पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 July
Follow

यंदा सहा टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता

खानदेशात यंदा सुमारे सहा टक्के क्षेत्र नापेर राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी जमीन सुपीकतेच्या दृष्टीने क्षेत्र नापेर ठेवले असून, त्यात पुढे केळीसह रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे. खानदेशात काळ्या कसदार जमिनीत पाण्याचा निचरा कमी होतो. पीक फेरपालट करणे अनेकदा शक्य नसते. तसेच शेणखत व अन्य सेंद्रिय बाबींचा उपयोग होत नसल्याने जमीन सुपीकता टिकविण्यासंबंधी अडचणी येतात. या स्थितीत अनेक शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतात. नापेर क्षेत्र यंदाही अनेक भागांत आहे. तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रात नापेर क्षेत्र आहे. या क्षेत्रात उन्हाळ्यात पूर्वमशागत करण्यात आली. अनेकांनी केळीसाठी खोल नांगरणी केली व शेत भुसभुशीत करून त्यात पेरणी टाळली आहे.


22 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ