पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
प्याज
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
17 Jan
Follow

कांदा पिकाची पात/शेंडे पिवळी पडणे, कारणे आणि व्यवस्थापन! (Yellowing of leaves/tips of onion crop, causes and management!)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

कांदा पिकविणाऱ्या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. राज्यामध्ये प्रामुख्याने पुणे, नाशिक, धुळे, सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तसेच मराठवाडा व विदर्भातील काही भागात कांद्याची लागवड केली जाते. बाजारात वर्षभर कांद्याला चांगली मागणी असते. दर्जेदार कांद्याला कायम चांगले दर मिळतात. दर्जेदार कांदा उत्पादन घेण्यासाठी सुधारित तंत्राचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. रोपावस्थेपासून ते साठवणुकीपर्यंत कांदा पिकावर अनेक रोगांचा (Onion Disease) प्रादुर्भाव होतो. बदलत्या हवामानामुळे (Climate Change) पिकावर कीड-रोगांचा (Onion Pest Disease Management) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. परिणामी कांद्याची उत्पादकता कमी होत चालली आहे. प्रतिकूल हवामानात कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे सुमारे 50 ते 80 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. त्यातूनच कांदा हे पीक वातावरणाला अतिसंवेदनशील आहे. तसेच कांदा पिकाच्या पातीचे शेंडे पिवळे पडणे ही एक फार मोठी समस्या आहे. आजच्या आपल्या या भागात आपण कांदा पिकातील याच समस्येविषयीची व करावयाच्या उपाययोजनांविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कांदा पातीची टोके पिवळी पडण्यामागची कारणे:

  • कांदा पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा नाही झाला तरी शेंडे पिवळे पडतात.
  • कांद्याच्या मुळाची नीट वाढ होत नाही.
  • सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कांदा पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव झाला तर शेंडे पिवळे पडतात.
  • जास्त पाऊस असल्यास कांद्याच्या पातीवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन शेंडे पिवळे पडतात.
  • पिकांना जास्त प्रमाणात पाणी दिले तरी शेंडे पिवळे पडतात.
  • हिवाळ्यामध्ये प्रमुख्याने धुक्याचा प्रादुर्भाव झाला तरी शेंडे पिवळे पडायला लागतात.
  • कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास ही कांद्याच्या पातीवर पिवळे तपकिरी चट्टे पडतात.

उपाय:

  • रोपवाटिकेमध्ये बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% डब्ल्यू.एस (क्रिस्टल-Vaccinator) 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • कांद्याच्या रोपवाटिकेतील रोपांची उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसांनी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात-DeM45) 500 ग्रॅम + निम ऑइल 200 मिली + स्टीकर 100 मिली प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात एकरी दोन वेळा फवारणी करावी.
  • कांद्याच्या रोपाची लागवड करण्यापूर्वी कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी (देहात-साबू) 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
  • कांद्यावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसायला लागताच 10 ते 15 दिवसांच्या अंतराने कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी (देहात-साबू) 400 ग्रॅम बुरशीनाशकाची फवारणी 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी करावी.
  • या काळामध्ये फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  • फुलकिडींच्या नियंत्रणासाठी थिओमिथोक्साम 25 टक्के डब्लूजी (देहात-असेर) 100 ग्रॅम किंवा लॅम्बडा सायहैलोथ्रीन 5% ईसी (सिजेंटा-कराटे) 100 मिली + स्टिकर 100 मिली प्रती 200 लिटर पाणी याप्रमाणे आलटून-पालटून फवारणी करावी.
  • कांद्या पिकाला जास्त प्रमाणात पाणी देण्याऐवजी हलके पाणी द्यावे.
  • कांद्याचे शेंडे पिवळे पडले असतील किंवा वाढ नीट होत नसेल तर जैविक उपाय म्हणून अमिनो आणि फुल्वीक ऍसिड (बायर-अँबिशन) 400 मिली + ट्रायकोडर्मा व्हिरीडी 600 मिली प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या कांदा पिकाची पात/शेंडे पिवळे पडल्यास काय व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. कांद्याची लागवड कधी करावी?

महाराष्‍ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून -ऑगस्ट, रब्‍बी हंगामात सप्टेंबर -ऑक्टोबर आणि उन्‍हाळी हंगामात नोव्हेंबर - डिसेंबर या महिन्‍यात करतात.

2. कांदा बियाणे किती दिवसात उगवते?

कांद्याचे बियाणे 7 ते 8 दिवसात उगवते.

3. कांदा किती दिवसात तयार होतो?

कांद्याला बियाण्यापासून परिपक्व होण्यासाठी 90-100 दिवस लागतात, जे सुमारे चार महिने असतात. सेटमधून, कांदे सुमारे 80 दिवसांनी किंवा फक्त तीन महिन्यांच्या आत काढणीसाठी तयार होतात.

49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ