पोस्ट विवरण
यंदा 5 हजार टन आंबा निर्यात होणार, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन
महाराष्ट्रात मागच्या वर्षीच्या सिझनमध्ये आंबा उत्पादक शेतकरी संकटात होते परंतु यंदा परिस्थिती थोडी बदलल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पाऊस आणि किडीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हापूस आणि केसर आंबा उत्पादन चांगल्या पद्धतीचे झाल्याचे बोलले जात आहे. कोकणात आंब्याचे उत्पादन वाढल्याने दरही काहीसे कमी असल्याचे सध्या बाजारात दिसून येत आहे. तसेच उत्तम प्रतिच्या आंब्याला परदेशात मागणी वाढली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 5 हजार टन निर्यातीचे उद्धीष्ट मार्केट कमीटीचे आहे. मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमेरिका आणि युरोपसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये निर्यात करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच कोकणातील उत्तम प्रतिचा आंबा यावेळी सर्वच बाजारात उपलब्ध होईल असेही कृषी पणन मंडळाने माहिती दिली.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ