आंबा पिकामध्ये फेब्रुवारी महिन्यात करावयाची कामे (Work to be done in the Mango crop in February)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
पुरातन काळापासून भारतात आंब्याची लागवड केली जात असून 400 वर्षांपूर्वी पासून आंब्याचे व्यापारी तत्वावर लागवडीचे पुरावे आढळतात. फळांचा राजा आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. भारतात हे फळ सर्वत्र उपलब्ध होते. सर्वत्र लागवड केली जाते व सर्व स्तरातून प्रथम प्राधान्य दिले जाते. परिपक्व फळांचा आकर्षक रंग, मधूर चव आणि उत्कृष्ट पौष्टीकता या गुणांमुळे आंबा हे फळ जगातील अत्युच्य फळ समुहामध्ये वरच्या स्थानावर विराजमान झाले आहे. आंबा या पिकाखालील क्षेत्र व त्यापासून मिळणारे उत्पादन यांचा विचार केला तर भारताचा जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो. जगात 110 पेक्षा जास्त देशांमध्ये आंब्याचे उत्पादन घेण्यात येते. भारतामध्ये अतिथंडीचा, अतिउष्णतेचा, वाळवंटी प्रदेश सोडल्यास या पिकाची सर्वत्र लागवड दिसून येते. आंब्याचे अधिक उत्पादन घेणार्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा ह्या राज्यांचा क्रमांक लागतो. सध्या भारतामध्ये 1,297 हून अधिक आंब्याच्या जातींची लागवड झाल्याचे निदर्शनास आले आहे. व्यापारी तत्वावर हापूस, केसर, तोतापूरी, दशेरी, लंगडा या जाती उपलब्ध होत होत्या. परंतू आता या जातींबरोबरच इतरही जातींना मागणी वाढू लागली आहे. आंबा हे फळ बाजारात 90 ते 100 दिवस उपलब्ध असते. परंतू भारतात व परदेशातही आंब्याला वर्षभर मागणी आहे. आजच्या या लेखात आपण याच आंबा पिकामध्ये फेब्रुवारी महिन्यात करावयाच्या कामांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
आंबा झाडाच्या वयानुसार कोणत्या झाडाला किती पाणी द्यावे (Water Management According to the Age of Mango plant) याविषयी जाणून घेऊया.
- 1ले वर्ष: 6.8 ते 1 लिटर पाणी.
- 2रे वर्ष: 2.8 ते 3.3 लिटर पाणी.
- 3रे वर्ष: 6.3 ते 7.5 लिटर पाणी.
- 4 वर्ष पुढे: 10 ते 13 लिटर पाणी.
टीप: मोहोर आल्यानंतर हळूहळू पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन (Fertilizer Management) :
- आंबा पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे हे अतिशय महत्वाचे आहे.
- अतिसघन आंबा बागेसाठी व मध्यम स्वरूपाच्या अन्नद्रव्याचे घटक असलेल्या जमीनीमधील अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी खालील खतांची मात्रा शिफारस केली आहे.
- माती परिक्षणा आधारित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनाची शाश्वती खुपच अचुक होते.
अतिसघन आंबा पिकासाठी सर्वसाधारण जमीनीसाठी खत व्यवस्थापन:
- पहिल्यावर्षी : नत्र 35 ग्रॅम, स्फुरद 15 ग्रॅम, पोटॅश 25 ग्रॅम, शेणखत 5 किलो प्रति झाड द्यावे.
- दुसऱ्यावर्षी : नत्र 45 ग्रॅम, स्फुरद 25 ग्रॅम, पोटॅश 50 ग्रॅम, शेणखत 5 किलो प्रति झाड द्यावे.
- तिसऱ्यावर्षी : नत्र 75 ग्रॅम, स्फुरद 50 ग्रॅम, पोटॅश 75 ग्रॅम, शेणखत 10 किलो प्रति झाड द्यावे.
- चार वर्षाच्या पुढील झाडास : नत्र 120 ग्रॅम, स्फुरद 75 ग्रॅम, पोटॅश 100 ग्रॅम, शेणखत 15 किलो प्रति झाड द्यावे.
आंबा मोहोराची काळजी (Mango Flowering Care):
आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते. फेब्रुवारी महिन्यादरम्यान आंबा पिकात तुडतुड्यांचे प्रमाण अधिक असते. तसेच भुरी रोग देखील दिसून येतो. काही वेळेस प्रादुर्भाव एप्रिल महिन्यापर्यंत आढळून येतो. आंबा फळपिकामध्ये येणाऱ्या या कीटक व रोगामुळे पिकातील मोहर गळण्याचे प्रमाण वाढते. त्याचा फटका उत्पादनाला बसतो. यांच्या नियंत्रणावर लक्ष दिला नाही तर, प्रादुर्भाव थोड्या फार प्रमाणात वर्षभर दिसून येतो. चला तर मग आता जाणून घेऊया आंबा बागेतील मोहरावर फेब्रुवारी महिन्यात कीटक व रोगाच्या नियंत्रणासाठी काय व्यवस्थापन करावे याविषयी:
तुडतुड्यांचा जीवनक्रम (Leaf Hopper):
- अंडी: झाडावर मोहोर आल्यावर प्रौढ मादी फुले, कळ्या आणि पानांवर जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान 150 ते 200 अंडी पेशीमध्ये (मेरूदंड) घालते.
- पिल्ले: अंड्यातून पाच ते सात दिवसांत पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले पांढऱ्या रंगाची असून नंतर ती पिवळी, हिरवट करड्या रंगाची होतात. पिल्लांना पंख नसतात. ही अवस्था 10 ते 15 दिवसांची असते.
- प्रौढ: प्रौढ तुड्तुड्यांना पंख असतात. तुडतुडे झाडाच्या खाच खळग्यात लपलेले असतात. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान तुडतुडे सक्रिय असतात. त्यानंतर एप्रिल महिन्यात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
तुडतुड्यांमुळे होणारे नुकसान व त्याची लक्षणे:
- तुडतुड्याची पिल्ले आणि प्रौढ मोहराच्या वेळी कळ्या आणि फुलांमधून रस शोषतात. त्यामुळे कळ्या, फुले चिमटतात आणि त्यानंतर गळून पडतात.
- तुडतुड्याच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या गोड चिकट मधासारख्या पदार्थामुळे मोहोर व पानावर काळ्या बुरशीची वाढ होते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येतो. 50 ते 70% पर्यंत आंबा उत्पादनात घट येऊ शकते.
तुडतुड्यांच्या नियंत्रणाचे उपाय:
- आंब्याची बाग आंतरमशागत करून, स्वच्छ व तणविरहित ठेवावी.
- बागेत सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी झाडाच्या आतील भागातील फांद्याची योग्य प्रकारे छाटणी करावी.
- नत्र खताची मात्रा देताना शिफारशी प्रमाणेच द्यावी.
आंब्यावरील तुडतुड्यांची ओळख :
- किडीची 4 ते 5 मि. मी. लांबी, रंग हिरवट करडा असून, आकार पाचरीसारखा असतो.
- डोक्यावर तपकिरी रंगाचे तीन ठिपके असतात.
- तुडतुडे चालताना तिरपे चालतात ही त्याची प्रमुख ओळख आहे.
- आंब्याच्या मोहरावर प्रामुख्याने तुडतुड्यांच्या खालील तीन जातींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
तुडतुड्यांवरील जैविक नियंत्रण (300 लिटर पाणीप्रमाणे):
- व्हर्टिसिलियम लेकॅनी 1500 मिली : मोहर येत असताना फवारणी.
- निंबोळी अर्क - 5 टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन (10,000 पीपीएम) 1 ली प्रति 300 ली पाणी : प्रादुर्भावाच्या सुरवातीच्या अवस्थेत
- तुडतुड्यांवरील रासायनिक नियंत्रण (प्रति लिटर पाणीप्रमाणे) तीव्र प्रादुर्भाव असताना
- इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 14 ग्रॅम एकरी 300 ली पाण्यात मिसळून फवारावे किंवा
- थायमेथोक्सम 25% डब्ल्यू जी (देहात-असेर) 120 ग्रॅम 300 ली पाण्यात मिसळून एकरी फवारावे.
भुरी रोग ओळख (Powdery Mildew) :
- आंब्यावरील बुरशीजन्य रोगांपैकी पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी हा सर्वात जास्त हानिकारक रोग आहे.
- हा रोग पीक फुलोरा अवस्था म्हणजेच मोहोर लागते वेळी जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो.
- मोहरावर बुरशीची पुर्ण वाढ झाल्यावर पांढऱ्या रंगाची असंख्य बीजे तयार होतात व पान तसेच मोहरावर पांढरी भुकटी दिसून येते.
- थंड व दमट हवामान रोगवाढीस पोषक असल्याने हा रोग येतो.
- हवामानानुसार त्याची तीव्रता कमी-अधिक प्रमाणात दिसून येते.
- रात्रीचे तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत असल्यास आणि 80% पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता, जोडीला ढगाळ वातावरण असल्यास असे वातावरण भुरी (Powdery Mildew) रोगाच्या वाढीसाठी पोषक असते.
- आंब्याचा मोहोर, कोवळ्या पालवीवर बुरशींची तंतूमय वाढ त्यावर तयार होणारी असंख्य बीजे वाऱ्यामार्फत पसरतात.
- बुरशीच्या वाढीस व आंब्याला मोहोर येण्यासाठी लागणारे तापमान यामध्ये साम्य असल्यामुळे मोहरा पाठोपाठ भुरी रोग दरवर्षी येतोच.
भुरी रोग नुकसानीचा प्रकार:
- बुरशीच्या वाढीमुळे पेशीवरील अन्नरस शोषला जातो, प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते व मोहर करपतो.
- रोगाची तीव्रता अधिक असल्यास 60 ते 80 टक्क्यापर्यंत नुकसान होते.
- कोवळया पालवीवर रोग असल्यास पाने तांबुस व पांढरी होऊन वाळतात व गळून पडतात.
- फळधारणेनंतर रोग उद्भवल्यास फळांची गळ होते.
भुरी रोगावर उपाय:
पहिली फवारणी: फुले येण्यापूर्वी
- प्रोपिनेब 70% डब्ल्यू.पी (देहात-झिनाक्टो) प्रति एकर 600 ग्रॅम प्रति 300 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
- बोरॉन 20% (देहात-न्यूट्री वन) स्प्रे: 300 ग्रॅम 300 लिटर पाण्यात विरघळवा.
आणि
दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीनंतर 10-12 दिवसांनी.
- पिकाची बोरॉनची गरज भागवण्यासाठी पीक हंगामात दोन फवारण्या पुरेशा असतात किंवा
- थायमेथोक्सम 25% डब्ल्यू जी (देहात-असेर) 120 ग्रॅम 300 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारावे किंवा
- अमिनो ऍसिड 62% (देहात-फिक्सा) 600 मिली 300 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारावे फवारावे.
टीप:
- फवारणीसाठी लागणारी पाण्याची मात्रा अंदाजाने घ्यावी.
- झाडाचा आकार, वयोमान यानुसार पाण्याची मात्रा ठरवावी .
- फवारणी संपूर्ण झाडावर घ्यावी.
- तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच एकापेक्षा अधिक घटक मिसळा.
- फवारणी सकाळी 11 च्या आत व संध्याकाळी 4 नंतर द्यावी.
- फवारणीमध्ये (देहात-Lokke) 100 मि.लि. प्रति एकर वापरावे.
- फुलोरा काळात कीटकनाशकांची फवारणी घेऊ नये.
तुमच्या आंबा पिकात फेब्रुवारी महिन्यात काय व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. आंबा झाडाला लागणारे कीटक व रोग कोणते?
तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ठेकूण इ. कीटक तसेच करपा व भुरी रोग.
2. आंबा पिकाला मोहोर कधी येतो?
आंब्याच्या पिकाला मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते.
3. आंब्यावरील बुरशीजन्य रोगांपैकी सर्वात जास्त हानिकारक रोग कोणता?
पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी हा आंबा पिकावरील सर्वात जास्त हानिकारक रोग आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
