या माराव्यात.
  • अळ्या मारणे : शेतात कोणतेही मशागतीचे काम करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या गोळा करून माराव्यात.
  • प्रौढ भुंगेरे गोळा करून मारणे : वळवाचा पाऊस पडल्यानंतर होलोट्रॅकिया प्रजातीचे भुंगेरे जमिनीतून एकाच वेळी बाहेर पडतात आणि बाभुळ व कडूनिंबाच्या झाडावर जमा होतात. फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ल्युकोफोलिस प्रजातीचे भुंगेरे ऊसाच्या पानांवरून गोळा करून मारावेत. प्रकाश/कॉम्बो सापळ्यांचा वापर करून भुंगेरे गोळा करून मारावेत. भुंगेरे गोळा करून नष्ट करणे हे नियंत्रण उपायांमध्ये सर्वात प्रभावी व कमी खर्चाचे आहे. तसेच यामुळे पुढील संक्रमण थांबविले जाते. सतत 3-4 वर्षे भुंगेरे गोळा करून मारावेत. सामुदायिकरित्या भुंगेरे गोळा केल्यास हुमणी कीडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास चांगली मदत होते.
  • अति प्रादुर्भावग्रस्त शेतात ऊसाचा खोडवा घेऊ नये.
  • पीक निघाल्यानंतर हुमणीग्रस्त शेताची मशागत रोटाव्हेटरने करावी.

ऊस पिकातील हुमणी कीड जैविक नियंत्रण:

  • जैविक कीड नियंत्रक ज्यामध्ये बिव्हेरिया बॅसियना, मॅटेरायझियम अ‍ॅनीसोपली यांचा कंपोस्ट खतात मिसळुन, एकरी 10 किलो या प्रमाणात वापर करावा. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट निर्मित जैविक कीटकनाशक बीव्हीएम  एकरी 2 लिटर 400 लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणीद्वारे द्यावे किंवा किंवा ठिबक सिंचनातून द्यावे.
  • जीवाणू-बॅसिलस पॅपीली व सूत्रकृमी-हेटरोरॅबडेटीस हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्याचाही वापर करून काही प्रमाणात हुमणीचे नियंत्रण करता येते.
  • कडूनिंब अथवा बाभळीच्या झाडावर क्लोरपायरीफॉस 20% ईसी (टाटा रैलिस-तफाबान) 2 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे. किटकनाशके फवारलेली पाने खाल्ल्याने भुंगेऱ्याचा बंदोबस्त होण्यास मदत होते.
  • शेणखत, कंपोस्ट, इ. मार्फत हुमणीच्या लहान अळ्या व अंडी शेतात जातात. त्यासाठी एक गाडी खतात एक किलो 3 जी कार्बोफ्युरॉन दाणेदार मिसळावे व नंतर खत शेतात टाकावे. उन्हाळ्यात शेण खताचे लहान ढीग करावेत.

ऊस पिकातील हुमणी कीड रासायनिक नियंत्रण :

  • पीक लागवडीपूर्वी- कार्बोफुरोन 3% सीजी (क्रिस्टल-फुरादान) दाणेदार - 7 किलो प्रति एकरी प्रमाणे खतासोबत मिसळून द्यावे.
  • फिप्रोनिल 0.3% जीआर (देहात-स्लेमाईट) 5 किलो प्रति एकर द्यावे.
  • यजमान झाडांवर क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी (देहात-सी स्क्वेअर) 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यामध्ये 15 मिनिटे बुडवून लागण केल्यास किडीचा चांगल्या पद्धतीने बंदोबस्त होतो.
  • उभ्या पिकात उपद्रव आढळल्यास ड्रीप मधून किंवा पाटपाण्याने क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी (देहात-सी स्क्वेअर) 1 लिटर किंवा इमिडाक्लोप्रिड 40% + फिप्रोनिल 40% डब्ल्यू/डब्ल्यू डब्ल्यूजी (बायर-लेसेंटा) 150 ग्रॅम प्रति एकरी द्यावे.

तुम्ही तुमच्या ऊस पिकामधील हुमणी किडीचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

महाराष्ट्रात ऊस पिकाची लागवड कुठे होते?

ऊसाचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे येथे घेतले जाते.

ऊस पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?

ऊस पिकावर प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड, मूळ पोखरणारी अळी, खवले कीड तसेच पोक्का बोईंग, लालकूज, तांबेरा, ऊसाची चाबूक काणी आणि मर रोग यासारख्या प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळतो.

हुमणी कीड ऊसाचे काय नुकसान करते?

हुमणी कीड जमिनीमध्ये राहून पिकाची मुळी खाऊन आर्थिक नुकसान करते.

1. महाराष्ट्रात ऊस पिकाची लागवड कुठे होते?

ऊसाचे पीक प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे येथे घेतले जाते.

2. ऊस पिकावर कोणते रोग व कीटक दिसून येतात?

ऊस पिकावर प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड, मूळ पोखरणारी अळी, खवले कीड तसेच पोक्का बोईंग, लालकूज, तांबेरा, ऊसाची चाबूक काणी आणि मर रोग यासारख्या प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव आढळतो.

3. हुमणी कीड ऊसाचे काय नुकसान करते?

हुमणी कीड जमिनीमध्ये राहून पिकाची मुळी खाऊन आर्थिक नुकसान करते.

58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ