तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
पशुसंवर्धन ज्ञान
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

Animal care : काँग्रेस गवत खाल्ल्यामुळे जनावरावर काय परिणाम होतात?

सध्या पाऊस नाहीए. त्यामुळं चारा नाही. म्हणून जनावरांच्या खाण्यात नको ते विषारी गवत जातात. या विषारी वनस्पतींपैकी एक म्हणजे गाजर गवत त्याला आपण कॉंग्रेस गवत म्हणून पण ओळखतो.

जनावरांच्या खाण्यात गाजर गवत आल तर अंगावर विविध ठिकाणी जखमा होऊन  खपली बसते. मान व खांद्याच्या भागावरील केस जातात. त्वचा पांढरी पडते. पापण्या आणि चेहऱ्याच्या स्नायूभोवती खाज येते. याशिवाय जनावराला अतिसार होऊन आंगाला सूज येते. वेळेवर उपचार न झाल्यास जनावर दगावण्याची हि शक्यता असते. फक्त जनावरच नाही तर आपल्यालाही याचा धोका आहे कारण, गाजरगवतातील थोडा भाग दूधामध्ये सुद्धा उतरतो. त्यामुळे अशा जनवराच दुधही कडवट लागत.

60 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor