जनावरांमध्ये होणारा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार - सांसर्गिक श्वसनलिका दाह (A highly Infectious viral disease in animals - infectious bronchitis)
नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
सांसर्गिक श्वसनलिका दाह हा जनावरांमध्ये होणारा संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. कमी वय असलेली जनावरे या आजाराला जास्त बळी पडतात. हरपिजविरीडी कुळातील बोव्हाईन हरपिज व्हायरस टाइप-१ या विषाणूमुळे हा आजार होतो. चला तर मग जाणून घेऊया जनावरांमध्ये होणारा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार - सांसर्गिक श्वसनलिका दाह याविषयी.
प्रसारः
- आजारातून बऱ्या झालेल्या जनावरांमध्ये हा विषाणू सीआयडी आणि ट्रायजेमिनल गँगलियामध्ये अव्यक्त राहतो आणि पोषक वातावरण मिळाल्यानंतर वेळोवेळी व्यक्त होऊन स्त्रावाद्वारे शरीरातून बाहेर पडतो.
- बाधित जनावरांच्या शरीरातून अनुनासिक स्त्राव, खोकला, जननेंद्रियातील व गर्भाशयातील स्त्राव, वीर्य इत्यादीद्वारे विषाणू बाहेर फेकला जातो.
- दूषित हवेद्वारे आजाराचा प्रसार होतो.
- गोठविलेल्या वीर्यामध्ये या रोगाचे विषाणू जवळपास एक वर्षभरापर्यंत जिवंत राहू शकतात.
लक्षणेः
श्वसन संस्थाः
- बाधित जनावरांना ताप येतो.
- डोळ्यांचा दाह होतो.
- जनावरे तोंडाद्वारे श्वास घेऊ लागतात.
- नाकातून जास्तीचा स्त्राव बाहेर पडतो तसेच स्त्रावामुळे नाकपुड्या बंद होतात व श्वसनाचा त्रास होतो.
लहान वासरांची श्वासनलिका:
- बाधित वासरांची श्लेषमल स्त्रावामुळे श्वासनलिका अरुंद होते.
- ब्रोंकोनीमोनियामुळे मृत्यू सुद्धा उद्भवू शकतो.
- विषाणूमुळे होणाऱ्या सांसर्गिक श्वसनलिका दाह या आजाराचा संसर्ग अगदी लहान वासरामध्ये सुद्धा सामान्य आहे.
- श्वसन संस्थेच्या सहभागाची कोणतीही लक्षणे नसलेली स्थिती तीव्र आणि सामान्यतः घातक ठरू शकते.
जननेंद्रिये:
- हा आजार पश्च्युलार वोल्वो वजायनायटिस, क्वायटल एक्झांथेमा, वेसिक्युलर वेनेरियल डिसीज, वेसिकलर वजायनाइटिस इत्यादी नावाने सुद्धा ओळखला जातो.
- प्रामुख्याने म्हशींच्या व गायींच्या जननेंद्रियावर फोड येऊन जखमा होतात.
- रेड्याच्या किंवा बैलाच्या जननेंद्रियावर देखील जखमा होतात.
- जननेंद्रियाची श्लेष्मल त्वचा लाल गडद होते. त्यावर फोड येतात.
- संक्रमित रेड्याच्या/बैलाच्या वीर्यामधून विषाणू बाहेर पडत असले कारणाने अशा रेड्यांनी म्हैस भरवल्यास एक ते तीन दिवसांमध्ये म्हशीमध्ये आजाराची लक्षणे दिसण्यास सुरवात होते.
गर्भ:
- सामान्यतः सांसर्गिक श्वसनलिका दाह आजारामध्ये श्वसनलिकेच्या संदर्भातील लक्षणे दाखविल्यानंतर गोठ्यामधील किंवा कळपातील 60 टक्के पर्यंत गाभण म्हशींमध्ये गर्भपात होऊ शकतो.
- गर्भपात हा गर्भधारणेच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो. परंतु सर्वात जास्त वेळा तो तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच 7 ते 10 महिन्यात होण्याचा धोका असतो .
- संक्रमित रेड्याच्या/बैलाच्या वीर्यामधून विषाणू बाहेर पडत असल्या कारणाने अशा संक्रमित रेड्यापासून म्हैस भरवू नये.
प्रतिबंधात्मक उपाय:
- गोठ्यात नवीन जनावरे खरेदी करताना आयबीआर चाचणी करावी.
- ज्या जनावरामध्ये आयबीआर ची लागण नाही असेच जनावर खरेदी करावे.
- भारतामध्ये या आजाराच्या नियंत्रणासाठी लस उपलब्ध नाही.
आजाराची लक्षणे आढळताच ताबडतोब पशुवैद्यकाशी संपर्क साधून उपचार करावेत.
तुम्ही तुमच्या जनावरांमध्ये होणाऱ्या सांसर्गिक श्वसनलिका दाह या आजारावर कसे नियंत्रण मिळविता? तुम्हाला कोणत्या प्रकारची लक्षणे निदर्शनास आली? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. सांसर्गिक श्वसनलिका दाह या आजाराला कोणत्या वयोगटातील जनावरे बळी पडतात?
सांसर्गिक श्वसनलिका दाह या आजाराला कमी वय असलेली जनावरे जास्त बळी पडतात.
2. सांसर्गिक श्वसनलिका दाह हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?
हरपिजविरीडी कुळातील बोव्हाईन हरपिज व्हायरस टाइप-1 या विषाणूमुळे हा आजार होतो.
3. सांसर्गिक श्वसनलिका दाह या आजाराची लक्षणे जनावरांच्या कोणत्या भागावर झालेली दिसतात?
जनावरांची श्वसन संस्था, लहान वासरांची श्वसन नलिक, जननेंद्रिये व गर्भ या भागावर आजाराची लक्षणे दिसून येतात.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor