14 लाख शेतकऱ्यांचे 500 कोटी कधी देणार? सरकारचे आदेश डावलले : अग्रिमपासून वंचित
पुणे : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेतून राज्यात 24 जिल्ह्यांमधील 50 लाख शेतकऱ्यांना 2206 कोटी रुपयांची अग्रिम नुकसानभरपाई जाहीर झाली. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. मात्र, दिवाळीनंतर महिना लोटला तरी अद्याप 13 लाख 86 हजार 983 शेतकरी 500 कोटींच्या अग्रिमपासून वंचित आहेत. यावरून विमा कंपन्यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे. योजनेतील तरतुदीनुसार पावसाचा 21 दिवसांपेक्षा जास्त खंड व उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास नुकसानभरपाई मिळते. कंपन्यांकडून 18 डिसेंबरपर्यंत 37 लाख 7 हजार 484 शेतकऱ्यांना 1 हजार 707 कोटींचे अग्रिम वितरित केले आहे. अद्याप 498 कोटी 99 लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor